वाढ्दिवसाचे भेटकार्ड

Submitted by आशिका on 6 May, 2014 - 03:51

हे भेटकार्ड माझ्या सासूबाईनी स्वतः बनवून माझ्या लेकाच्या १० व्या वाढ्दिवसाला भेट दिले आहे.

Card.jpg

या कार्ड्चे महत्व यासाठी की ज्या व्यक्तीने हे बनवले आहे त्या माझ्या सासुबाईचे वय ७७ वर्षे असुन त्यानी स्वतः कोणतीही वस्तू विकत न आणता जुने केलेन्डर, लग्न पत्रिका, स्टीकर्स अशा वस्तू चा उपयोग करून हे कल्पकतेने बनवले आहे. तसेच बनवतानाही कुणाचीही मदत न घेता कातरकाम, चिकटवणे हे सर्व स्वतःच केले आहे , सगळ्यानाच चकित करायचे होते ना !!

या कार्डमधील सन्कल्पना (त्यान्च्याच शब्दात) :-

१. चि . निमिषला पक्षाची आवड आहे म्हणून असाच एक छान पक्षी त्याचा (६ मे हा) जन्मदिन घेऊन आला आहे.

२. वसन्त ॠतुत वाढ्दिवस येतो म्हणून फुलाची सजावट.

३. निमिषच्या जन्मानन्तरची ही १० वर्षे म्हणजे आजीच्या जीवनात चान्दण्याचा शिडकावाच जणू त्याचे प्रतिक म्हणून १० चान्दण्या.

४. कविताही आजीनेच रचलेली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेटकार्ड सुरेख आहे मला आवडलं. जरासा पारंपारिक टच आहे त्याला. Happy
बाकी तुझ्या मुलाला वादिहाशु Happy जरासा दर्शिल सफारी सारखा पण दिसतोय तो.

मस्त . मुलाला वादिहशु. आजी ग्रेट आहेत. आणि हो कार्डाची संकल्पना तुम्ही नीट लिहिल्यामुळे ते जास्त भावलं

आज्जींचं खूप खूप कौतूक. खूप कल्पक आणि छान कल्पना आहे. नेहमीच्या छापील गुळगुळीत चकचकीत महागड्या ग्रिटींग कार्ड्सपेक्षा खूप वेगळं. इतक्या कल्पकतेने, मेहनतीने आणि आपुलकीने केलेलं कार्ड बघून निमीष नक्की खूप खूष झाला असणार. निमीषला वाढदिवसाच्या अनेकानेक गोड शुभेच्छा.

जरासा दर्शिल सफारी सारखा पण दिसतोय तो.>> हो हो मलाही वाटला तसा Happy

खुपचच्छान आहे कार्ड.आज्जींच्या नातवाप्रती असलेल्या अस्सल भावना दर्शअवणारे. निमिष्ला वादीहाशु. आशिका तुम्हीपन सासुबाइंची कला आवर्जुन मा.बो.वर टकलीत .तुम्चेही कौतुक

निमिष ला हॅप्पी हॅप्पी बर्थ डे... किती आनंद झाला असेल त्याला आज्जी ने स्वतः केलेलं कार्ड पाहून आणी त्याचा आनंद , आजी ला समाधान देऊन गेला असेल...
खूप सुर्रेख आहे कार्ड...

दक्षिणा, हर्षा, साती, मनीमोहोर, मामी, दिनेश्जी, वेल, जागू, ड्रीमगर्ल, सुभाषिणी, वर्षु नील, कामिनी८

आपणां सर्वांस माझ्या, निमिष व आजींच्या वतीने मनापासून धन्यवाद.

दर्शिल सफारी सारखा दिसतो काय तोच आहे अस वाटल.. बाकी साबांच कौतुक कराव तेवढ कमीच आणि भेटकार्डात निमिषच्या आवडीचा, त्याने जन्म घेतलेल्या ऋतुचा आणि त्याच्या जन्मानंतर घरातल्यांच्या मनातल्या भावनांचा अगदी सगळ्याचा विचार केलाय त्यांनी.... मस्तच
निमिषला शुभेच्छा....

बादवे माझ्या भाच्याचही नाव निमिषच आहे.. या निमिषपेक्षा ५ वर्षांनी लहान Happy