ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा

Submitted by webmaster on 21 April, 2014 - 08:42

ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा
ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा
ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा
(हे वाहते पान आहे)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टेबलाच्या पलीकडे बसायचो तेव्हा ज्ये.ना. (मीच नव्हे, तर माझे सहकारीही) ज्ये.ना. वेगळी वागणूक द्यायचो. काम विचारण्यापूर्वी बसायला सांगणे, पाणी, कागदांच्या फोटोकॉपी काढून आणणे, रिसेप्शनवरून घ्यायचे फॉर्म्स हातात आणून देणे, ते भरून देणे, इ.इ.
यात काही विशेष करायचो असे मला वाटत नाही. हे सगळे केलेच पाहिजे.

आत्तापर्यंत तरी आईबाबांना जे. ना. म्हणून बहुतेक ब्यांकात चांगला अनुभव आलाय. काही वेळा कर्मचारी आत गेल्या गेल्या स्पष्ट सांगतात - ' आजोबा, आज खूप गर्दी आहे. खूप वेळ थांबावे लागेल. चार दिवसांनी अमुक वेळेत आलात तर तुम्हालाच बरे पडेल.' चार दिवसांनी गेल्यावर कर्मचारी स्वतः फॉर्म्स भरुन सगळे सोपस्कार पूर्ण करतात. आईबाबा फक्त सही करतात. काही वेळा आईबाबांची चेष्टाही करतात. दोघे एकटेच आहेत हे बहूतेक कर्मचर्‍यांना माहित आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्ण वागणूक मिळते.

इतरांना बैंकेचा चांगला अनुभव आला कारण त्यांना काम कसे करायचे ,नियम काय हे माहीत आहे .वितंडवाद टाळतात .
हे अगदी खरे.
पण बर्‍याच लोकांना नियम पाळण्याची शिस्त नसते. अपुरे भरलेले फॉर्म, चुकीची किंवा अपूर्ण माहिती, बँकेचे नियम माहित नसताना उगाचच वाद घालणे या गोष्टी पुष्कळदा दिसतात. मला घाई आहे म्हणून जरा रांग मोडून माझे काम आधी करावे अशी अपेक्षा असणे.
विशेषतः माझे अमेरिकेत अनेक वर्षे राहिलेले काही म्हातारे अनेक वर्षांनी भारतात जातात, ते नेहेमीच परत आल्यावर तक्रारी करतात, त्यांना कसा त्रास झाला, भारतातले नियम कसे वेड्यासारखे आहेत वगैरे.
आता तुम्हाला जे वेड्यासारखे वाटते ते भारताच्या दृष्टीने योग्य असेल अशी शंका पण येऊ नये? तिथे जाता, तिथले नियम पाळा, इथे आल्यावर इथले. अमेरिकेत येऊन इंजिनियरिंग केले म्हणजे तिथल्या बँकेचे नियम काय असावेत हे सांगण्याचा काय अधिकार तुम्हाला?
तिथे बर्‍याच ठिकाणी धूम्रपान करायला परवानगी आहे, इथे नाही. मग भारतातल्या माणसाने इथे येऊन म्हंटले की हा कसला नियम? तर? किंवा डाव्या बाजूचा रस्ता मोकळा आहे, मग मी जरा तिकडून गाडी चालवून पुढे गेलो तर काय बिघडले, असे म्हंटले तर?

पेन्शनचा दुरूपयोग करू नये याकरिता त्याचे नियम एकच आहेत .ज्येनां नी स्वत: सही करून ते प्रत्येकवेळी काढले पाहिजे .आजारींसाठी डॉक्टरचे सर्टि० प्रत्येकवेळी नवीन देण्याचा नियम आहे .

पोस्ट आणि काही बैंका हा नियम कसोशिने पाळतात ते वाईट ठरतात .माझी आत्या अमेरिकेत जाऊन आजारी पडल्यावर तिचे पोस्टातले पेन्शन बुडले .
आता महा०बैंकेने सासूला एटिएम काड आणि चेकबुक दिले .अशी सवलत देणाऱ्या बैंका चांगल्या ठरतात .भांडणे होतात अमुक ठिकाणी असं आहे इथेही द्या .

नोव्हेंबरमध्ये नुतनीकरण सर्टिफिकेट देइपर्यंत याचा दुरुपयोग होऊ शकतो .

कसे आहात लोक्स? उन्हाळा खूप होतोय. तब्बेती सांभाळा Happy डायबेटीस नसेल तर रोज एक मोरावळा/बेल कँडी/गुलकंद खा. भरपूर पाणी प्या.

चक्क 2014 नंतर इथं कुणाचा वावर नाही?
गृप चालू आहे का?
मी नवीन सभासद आहे म्हणून विचारलं

आहे ना पण तुमचे आधार कार्ड लागेल. हा सिनेअर सिटिझन गृप आहे. खालील माहिती द्या.

१) मुले अमेरिकेत स्थाईक आहेत का?
२) घरून बाग काम करता का?
३) तब्येतीच्या तक्रारी काय आहेत?
४) छंद काय व कोणते?
५) एक जुनी आठवण लिहावी लागेल. ६० किंवा ७० च्या दशकातली.
६) आजच्या घडीला होम क्वारंटाइन करत आहात का ते लिहा.

१. नाही.
२. नाही. घरून बाग काम म्हणजे वर्क फ्रॉम होम सारख काही असत का?. तर सध्या वर्क फ्रॉम होम. Happy
३. नाही. नाहीच म्हणायच. तक्रार कशाला. त्यांच्याशी मैत्री केलीय.
४. टोटल टी पी. Happy
५.कोयना भूकंप. अजूनही घर कस हालत होत आठवतय.
६. हो

वेबमास्टर सर. हे वाहत पान कशाला ठेवताय. ज्येनांचे अनुभव समस्या राहू दे की जालावर. सर्वांनाच सुदैवाने ज्येना व्हायचय. Happy

नाही, अजिबात बाहेर नाही जात. कारण, घरात दोनच मास्क आहेत व तेही नातवाच्या दप्तरात - एक टाॅमचा आणि दुसरा जेरीचा !!!20190207_220711.jpg