वाचली तू पुस्तके

Submitted by अगाध on 5 May, 2014 - 07:38

अंतरी माझ्याच मी डोकावणे शिकलो
जे जसे आले तसे स्वीकारणे शिकलो .

अर्थ तर नाही तुला कळणार प्रेमाचा
वाचली तू पुस्तके, मी चांदणे शिकलो.

जिंदगीभर बोललो नाहीच खोटे मी
बस खरे बोलायचे, मी टाळणे शिकलो.

सांग,सच्चा शिष्य कोठे मी तुझा झालो ?
सर्व शिकलो पण कुठे मी मागणे शिकलो ?

फाटक्या कपड्यात माझी पोरगी दिसली
त्या क्षणापासून मीही लाजणे शिकलो..

हा उगाचच येत नाही माज नि:शब्दा
बोट मी पकडून माझे, चालणे शिकलो .

देवेंद्रा ०१/०५/२०१४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाटक्या कपड्यात माझी पोरगी दिसली
त्या क्षणापासून मीही लाजणे शिकलो>>> सुंदर तरी कसे म्हणावे? पण सत्य....

बाकी शेरही मस्तच