नखांचे आरोग्य

Submitted by गजानन on 29 April, 2014 - 09:11

तुमची नखं तुमच्या आरोग्याचा आरसा असतात, असं म्हटलं जातं.

उदा. निळसर नखं - हृदयाशी संबंधीत आजार, पिवळसर नखं - यकृताशी संबंधीत आजार इ.

१. एखाद्या बोटाचा 'नेल बेड' कमी होत असेल तर त्याचे कारण काय असावे? (दुसर्‍या हाताच्या त्याच बोटाच्या नेल बेडच्या तुलनेत २/३ मिमिचा तरी फरक )
२. कधी कधी नखांखाली पांढरे डाग येतात ते (जस्ताच्या अभावामुळे ?) माहीतच असेल. पण अगदी बारीक काळे डॉट्स कशामुळे येतात?
३. कधी कधी एखाद्या नखावर अगदी बारीक बारीक खड्डे का येतात? (ज्यामुळे नख वरून खडबडीत लागते).

यांसारखे प्रश्न, उत्तरे आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा करण्याकरता हा धागा उघडला आहे.

'नखांचे आरोग्य' हा विषय 'नखांचे सौंदर्य' या विषयाकडे वळवला जाऊ नये, ही अपेक्षा. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बी बोलता गजाभाव तुमी. आत्ता माबोवर विषय भरकटला नाही तर ती माबो कसली?:दिवा::फिदी:

असो, नखान्चा मूळ रन्ग हा गुलाबीच असला पाहीजे, ते निरोगी व्यक्तीमत्वाचे दर्शन आहे आणी तसेच नखान्च्या मुळापर्यन्त कॅल्शियम व्यवस्थीत मिळतय हे त्याचे प्रमाण आहे.

नखे जर ठिसुळ असली, कातरल्यासारखी असली किन्वा सहज कुरतडली जाऊ शकत असली ( सचीन टेन्शन मध्ये आला की नखे चावायचा तशी) तर शरीरात कॅल्शियम नक्कीच कमी आहे हे समजावे. आणी तसेच जिलेटीन चा आहारात समावेश असेल ( मान्साहारी लोकाना ते सहज शक्य असते, कारण ते त्याना तसे मिळते) तर नखे टणक रहातात.

नखान्वर काळे डाग का येतात ते नाही माहीत पण आरोग्याशीच सम्बन्धीत असणार ना? ( ज्योतिष्य विषयात याचा वेगळा चॅप्टर आहे) ते माबोवरचे तज्ञ डॉक्टर्स सान्गु शकतील.:स्मित:

मस्तं धागा.
पण जळ्ळं आता लिहायला वेळ नाही.
मेडिकल कॉलेजात पेशंटच्या तपासणीची सुरूवात नखापासून करायला शिकवतात.
आता भला मोठठा प्रतिसाद देण्याऐवजी एक लिंक देते.

http://www.rxpgonline.com/article1714.html

मग जमेल तसं लिहेन.

हे झालं आरोग्य तपासणीत नखांचं महत्त्व.
बाकी नॉर्मल लोकांनी नखाचे आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावं हे ही वेळ मिळताच लिहते.

माझ्या पायाच्या अंगठ्याचं नख वर्तुळाकार व्हायचं, आडव्या आणि उभ्या दोन्ही बाजूंनी. कापता यायचं नाही त्यामुळे. पुढे ते कधी ठिसूळ व्हायचं तर कधी त्यात जीव असल्या सारखं वाटायचं, कापायला गेलं तर दुखायचं.
डॉक्टरांनी एकदा त्यावर कुठल्या गोळ्या सांगितल्या. त्या घेतल्या तर अंगावर रॅशेस यायला लागले म्हणुन त्या बंद केल्या. हा त्रास कित्येक वर्षे सुरू होता.

मग काही वेगळ्याच कारणासाठी एकदा एका डॉक ने मला व्हिटॅमिन बी ची थेरपी दिली, (त्यात बी१२, फॉलिक ऍसिड, बायोटिन होते बहुटेक). त्यानंतर ते नख सुद्धा ठीक झालं.
हे याच व्हिटॅमिन बी गोळ्यांमुळे झाले, की योगायोग हे माहीत नाही.

बाळाची नखं त्याला आंघोळ घातल्यावर हळूवारपणे काढावीत. नाहीतर ते जखमा करुन घेतं

हो ना, दर 2 दिवसांनी वाढलेली दिसतात
माझं बाळ आता स्वतःला जखमा करत नाही, दुसऱ्यांना करतं.
थोडी मोठी झाली ना ती