मातृदिनाचे वेध मुलांना शाळेमुळे आठवडा-दहा दिवस आधीच लागतात आणि "आई, I have a surprise for you, but you will get it only on the mother's day" असा चिवचिवाट तेव्हापासूनच चालू होतो. मग मी ही "हो का, I am so eager to see the surprises you have made for me" - असं म्हणून त्यांचा उत्साह अजून वाढवते!
प्रत्यक्षात त्यांनी बनवलेली मदर्स डे कार्डस् बघून पोरांनी काय वाभाडे काढलेत आपले, अशी अवस्था होते!
दोन-एक वर्षापूर्वी अरिनने (आता ७ वर्षे) बनवलेले About my mother कार्ड वर त्याने लिहिलेले -
My mother's age is : 74 years - (अरे मुला, तुला 70 व्या वर्षी जन्म दिला का रे मी?)
My mother's favorite thing is : eating - (एवढं खरं बोललंच पाहिजे का दर वेळी ?)
My mother's favorite past time activity is : sleeping - (पुलं नी म्हटलच आहे तसं - हो, इतरांपेक्षा माझा डोळा जरा जास्त लागतो खरा, पण आमच्या मुलाने एवढच बघावं का? )
रोहनने (४.५ वर्ष) पण काल याच धर्तीवर काहीतरी लिहीलेलं mother's day write up शाळेतून आणलं...
म्हणे आईला माझ्याबरोबर बास्केट्बॉल खेळायला आवडतो.प्रत्य क्षात मला बास्केटबॉलचा बॉल कुठला सांगता आलं तरी नशिब - ही परिस्थिती...धन्य धन्य जाहले मी अगदी! हसून हसून पुरेवाट! मज्जा मज्जा करतात मुलं!
रोहन ने शाळेत बनवलेली ही गिफ़्टस्.
यावर्षी अरिनने शाळेतून एक कुपन बुक बनवून आणलय - मदर्स् डे निमित्त आई करीता कुपन्स!
अरे, वा! वा! असं म्हणत मी आनंदाने क्लीनींग चं कुपन वापरते - चला, लागा क्लीनींगला - असं म्हणत असतानाच अरिनने पुढचे क्लीअर केले - यातली, क्लीनिंग, doing dishes, laundry ई. कुपन्स आधीच expire झालेली आहेत. म्हणजे मला कुपन बुक मिळण्या आधीच ही सर्व महत्वाची coupons expired म्हणे!
पण कालच्या मदर्स डे चं मला मिळालेलं मोठं गिफ़्ट म्हणजे अरिनने माझ्या करीता आखलेले Tresure hunt! हे त्याचे क्लूज्
1. Somewhere there are good fires - fireplace
2. Somewhere you sleep - under the bed
3. Somewhere you do work - in the sofa where I sit and do the work
4. Somewhere you take a bath - this was the final clue - bathroom
शेवटच्या क्लू नुसार मी बाथरूम मध्ये गेले तर शॉवरमध्ये हे साहेब स्वत: होमवर्क करत बसलेले - "हे काय चालवलयस इथे?" असं विचारल्यावर म्हणे - हेच तुझं गिफ़्ट, आई !
अरिनचा होम वर्क म्हणजे घरात नुस्ती रणधुमाळी असते. मी त्याला नेहेमी म्हणते, तू स्वत:हून होम वर्क करणे हे माझं बेस्ट गिफ़्ट आहे. ते गिफ़्ट मला असं काल मिळालं!
मस्तं! कित्ती गोड गिफ्ट. मी
मस्तं!

कित्ती गोड गिफ्ट.
मी असं काही गिफ्ट मिळालं तर आयुष्यभर विसरणार नाही.
मजा येते मुलांनी बनवलेलं
मजा येते मुलांनी बनवलेलं बघायला. यावर्षी आमच्याकडे रेसिपी कार्ड्स होल्डर बनवलाय.
मधलं ते मदर्स एज वगैरे कॉमन दिसतंय. गेल्या वर्षी माझ्या मुलाने माझं वय २८, माझं वजन २८ पाऊंड्स आणि उंची २९ फूट, आईला काय आवडतं तर आयफोनवर जायला असं लिहून आणलेलं
सहीच!
आरे कित्ति गोड.....
आरे कित्ति गोड.....
सहीच! सायो
सहीच!
सायो
आईग्गं कसलं गोड गिफ्ट. लक्की
एक मावशी डे पण असतो बरं का!
ट्रेझर हंटची कल्पना भारी आहे आणि त्यातलं शेवटचं बक्षिस हा खास अरिन टच आहे.
वा कसल सही आहे !!!
वा
कसल सही आहे !!!
(No subject)
अरिन, रोहनल गोड पापी आणि
अरिन, रोहनल गोड पापी आणि शाब्बासकी !!
मस्त गिफ्टस आहेत.
कित्ती गोड !!
कित्ती गोड !!
क्यूट
क्यूट
गेल्या वर्षी माझ्या मुलाने
गेल्या वर्षी माझ्या मुलाने माझं वय २८, माझं वजन २८ पाऊंड्स आणि उंची २९ फूट >>> बापरे, तू एकदम सुतळीचा धागा दिसत असशील.
सो क्युट. मात्र कधीकधी
सो क्युट. मात्र कधीकधी वाभाडे पण क्युटली काढतात ही मुले
सर्वांना धन्यवाद! सायो >>
सर्वांना धन्यवाद!
सायो >> हाहा
मामी >> हो हो, मावशी दिन पण असतो ना, त्या दिवशी भाचे मंडळी मावशी कडे पाठवायची असतात!
महत्वाची coupons expired
महत्वाची coupons expired म्हणे! <<, अरेरे

कस्ल गोड आहे मला ह्यावर्षी
कस्ल गोड आहे
मला ह्यावर्षी माझ्या नावाची नेमप्लेट पेपर क्विलिंग करायचा प्रयत्न करुन तयार केलेली भेट मिळाली. ती देखील एकदम गिफ्ट रॅप करुन वर क्राफ्ट मधलं गुलाब चिकटवून वगैरे.
कित्ती गोड आहेत मुलं.
कित्ती गोड आहेत मुलं.
मस्त. गेली २-३ वर्ष शाळेतून
मस्त.
गेली २-३ वर्ष शाळेतून बनवलेलं कार्ड मिळत होतं. यावेळी मात्र त्याने स्वतःच लपून (त्याच्या परीने) कागद घाईघाईनी फडून एका बाजूला लाल -निळ्या रंगाची बस, मागच्या बाजूला आंबा, केळं आणि संत्रं अशी तिन फळं आणि मधल्या बाजूला सुंदर अक्षरात डिअर मॉम, फ्रॉम आयाम टू अल्पना असं लिहिलेलं कार्ड बनवलं. मदर्स डे ला सकाळी सकाळी उठून सरप्राइज म्हणत कार्ड हातात दिलं.
क्युट!
क्युट!
सो क्यूट!
सो क्यूट!
सहीच आहे हे.. मस्त...
सहीच आहे हे.. मस्त...
सहीच आहे!
सहीच आहे!
फारच गोड प्रकरण आहे!
फारच गोड प्रकरण आहे!
महत्त्वाची कूपन्स आधीच एक्स्पायर झालेली! व्हॅलिड कूपन्समधलं 'वन फ्री 'अवर ऑफ नो व्हाइनिंग', फारच क्यूट!
मदरचं फेवरिट फूड काय आहे ते कळलं नाही.
मस्त !
मस्त !
आई ग्ग सो क्युट !! Tresure
आई ग्ग सो क्युट !!
Tresure hunt चे क्लु पण अगदी क्रियेटिव्ह
मदरचं फेवरिट फूड काय आहे ते
मदरचं फेवरिट फूड काय आहे ते कळलं नाही. >>> मृ, crabs आहे ते.
खूपच गोड!!!
खूपच गोड!!!
जबरी गोड असतात बारक्यांची
जबरी गोड असतात बारक्यांची अशी गिफ्ट्स. ह्यावेळी पण नेहेमीप्रमाणे मला अशी सगळी गिफ्ट्स मिळालीच शिवाय मी फॉर्च्यून कुकीज मधली फॉर्च्यून्स साठवून ठेवली होती ती सगळी एका शीट्वर ग्लू करून पण मिळाली.
रात्री मी निवांत बसले होते तर पाय ठेवायला समोर एक खुर्ची/मोडा आणून द्या सांगितलं आणी त्यांची हलायची लक्षणं दिसेनात तर म्हणाले की आज मदर्स डे आहे निदान आज तरी जरा ऐका तर धाकटी म्हणे तुझ्या मदर्स डे गिफ्ट्स च्या डिमांड्स वाढत चालल्या आहेत
ही सगळी गंमत एन्जॉय करा. मिडल
ही सगळी गंमत एन्जॉय करा. मिडल स्कूलपासून हे सगळं बंद होतं पार.
How Cute Sayo
How Cute
Sayo
Pages