10 mahinyachya mulana panchmrut dile tar chalte ka?

Submitted by मेघा कोकितकर on 22 April, 2014 - 06:49

Hi Friends,

Pls mala koni sangu shakel ka maji mulagi 10 mahinyachi ahe tila me panchamrut deu shakte ka?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

---

lahan balaver nako te experiment karu naka .

मुलीच्या डॉक्टरला विचारा.
इथे अमेरिकेत एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मध आणि दूध देऊ नका असं सांगतात. (म्हणजे स्तनपान आणि फॉर्म्युलाव्यतिरिक्त.)
बाकी दही, तूप आणि साखर चालावी.

मुलाला पंचामृत द्यायचा उद्देश काय आहे ?

पंचामृत उत्तम टॉनीक आहे. त्याची सुरवात अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे १/८ चमचा पासुन सुरु करुन काही त्रास होत नाहीना बघायला हरकत नाही.

माझ्या मुलीला ९ महिन्याची असताना केळ सुध्दा कुस्करुन आम्ही द्यायचो.

मसालेदार पदार्थ, तळकट पदार्थ हे देऊन नयेत पण दुध, दही, तुप. मध साखर हे अगदी सौम्य पदार्थ आहेत.

लहान मुलांना मध दिल्याने botulism नावाचा आजार होण्याची शक्यता असते. तेव्हा कृपया लहान मुलीला मध देऊ नका.
अधिक माहितीसाठी: http://www.cdc.gov/nczved/divisions/dfbmd/diseases/botulism/

मुलगी एक वर्षाची झाल्यावर थोडं थोडं द्यायला काहीच हरकत नाही. हळूहळू प्रमाण वाढवता येईल. पण जास्तीत जास्त अर्धी छोटी वाटी.
मुलीच्या डॉ.च्या कानावर घालून मग सुरूवात केलेली चांगली.

मी माझ्या मुलाला दिलेलं आहे. (तो एक वर्षाचा झाल्यावर सुरूवात केली. पुढचे ८-१० महिने दिलं. नंतर नंतर तोच कंटाळा करायला लागल्यावर बंद केलं.)

दूध शक्यतो गायीचंच असू दे.
तूप घरचं लोणकढंच हवं.

थोड्या प्रमाणात दिलेलं पंचामृत हे मुलांसाठी उत्तम टॉनिक आहे.

मी सुद्धा देते अनघ ला.... ( वय : १ वर्ष.. गेल्या १-२ महिन्यापासून देत आहे...) मस्त आवडीने मागून मागून आणि चाटून पुसून खातो.

प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा धागा काढण्यापेक्षा एकाच ठिकाणी विचारा की मेघाताई. तुम्हालाही बरे आणि पुढे कुणी वाचल्यास त्यानाही बरे!