अंजु

Submitted by सुहास्य on 11 May, 2014 - 05:27

जिवाभावाची मैत्रीण "अंजु" अचानक सोडुन गेली हे सत्य अजुन पटत नाहिये....तिच्या बद्दल थोडेसे...

काही वर्षांपूर्वी कुवेत मध्ये पाउल ठेवलं त्यावेळी येताना म्हणजे अगदी ऐन वेळी एका नातेवाईकाने श्री कोरडे ह्यांचा फोन नंबर दिला. इतकाच काय तो आमचा कुवेत मधील आधार होता. कुवेत ला आल्या नंतर काही दिवसात कोरडे काकी ना फोन केला तर १० मिनीटांत काकी घरी हजर …. अत्यंत प्रेमाने विचारपूस करून, काही हवे नको, ह्या नवीन देशात काय करावे - काय करू नये, इत्यादी इत्यादी सुचना देऊन आणि "काही लागले तर… कुठे जायचे असेल तर… हक्काने सांगयाचे" अशी प्रेमाची धमकी देऊन गेल्या. जाताना "Friday ला आमच्या कडे जेवायला येणे. इथला आपला ग्रुप भेटेल तुला" असे काकी म्हणाल्या .
त्या Friday ची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. ठरल्या प्रमाणे आम्ही कोरडे काका - काकी च्या घरी गेलो. बेल वाजवली, तर एका अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व - गोरी पान -सुंदर चिकन च्या कापडाचा ड्रेस घातलेल्या - मंद perfume लावलेल्या हसत मुख व्यक्ती ने दार उघडले. आणि "आम्हाला या या, तू स्मिता नं … “असे स्वागत केले. आम्ही बुचकळ्यात पडलो … ह्या तर कोरडे काकी नाहीत. बहुदा दुसऱ्या च घरात आलो का? असा विचार ये ऊन दारा वरील नंबर पाहिला तर बरोबर होता. आमच्या प्रश्नार्थक मुद्रे कडे पाहून येउन ती ताबडतोब म्हणाली ,"तुम्ही बरोबर आलेले आहात हे कोरड्यांच घर आहे.. या-या." आत गेलो तर कोरडे काका -काकी नी ओळख करून दिली --"ही अंजु… अंजु जवाहिरे, तुझ्याच वयाची आहे, तुला इथली अजून काही माहीती हवी असेल तर हिला विचार, ही जग मित्र आहे. "आणि त्या दिवसा पासून अंजू ची जी मैत्री झाली ती इतकी घट्ट की काय विचारता. लगेच त्या नंतर तू कुठली - मी कुठली…. अशा आमच्या एकदम गप्पा च सुरु झाल्या . योगा- योगाने मुले पण बरोबरीची . लगेच अंजु ने विचारले येता का garden ला walk करायला ? काय मस्त वाटल. विचारसरणी पण जुळली असे वाटले आणि नंतर जुळलीच.
४ भावंडात आई वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी अंजली .वडिलांची फिरतीच्या नोकरी मुळे भारतात बरीच गावे फिरलेली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या चालीरीती माहीत होत्या. लहानपणापासूनच अत्यंत नीटनेटकेपणा ची सवय.
लग्न होऊन सौ.अंजली कणाद जवाहिरे झाली. त्यानंतर कुवेत ला आली आणि मग कुवेतची झाली . प्रचंड मोठा मित्र परिवार… तिच्या पेक्षा वयाने लहान- मोठी… सगळीच तिची मित्र मंडळी !!!! कुवेत मध्ये कुणी कितीही मोठे असले तरी काका काकू म्हणणे नव्हते. अलका ताई (अलका केतकर) किवा स्मिता ताई ( स्मिता गोखले) असेच म्हणायचे. असा वेगळाच पण झकास पायंडा अंजु कडुन कळला.

सगळ्यांना बोलावून स्वत:ने बनवलेले उत्तम रुचकर पदार्थ खाऊ घालणे हा तिचा मना पासूनचा आवडता छंद .घरात कामाला maid नव्हती पण घर मात्र लख्ख -टापटीप. अत्यंत मनमिळावु व्यक्तिमत्त्व. कोणतेही काम असो आपण नुसतं विचारलं … “अंजु हे कसं करायचं गं माहीत आहे का? " तर उत्तर ठरलेले "अग सोपं आहे, थांब आपण मिळुन करू" कुणालाही कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी कायम अग्रस्थानी. कोणतीही पिकनिक असो, अंजू लीडर असेल तर कुणाला चिंता नसे .. सगळं व्यवस्थित होणार ह्याची १००% खात्रीच. कोणतीही माहीती हवी असेल तर अंजु लगेच सांगणार आणि माहीत नसेल तर कुठे कुठे फोन करून विचारून तुम्हाला अचूक माहीती देणारच .
सकाळची बायकांची Coffee Morning आहे … अंजु , मेनू काय करुया? …. shopping ला जायचे आहे अंजु गाडी ठरवेल सगळा plan करेल की चालली बायकांची पलटण shopping ला .…. दुकानांत पण हे इथे चागलं … तिकडे ते स्वस्त… अगदी सगळी detail माहिती देणार … कुणाची तब्येत ठीक नाहीये, लगेच घरी जाऊन चौकशी करणार जेवणाचा डब्बा घेऊनच जाणार ….
खेळाची आवड म्हणाल तर , रोज Badminton खेळणारच … शिवाय Week end ला पत्ते (Bridge) खेळणार … त्यावेळी सगळी senior मंडळी होती तर प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचा चहा- कॉफी, साखर हवी -नको सगळं अगदी न बोलता करणार. शिवाय Bridge मध्ये champion होतीच . रोज संध्याकाळी Salmiya garden चा walk अगदी न चुकता होणारच.
महाराष्ट्र मंडळ कुवेत ची तर ती अतिशय हर हुन्नरी उत्सांही आणि जीव तो डून काम करणारी कार्यकर्ती .सगळ्यांना सामावून घेऊन काम करण्याची हातोटी. काही वेळा काम करताना रागवावे लागे. मोठ्यांन कडुन पण प्रेमाने, चिकाटीने काम करून घेणे आणि हे सर्व करताना आपल्याला वाईटपणा येईल अशी पुसट शी भीती पण तिला कधी शिवली नाही. चुकून माकून कुणाला दुखावले गेलेच असेल तर लगेच जाऊन Sorry म्हणणे जेणे करून कुणी दुखावलेले रहाणार नाही .
इतके सगळे करून स्वतः चा संसार अगदी नीटनेटका उत्तम रीतीने केला.
जवाहिरे कुटुंब कुवेत सोडुन पुण्याला गेले. तिकडे पण अंजु सगळ्यांच्या गळ्यातील ताईत च . नातेवाईकांत प्रिय , मैत्रीणी नं मधे आवडती . कुवेत ग्रुप चे get -together अंजु मुळेच होणार हे सगळ्यांनाच माहीत.

अश्या हरहुन्नरी अंजु ला Cancer सारख्या आजाराने वेढले . तिला च असा आजार का व्हावा? ह्याचे उत्तर कुणा कडेच नाहीये .
सगळ माहीत असूनही शेवट पर्यंत अंजु धीराने आणि हसतमुखाने सामोरी गेली. स्वतः ला खूप त्रास होत असतांना सुद्धा सगळ्यांशी हसतमुख आणि आनंदात बोलायची .घरी आलेल्यांना खाऊ पिऊ घातल्या शिवाय कधीच जाऊ दिले नाही .
अशी अंजु आज आपल्यात नाही ही कल्पना च सहन होत नाहीये ."जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला …"ही ओळ सारखी सारखी आठवतीये .
अशीच मैत्रीण जन्मो जन्मी मिळो अशीच इच्छा आणि अंजु ला श्रद्धांजली.
anju.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users