Submitted by profspd on 11 May, 2014 - 03:14
गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
*********************************************
दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!
वाट्यास जन्म आला विझल्या चुलीप्रमाणे!!
साठीतही उधाणे शैशव अजून माझे........
जपले उरात शैशव मी बाहुलीप्रमाणे!
आयुष्य की, म्हणावे हा ग्रीष्म बारमाही?
आभास गारव्याचा पण, सावलीप्रमाणे!
स्वप्नात रोज येते तारुण्य सांडलेले.........
दुरुनी मला पहाते ते वाकुलीप्रमाणे!
प्रत्येक पोर मजला वाटे मुलाप्रमाणे.........
प्रत्येक माय वाटे मजला मुलीप्रमाणे!
पंगत अरे, कशाची? झुंबड जणू भुकेची!
वाटे हरेक जेवण मज दंगलीप्रमाणे!!
मी एकटाच तेथे कमळासमान होतो!
होता जमाव भवती तो दलदलीप्रमाणे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंगत अरे, कशाची? झुंबड जणू
पंगत अरे, कशाची? झुंबड जणू भुकेची!
वाटे हरेक जेवण मज दंगलीप्रमाणे!!
लहानपणी काही लग्नात हा अनुभव घेतला होता, आठवण झाली.
हरेक - अतिशोयोक्ती तर नाही.
प्रत्येक पोर मजला वाटे मुलाप्रमाणे.........
प्रत्येक माय वाटे मजला मुलीप्रमाणे!
उदात्त भावना मात्र वैश्विक नाही.
इतक्या चिन्हांची गरज नसावी, शेर बोलतो जे काही बोलायचे ते.
मागे कुठेतरी तुमची तुकारामाची गझल वाचली होती, फार आवडली.
यावंत यावंत प्रोफेसर साहेब,
यावंत यावंत प्रोफेसर साहेब,
सुस्वागतम! (मी ओळखलं बरं का तुम्हाला, आता येऊदेत गझला)
स्वप्नात रोज येते तारुण्य सांडलेले.........
दुरुनी मला पहाते ते वाकुलीप्रमाणे!<<< वा
तुम्ही आलात हा फार मोठा आनंद
तुम्ही आलात हा फार मोठा आनंद आहे माझ्यासाठी
धन्यवाद सर
रचना नेहमीप्रमाणे आवडलीच
भूषणराव, समीर, वैभवा,
भूषणराव, समीर, वैभवा, धन्यवाद!
भूषणराव, ओरिजिनल नावासकट पातलो आहे. फक्त युसर नेम profspd धारण केले(प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर). असो.
समीर,
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वाटे हरेक जेवण मज दंगलीप्रमाणे!! या मिस-याच्या बुडाशी नुकत्याच घेतलेल्या विदेशी साहित्यिक(?) सोहळ्यातील दुर्दैवी जेवणावळींचा प्रत्यय आहे. असो.
प्रत्येक पोर मजला वाटे मुलाप्रमाणे.........
प्रत्येक माय वाटे मजला मुलीप्रमाणे!
उदात्त भावना मात्र वैश्विक नाही.<<<<<<<समजले नाही.
इतक्या चिन्हांची गरज नसावी, शेर बोलतो जे काही बोलायचे ते.<<<<<<<<खरे आहे, पण खोड लागून गेली.
माझी तुकारामांची गझल कुठे वाचलीस?
वैभवा, आशिर्वाद बाळा! कसा आहेस?
प्रा.सतीश देवपूरकर
छानच... आवडली
छानच...
आवडली
धन्यवाद अरविंदराव!
धन्यवाद अरविंदराव!
वाह,वाह,छानच!
वाह,वाह,छानच!
धन्यवाद
धन्यवाद
मतला फार आवडला.... गझलही
मतला फार आवडला....
गझलही छानच.
प्रणाम डॅाक्टर
प्रणाम डॅाक्टर साहेब!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!