माझी आजी

Submitted by rakhee_siji on 6 May, 2014 - 23:09

माझी आजी
माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख .
गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे.
ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली . आणि आम्हा सर्वांना एक सकारात्मक मेसेज दिला .
ती खूप चांगली manager आहे . सर्व नाती गोती तिने एका हाती सांभाळली . सर्वांना तिने एकत्र बांधून ठेवले .
सुखाच्या दुःखाच्या प्रसंगांना हसत मुखाने सामोरी गेली . मला वाटतं ती जर आजच्या काळात जन्मली असती तर ती नक्कीच एखाद्या कंपनीची CEO असती .
ती आजी असली तरी ती पारंपारिक जुनाट विचारांची नाही . नवीन जुन्याची सांगड घालून काय उत्तम आहे ते ती करते . नवीन उत्तम विचार , नवीन आत्मसात करण्याची तिची प्रवृत्ती आहे . ती नवीन युगाची आहे . मुलीनी खूप शिकावं , नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहावं यासाठी ती कायम ठाम राहिली .
अश्या माझ्या आजीला माझा प्रणाम . तिला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . तिच्यासाठी एक छोटीशी कविता .

आजी ग आजी
करतेस पुरणपोळी
मऊसूत तुझ्या हातापरी

चवदार इतकी
आठवली की
चव रेंगाळे जीभेवरी

तुझ्या ग गोष्टी
मोलाच्या किती
देई शिकवण जगण्यावरी

तुझी ग लढाई
जिद्द जिंकण्यापरी
देई उभारी आम्हासही …

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.
तुमच्या आजींना दंडवत. त्यांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना.... Happy

छान लिहिलंय.. अशा वटवृक्षाच्या सावलीत मिळणार थंडावा काय वर्णावा!
पण आजींबद्दल अजून वाचायला आवडलं असतं..

सही... मस्त आहेत तुमच्या आजी..... **TOUCHWOOD**
मला माझ्या आजेसासूंची आठवण आली. त्या पण अशाच आहेत... त्यांच्याबद्दल लिहेन कधीतरी....

खूप धन्यवाद शशांक ,डीडी आणि छानुली . @ डीडी मला पण अजून लिहायला पाहिजे असं वाटतं . अजून लिहिण्यासारखं खूप आहे पण मला व्यवस्थित मांडता येत नाही आहे .

आजींना नमस्कार आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.

नवीन जुन्याची सांगड घालून काय उत्तम आहे ते ती करते >>> हे वाचून माझी आजी आठवली.