अशीच राहा....हसरी !

Submitted by अशोक. on 14 May, 2014 - 03:16

Waheeda.jpg

एक असा चेहरा जो पडद्यावर आला तोच सहनायिकेच्या रुपात आणि नायक असलेल्या त्या निर्मात्याने चेह-याला हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान मिळवून तर दिलेच पण त्यानंतर जेव्हा हा हसरा आणि बोलका चेहरा नायिकेच्या रुपात समोर आला त्यावेळी अभिनयाबरोबरच भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड तिने आपल्या भूमिकेला दिली त्यावेळेपासून या तरुणीचा हसरा चेहरा लाखो प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसला. तिच्या अगोदरच्या, तिच्या बरोबरीच्या आणि तिच्या नंतरच्या कित्येक नायिकांनी प्रसिद्धी मिळविली, प्रथम द्वितिय स्थानावर विराजमान झाल्या आणि कालौघात उतरल्याही....पण ही मात्र आपला सदोदित हसरा चेहरा घेऊन पडद्यावर तसेच पडद्याबाहेरच्या जगातही वावरली...आणि आज "अवघे पाऊणशे वयमान" झाल्यानंतरही ना तिच्या नावाची जादू तसूभर कमी झाली आहे ना तिच्याविषयी मनी वसलेला आदर कमी झाला आहे. सौंदर्य १९५६ साली जसे शुभ्र टवटवीत प्रसन्न असे होते तितकेच आज २०१४ मध्येही. अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, प्रदीपकुमार, मनोजकुमार, विश्वजीत, धर्मेन्द्र, राजकुमार, सुनील दत्त राजेन्द्रकुमार, संजीवकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा कितीतरी पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणा-या नायकासमोर तितक्याच क्षमतेने आणि तोडीसतोड अशा दर्जाने सामोरी गेलेली ही चिरतरुण नायिका....सर्वाधिक प्रेमाने आणि तन्मयतेने रमली होती ती गुरुदत्तसोबतीने. ते एक तिच्या खाजगी आयुष्यातील सदाबहार पान राहिले आहे....आठवणी सांगण्याचे प्रसंग तिच्यावर ज्या ज्यावेळी टीव्हीवर तसेच रेडिओवर आले त्या त्यावेळी तिने अत्यंत संयमाने, शांतपणे गुरुदत्त संदर्भात आपल्या स्मृती जागवल्या.... चालताबोलता विश्वकोशच आहे सध्या....ही सर्वांना प्रिय अशी रोझी !!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....तुला वहिदा रेहमान ! अशीच राहा....हसरी !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा, मस्तच..
पप्पांची आवडती हिरोईन , तिचा नीलकमल बघितलाय पप्पांबरोबर बसुन.. गाईडमधल्या 'आज फिर .. ' गाणं आवडत आहे . Happy

मामा, सुंदरच लिहिलंय - शॉर्ट अँड स्वीट ....

वहिदा कायम ग्रेटच .... मागे कुठेतरी असं वाचलंय की त्या काळात ज्या एक - दोन(च) अभिनेत्रींना कॅमेर्‍याचा विशिष्ट अँगल लावावा लागत नसे (सुंदर दिसण्यासाठी) त्यामधे वहिदा प्रथम क्रमांकावर होती .... Happy

अगं दक्षिणा....

वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेला छोटासा लेख....आठवणीतले हास्य म्हणून. तू तर जाणू शकतेस की वहिदा कारकिर्दीवर लिहायचेच तर दहा पानेही कमी होतील. निव्वळ "हॅपी बर्थ डे" कशाला लिहायचे म्हणून थोडेसे जादाचे लिहावे असे वाटले.

सुंदर लेख आणि फोटो.
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री. आपला आब तिने कायम राखला. वॉटर मधे ती जॉनच्या आईच्या छोट्याश्या भुमिकेत आहे पण त्यातही ती लक्षात राहते.

गाईड, रेश्मा और शेरा, तिसरी कसम, खामोशी या भुमिका खरं तर साकार करायला अवघड होत्या.तिने त्या लिलया पेलल्या. आणि नृत्यातली ग्रेस काय वर्णावी !

अशोक मामा,

सुंदर लेख...हॅपी बर्थ डे वहिदा जी !!
मामा, त्या निरनिराळ्या National Film Award Winner लोकांविषयी लेखमाला लिहिणार होता न तुम्ही...
Eagerly waiting for that Happy

- प्रसन्न

दिनेशदांच्या पोस्टी ला नेहमी प्रमाणे अनुमोदन !!
आपला आब तिने कायम राखला << हे १००% खरे .
अगदी ओम जय जगदीश सारख्या टुक्कार चित्रपटात ही वहिदाजींनी त्यांची भुमिका समरसुन केली आहे.
गाईड, खामोशी, लम्हें आणि अगदी अलिकडे प्रदर्शीत झालेला देहल्ली ६ या काही भुमिका मला खुप आवडल्या होत्या.

छान छोटेसे लिहिले आहे.

अशोकराव,

मला वाटते की तुम्ही जर एकेका अभिनेत्रीबद्दल एकेक असा लेख लिहायला घेतलात तर खूप वाचनीय लेखमालिका होईल. Happy

बघा, वेळ असल्यास मनावर घ्या!

मामा, नेहमीप्रमाणे सुंदर लेख. अभिनयाच्या जोडीला त्यांच्या नृत्य अदाकारीचे करावे तेवढे कौतुक थोडे.. 'भवरा बडा नादान है' असो किंवा 'पिया तोसे नैना लागे रे' असो, त्यांच्यातल्या ताल-लयीच्या सेन्स ला बिल्कूल तोड नाही. आणि काय ते डोळे..पाठलाग करण्यास, घायाळ करण्यास अगदी योग्य. देहल्ली ६ मधे 'ससुराल गेंदा फूल' वर दोनच ओळी का असेना पण त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे.

मुझे जीने दो चा उल्लेख राहिला. ती पण एक अवघड भुमिका होती.

रात भी है कुछ भिगी भिगी, चाँद भी कुछ मध्यम मध्यम... अहा !

बेफिकीर जी..... छान विचार आहे.....नक्की लिहिण्याचा मी शब्द देतो इथे तुम्हाला....अर्थात क्रमशः

प्रसन्न....होय, माझ्या लक्षात आहे ते. फक्त घरगुती कामामुळे निवांतपणा मिळत नाही, जितका हवा तितका.

दिनेश.... "नृत्यातील ग्रेस काय वर्णावी ?" - १००% सहमत. नृत्य तर वहिदा, वैजयंतीमाला, हेमा मालिनी या अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा अविभाज्य भागच....कदाचित या नृत्यापोटी होत असलेल्या व्यायामामुळेच वयाच्या ६५ नंतरही यांच्यातील ग्रेसफुलनेस राखला गेला आहे.

मला वाटते की तुम्ही जर एकेका अभिनेत्रीबद्दल एकेक असा लेख लिहायला घेतलात तर खूप वाचनीय लेखमालिका होईल>>> अगदी ,माझ्या मनातले..आता तुम्ही मनावर घ्या बरं मामेश...

व्वा, सुरेख.. वहिदाजींना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..
आवडती अभिनेत्री. एव्हर ग्रेसफुल. त्यांच्या चरित्र भुमिकांपैकी कभी कभीतली त्यांची भुमिकाही आवडली होती.. होणारी कुचंबणा नेमकी दर्शवणारी. रंग दे बसंती, लम्हें सुद्धा सुंदर.

नेहमीप्रमाणेच तुम्हालाही थँक्स मामा.

सहमत बेफिकीर यांच्याशी , एक लेखमालिका लिहाच अशोक, सिरीयसली.
दिनेश, >.रात भी है कुछ भिगी भिगी, चाँद भी है कुछ मध्यम मध्यम... अहा ! >>
अगदी अगदी.
चित्रकाराला आव्हान अशी शिल्पित रूपशोभा , तशीच देहाकृती.
चौदहवीका चांद वहिदा .अभिनयाचं अविस्मरणीय चांदणं .

प्रख्यात नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी दूरदर्शनवर वहिदाच्या ग्रेसची तारीफ केली होती. पान खाये सैंया हमार मधला शृंगारीक भाव दाखवायला तिला कुठल्याही सवंग हावभावांचा आधार घ्यावा लागला नव्हता.

त्याच चित्रपटातल्या, हाय गजब कही तारा टूटा, मारे गये गुलफान, आ आभी जा रात ढलने लगी मधले वेगवेगळे भाव तिने लिलया दाखवले आहेत.

मोसे छल किये जाय मधला शब्दांच्या पल्याड असलेला विद्ध भाव तिच्या चेहर्‍यावर दिसतो. ( तसाच वैजयंतीमालाच्याही, होठोंपे ऐसी बात.. मधे ) गाईड मधल्याच स्नेक डान्स ( याला गाणे नाही ) मधला निर्धार पण बघण्याजोगा. ( यू ट्यूबवर आहे )

पिया तोसे नैना लागे मधल्या एका कडव्यात ती नऊवारी साडीत आहे. आणि फागुन मधल्या पिया संग खेलो होरी मधेही आहे. ( हा फागुन वेगळा. त्यात धर्मेंद्र आणि जया भादुरी होते. ) दोन्हीत ती मराठीच वाटते.

वहिदा - नूतन... असा एकत्र योग कधी आला नाही ( माझ्या माहितीत तरी ) तसा आला असता तर !

वहिदा-नूतन योग यांचा एकत्र योग यावा असं का वाटलं दिनेश तुम्हाला? Happy अर्थात हा दुग्ध-शर्करा योग झाला असता यात शंका नाही..

दिनेश....

"...दोन्हीत ती मराठीच वाटते. ..."

~ "गाईड" मधील ते विशिष्ट कडवे दिवाळीवर आधारित आहे आणि त्या दृश्यात वहिदा नथ नऊवारीमध्ये, जो महाराष्ट्रीयन पेहराव आहे....दिसत्ये.... तर "फागुन" चित्रपटात ती मराठी गृहिणी दाखविली आहे... नाव "शांता दामले". तिची मुलगी जया भादुरी तिला "आई" अशीच हाक मारत असते...कथानकात.

>>>एक असा चेहरा जो पडद्यावर आला तोच सहनायिकेच्या रुपात आणि नायक असलेल्या त्या निर्मात्याने चेह-याला हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान मिळवून तर दिलेच

हे सीआयडी बद्दल लिहिलं असेल तर एक छोटीशी करेक्शन... त्यात नायक(देव आनंद) आणि निर्माता(गुरू दत्त) वेगवेगळे होते.
(शिरीष कणेकर मोड ऑफ)

बाकी वहीदावर फक्त एक पॅराग्राफचा लेख...बहुत नाइन्साफी है ये Wink

खूप छान लेख, वहिदाचा फोटो सुद्धा.
एक सात्विक सौंदर्याची नायिका.नृत्यातली अदाकारी लाजवाब!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

थॅन्क्स मार्क....

मी निर्माता म्हणून देव आनंद यालाच मनी ठेवून ते वाक्य लिहिले होते. वहिदाने टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत देवचा तसा उल्लेख केला होता...."त्यानी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले". गुरु दत्तशी तिचे वैयक्तिक पातळीवर संबंध फुलले ते "प्यासा" पासून. तशी आकडेवारी पाहिली तर तिने गुरुदत्त पेक्षा देव आनंदसमवेत अधिक चित्रपटात काम केले आहे.

बाकी वाक्यरचनेमुळे गोंधळ होऊ शकतो, हे मान्य. एक पॅराग्राफ खूपच अपुरे लिखाण आहे पण आज वाढदिवस एवढाच एक हेतू होतो....आणि कोरड्या शुभेच्छा देण्याच्याऐवजी काहीतरी आवडीचे लिहावे असे वाटले म्हणून तितपत लिहिले आहे.

सई, त्या काळात असे दोन नायिका असलेले चित्रपट फारच थोडे. खुपदा सहनायिका असलीच तर ती मुमताज असे.
मुमताजचे त्या काळातल्या अनेक मुख्य नायिकांसोबत चित्रपट आहेत. पुढे नितू सिंग ने तसे केले कारण त्या दोघी स्वभावाने मनमिळाऊ आहेत.
नूतन आणि वहिदा दोघीही त्या काळातही नैसर्गिक अभिनय करत असत. या दोघी एकत्र आल्या असत्या तर अभिनयाची जुगलबंदीच झाली असती.

अशोक, त्या फागुनचे चित्रीकरण ( वहिदा बाळाला इन्क्यूबेटरमधे बघते तो सीन आणि विजय अरोरा जया भादुरीला छेडतो तो सीन, ) माझा जन्म ज्या हॉस्पिटलमधे झाला त्या मालाडच्या स.का.पाटील हॉस्पिटलमधे झाले होते.
म्हणून लक्षात. चित्रीकरण बघायला आम्ही होतोच. "साडी" असा विषय असलेला चित्रपट होता तो !

लेख छान.
पण वहिदाचा वाढदिवस १४मेला नसतो असे तिच्याकडुन सांगण्यात आलेय ( आजचे वृत्तपत्र) वाढदिवस 3 फेब्रु.ला असतो. १४ मे ही चुकीची तारिख सगळीकडे पसरली आहे.
ही बातमी

होय सावली....३ फेब्रुवारीबाबत मागेही चर्चा झाली होती....पण एनडीटीव्हीने बातमीपत्रात १४ मे अशीच तारीख सांगितल्यामुळे रसिकांच्या मनी तीच राहिली....आज खुद्द वहिदा रेहमान यानीच ३ फेब्रुवारी ही तारीख नक्की आहे असे सांगितले असले तरी वर्षातून दोनदा शुभेच्छा मिळत असल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

छान लिहिलंत.. Happy

क्रमशः लिहिणार असलात तर एक विनंती: संपूर्ण लेख लिहून तयार झाल्यावरच भाग पोस्ट करायला घ्या. क्रमशः मधला वेळ वाचकांसाठी असह्य असतो. (पूर्ण लेखच जर तयार असेल तर मग क्रमशः कशाला कोण लिहिल, हा प्रश्नही आहेच! पण मग क्रमशः मध्ये पोस्ट होणार्‍या लेखांमध्ये नियमितता आणि टाईम-फॉलो करणे अपेक्षित असते वाचकाला...)

Pages