काय करू बरं

Submitted by रमा. on 21 April, 2014 - 00:01

लई बोर करते मी हे जरी माहीत आहे
करू काय मी पण आदतसे मजबूर आहे

छानपैकी खाणे-पिणे असता सुरू
सारखा रडकाच माझा सूर आहे

FB, वॉट्सअ‍ॅपवर कित्ती छळू
एकेक मैतर अंतराने दूर आहे

आहेत सगळे अत्यंत आताशा बिझी
वैताग देण्या त्यांस मी आतूर आहे

जोक्स राहू दे जरासे साईडला हो
आठवांनी दाटलेली हूरहूर आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users