कर्ज फिटल्यावर गाडीचे टायटल कसे मिळवावे? (काय प्रक्रिया आहे)

Submitted by mansmi18 on 14 May, 2014 - 06:34

नमस्कार,

माझ्या गाडीचे (पुण्यात) बँकेतर्फे घेतलेले लोन फिटले आहे. आता गाडीचे टायटल माझ्या नावे करण्यासाठी काय प्रक्रिया असते?
काय कागदपत्रे लागतात? कृपया लिहाल का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्यांकेकडून कर्ज फिटल्ल्याचे पत्र घ्या.
आरटीओ हापिसात जा.
तुमच्या आरसी बुकात दिलेले हायपोथिकेशन रद्द करून घ्या.
एकादा एजंट असेल तर हे सगळे डोक्याला शून्य ताण देऊन होईल.

टाईमपास करायचा असेल, आरटीओ हापिसात फिरायला जाणे आवडत असेल, तर स्वतः केलेत तरी चालेल. थोडा वेळ लागेल पण फारसे कठीण काम नाही.

ता.क.
ब्यांकेने दिलेल्या पत्राला टाईम लिमिट असते. जसे दिलेला चेक अमुक दिवसात वटवावा लागतो तसे अमुक दिवसांच्या आत ते पत्र वापरून बोजा उतरवून घ्यावा लागतो.

1.Bank NOC
2.Form 35 (Cancellation of hypothecation)
3. Car policy (photo copy)
4. Car PUC (photo copy)
5. ID Proof/ address Prof (for address change)
6. RC

NOC मिळाल्या नंतर ३ महिन्याच्या आत Cancellation of hypothecation साठी आर्ज करता येतो. मी परवाच केले आहे म्हणुन माहित आहे. Wink

साधारण खर्च ५००-७०० रू. आहे. एजंट्नी मला १८०० सांगीतले होते.

इब्लिस, वळसंगीकर धन्यवाद.
आणखी काही यडबंबु प्रश्नः
1. आर सी म्हणजे काय?
2. वरील कागदपत्रे एजंटला देउन तो सगळी प्रोसेस करुन फायनल डॉक्युमेंट देतो का? मला स्वतःला तिथे जाउन डिप्रेस व्हायची इच्छा नाही:)

RC Book नामक प्रकार असे पूर्वीच्या काळी. एक असं घाणेरड्या खाकी कव्हरचं पुस्तक असे. त्याच्या शेवटल्या पानावर ब्यांकेच्या नावाने हायपोथिकेशन असे. ते क्यान्सल केल्याचा शेरा मिळत असे.

आजकाल स्मार्टकार्ड असते.

मला स्वतःला तिथे जाउन डिप्रेस व्हायची इच्छा नाही:) >> मनस्मी.. तुम्ही स्वतः गेला तरी खूपच साधी प्रोसेस आहे. सगळी कागदपत्रं बरोबर घेउन गेलात तर डिप्रेस व्हावं लागणार नाही. स्वानुभवातून सांगतोय.

तुम्ही स्वतः गेला तरी खूपच साधी प्रोसेस आहे. सगळी कागदपत्रं बरोबर घेउन गेलात तर डिप्रेस व्हावं लागणार नाही >>> १०० आहे. मी हि स्वतःच गेलो होतो.

2. वरील कागदपत्रे एजंटला देउन तो सगळी प्रोसेस करुन फायनल डॉक्युमेंट देतो का? >>> नाही. RC तुम्ही दिलेल्या पत्त्यवरच पोस्टानी येते.

तुम्ही स्वतः गेला तरी खूपच साधी प्रोसेस आहे. सगळी कागदपत्रं बरोबर घेउन गेलात तर डिप्रेस व्हावं लागणार नाही >>> खरंय अगदी.

क्कैच्च्या क्कैच्च प्रकार आहे हा भारतात!!
आमच्याकडे ज्या कंपनीकडून कर्ज घेतले असेल ती कंपनी दोन तीन दिवसात घरपोच टायटल पाठवते. परस्पर एम व्ही सी (ज्याला तुम्ही आर टी ओ) म्हणता त्यांना पण कळवते.
एजंट काय, एनोसी काय? ५०० रु. काय? आता भारतात प्रत्येकाकडे शंभर कोटी रुपय असतात म्हणून ५०० रु. चे काही वाटत नाही तुम्हाला, पण पाचशे हे पैशाच्या संदर्भात लिहीले तर पोटात गोळा येतो इथे!! अगदी गाडी, घर घ्यायचे असेल तरच एव्हढे मोठे आकडे समजतात.

मी जुनि झेन घेतलि आहे तिचे लोन मारुति सिटि कॉर्प मुम्बइ चे होते आता ति कम्पनि बन्द झालि आहे तर तिचे
Bank NOC कसे मिळेल?

इब्लिस,

बॅ़केचे लेटर या आठवड्यात मिळाले आहे. या ८-१५ दिवसात काम करुन घ्यायचा विचार आहे. झाल्यावर सविस्तर लिहीतो.