प्रकाशदान

Submitted by रसप on 27 April, 2014 - 03:05

निर्जीव सुखाची जागा
प्राजक्तव्यथांच्या ओळी
ही रंगमाखली वेळ
अंगणवेडी रांगोळी

आकाशकोपरा माझा
अंधार जिथे विरघळला
तो दहिवर-गहिवर होउन
पानोपानी साकळला

शीतल वाऱ्याची शाल
गुरफटून घेतो आहे
मी ज्योत आतली माझ्या
रात्रीला देतो आहे

प्रत्येक कालचे स्वप्न
क्षितिजावर खोळंबावे
हे दु:खयुगांचे भोग
इतक्यात कसे संपावे ?

....रसप....
२७ एप्रिल २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/04/blog-post_27.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीतल वार्‍याची....कडवे पुन्हा पुन्हा वाचले.<<<

हेच कडवे मलाही आवडले व मीही दोनवेळा वाचले.

(मात्र ह्यावेळी लक्ष शब्दांमुळे थोडे दूर गेले आशयापासून)