मी असा गम्भीर का ?

Submitted by सुनिल जोग on 6 May, 2014 - 06:47

फार पुर्वी मला माणसांचे चेहरे वाचाय ची सवय होती. पुढे पुढे चेहरा पाहुन हा माणुस कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल किवा त्याची सामाजिक आर्थिक स्थिती कशी असेल याचा नेमका कयास मी यशस्वी पणे बांधु लागलो.
त्यावेळी मी मुक्त होतो. विचाराने, मनाने , कुठलिही बांधिल्की, किवा मनावर ओझे नसायचे.त्यामुळे खळाळुन हसायचो, चान्गल्या कवितेला, गाण्याला दाद द्यायचो. त्यावर मित्रमंडळीत चर्चा करायचो.

पण पुढे काहितरी गोची झाली. बहुधा मला थोडाफार पैसा मिळाला असावा किवा सोकॉल्ड प्रतिष्ठा मिळाली असावी.माझे हसणे कमी झाले. माझ्या चेहर्यावर सॉक्रेटिस सारखा गम्भीर भाव आला. केसांवर एक पान्ढरी रेष आली आणि मी मनोमन सुखावलो. आपण खरोखरच म्युचुअर्ड दिसायला लागलो की राव. मग कपड्यान्चा रंग बदलला, दिखाउ साधेपणा आला. आणि आपल्यावर खरोखरच सुखाची साय आली असा गोड गैरसमज मी करुन घेउ लागलो.

पण झाले काय की माझे आणि मित्र मंडळातील अंतर वाढले आणि एकेक करत सारे दुर जाउ लागले.

मग गोची कुठे आणि कशी झाली ? हं तर मी उगाचच गंभीर झालो. चेहर्यावर जेवढ्या आठ्या जास्त तेवढा बुजुर्ग हे दीनवाणे आहे हे पटु लागले. . हे असे सार्या समाजाचेच झालेय. आज काल प्रत्येक जण चिंतेत दिसतोय. उगाचच चिंता करायाचे व्यसन लागलेय प्रत्येकाला. तिकडे अमेरिकीत वादळ झालेय इकडे चिंता, मलेशियाचे विमान हरवले इक्डे चिंता ... मला त्या सश्याची गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले... पळा आभाळ पडले म्हणत जो तो पळत चिंता करत सुटलाय. मी म्हणतो आज ना उद्या मरायचे आहे तर उगाच दुसर्याची चिंता करुन का मरायचे ?

जाने दो दुनिया गयी तेल लगाने. मी मस्त ताणुन देणार आहे, मोबाईल बंद करुन उठल्यावर मिस्ड कॉल्स किवा व्हॉट्साअ‍ॅप पण चाळणार नाही. बघु जग बुडले तर बुडु दे मी मजा करणार..

मंडळी पण तुम्ही जागे रहा. ... काळजी कर ण्याचे काँट्रॅ़क्ट मी तुम्हाला दिलेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users