सुपर अ‍ॅन्युएशन ग्रूप (पेन्शन) योजने बद्द्ल कोणाला माहीती आहे का?

Submitted by पीनी on 28 April, 2014 - 05:37

सुपर अ‍ॅन्युएशन ग्रूप योजने बद्द्ल कोणाला माहीती आहे का? मला कळलेल्या माहीतीनुसार -
१. ही योजना त्याच कंपनीमध्ये चालवली जाते जिथे एल्.आय्.सी. शी टाय अप आहे.
२. सुपर अ‍ॅन्युएशन साठी केलेली गुंतवणूक टॅक्स फ्री आहे. (८०C व्यतिरिक्त)
३. त्यावर मिळणारे व्याज देखील टॅक्स फ्री आहे.
४. ही पेन्शन योजना असल्यामुळे वयाचे ६० पूर्ण करेपर्यंत अथवा कंपनी सोडल्याशिवाय यातील पैसे काढून घेता येत नाहीत किंवा गुंतवणूक बंदही करता येत नाही.
५. ही योजना फक्त एल्.आय्.सी. तर्फे चालवण्यात येते.
६. यातील पैसे एन. पी. एस. प्रमाणे शेअर मार्केट मध्ये गुंतवत नाहीत.
७. ही योजना (अंदाजे) पी. पी. एफ. प्रमाणे व्याज देते.

प्रश्न -
१. वरील माहीती ऐकीव आहे. त्यामुळे बरोबर आहे का याची खात्री नाही. कोणी सांगू शकेल का?
[ही योजना एजंट चालवत नसल्यामुळे ओळखीच्या एजंटसना फारशी माहीती नव्हती. आणि एल्.आय्.सी. ऑफिस मध्ये फोन केला तर कोणी उचलला नाही.]
२. या योजनेतील काही रक्कम पैसे इंन्शुरन्स साठी वापरली जाते का?
३. यात दर महा काही अ‍ॅडमीन चार्ज घेतले जातात का?
४. पैसे परत मिळताना किती रक्कम एकदम काढून घेता येते. किती रक्कम दर महा मिळते. त्यावर टॅक्स लागतो का?
५. यात रिस्क काय आहेत?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद हरिहर.
@ राजू७६.
मला देखील असेच वाटत होते की कर्मचारी स्वतः यामध्ये गुंतवणूक करु शकत नाही. इंटरनेटवर सर्च केले तर तशीच माहीती मिळते. पण आमच्या कंपनीत ही योजना ऐच्छिक आहे. आणि कर्मचारी आपल्या पगारातून पैसे भरतात.
मला इंन्शुरन्स नको आहे. पण कंपनी म्हणते ही माहीती एल्.आय्.सी. ला विचारा. आणि एल्.आय्.सी. म्हणते प्रत्येक कंपनीचे वेगळे कॉन्ट्रॅक्ट आहे, कंपनीच सांगू शकेल.
Sad
इतर कोणी अशी गुंतवणूक केली असेल तर मला थोडा अंदाज येईल की इंन्शुरन्स साठी काही कट करतात का, अ‍ॅडमीन फी वगैरे वगैरे.

हे इंन्शुरन्स नाही तर एल आय सी सारख्या Financial Institutes हे पैसे शेयर/ मनी मॉर्केटमध्ये गूंतवणूक करतात.. जर कंपनी पैसे भरणार असेल तर चांगले नाही तर PPF उघडा.. या गूंतवणूकीचे तुम्ही सगळे पैसे एकदम काढू शकणार नाही.