आर यु कॅरिंग एनी फिलीपीनो करंसी विथ यु?

Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 25 April, 2014 - 02:40

कधी एकदा पुण्याला परत जातोय अस झालंय. त्यात परत मनिलाला पंधरा दिवसांसाठी जायच फर्मान आलं आणि काय अवदसा आठवली होती आणि ऑनसाईट असाईनमेंट्ला हो म्हंटलं अस वाटतय. पण जाण्याशिवाय गत्यंतर नाहीय.
सिंगापुर मनिला प्रवास तसा साडे-तिन तासांचा. चांगी विमानतळाहून रात्री १ वाजताचं विमान. साडे दहालाच चांगीला पोहोचलो. चेक इन साठी ही भली मोठी लाईन लागली होती. मी वेब्-चेकइन केलं होतं. वेब चेक्-इन च्या काउंटरवर माझ्या पुढे फक्त २ माणसे उभी होती. पाच्-सात मिनीटांत इमीग्रेशन वगैरे आटोपलं. बोर्डींग साठी वाट बघताना, मुंबई-सिंगापुर प्रवासातला त्या गुजरथी माणसाचा आनुभव आठवला. बसल्या बसल्या लॅपटॉप उघडून लिहून काढला. एकूण दिड्-दोनशे प्रवासी असावेत बहुतेक. एवढ्या फिलीपीनो लोकांमधे मी एकटाच भारतीय. एखाद दुसरा गोरा प्रवासी होता.
कस्टम फॉर्म भरताना लक्ष्यात आलं की माझ्या बॅगेत चाळीसहजार पेसो (फिलीपीनो करंसी) आहेत. नियमा प्रमाणे एक माणुस जास्तीत जास्त फक्त दहाहजार पेसो बरोबर आणु शकतो. गेल्यावेळी मनिलाहुन निघताना काढलेले पेसो कनव्हर्ट करायची गरज पडली नव्हती वा आळसामुळे राहून गेले होते.
लॅपटॉप बॅगेत कागदांमधे घालून ठेवलें. या आधी मनिलाला तिनचार चकरा झाल्या होत्या. कधी कुणी बॅगा तपासल्या नव्हत्या. त्यामुळे तसा निश्चींत होतो. पण मनात थोडी धुकधुक होतीत. स्वःतालाच दोष देत होतो.
सकाळी साडेचारच्या दरम्यान विमान मनिलाला लँड झालं.
इमीग्रेशन आटपून नेहमीप्रमाणे बाहेर जायला निघालो. माझ्याकडे एक हँड बॅग आणि एक लॅपटॉप बॅग होती फक्त.
कस्टम ऑफिसर हात दाखवून बोलावत होता. मी दुर्लक्ष केलं. पण ग्रीन चॅनल बंद होता.
सर. कम धिस वे प्लिज..
म्हणतात ना भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
फर्स्ट टाईम इन मनिला ?
नो सर. आय वर्क हियर..
ओह! ओके. आर यु कॅरिंग एनी फिलीपीनो करंसी विथ यु?
मनात कुठे तरी या प्रश्नाची भिती होतीच. ब्रम्हांड आठवलं.
येस. आय हॅव सम..जस्ट फॉर टॅक्सी.. (धादांत खोटं? .. अर्धसत्य?)
कॅन यु शो मी?
पाकीटात आधीच काही पेसो काढुन ठेवले होते.
मी पेसो शोधण्याचा प्रयत्न करत होतो. हातात सिंगापुर डॉलर लागले पण पेसो काही सापडत नव्हते.
आय निड टु चेक युवर बॅग्स सर.
आता आली का पंचाईत.
इतक्यात पाकीटातले पेसो सापडले. सातआठशेच्या नोटा होत्या फक्त.
ओह.. ओन्ली धिस मच?
मी काही न बोलता नुसता हसलो.
ओके. यु कॅन गो सर.
बॅगा उचलल्या आणि मागे न बघता सरळ टॅक्सी गाठली.
कान पकडले.. पुन्हा अशी चुक नाही करणार.
व्हेअर टु गो सर? टॅक्सी ड्राईव्हर डोळे चोळत विचारत होता... मकाती आर.सी.बी.सी. प्लाझा प्लीज..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users