मत
म माझ्या महाराष्ट्रात 'मं' ची सभा भरली
मराठा, माळी की मुस्लिम म्हणत 'म' ची गफलत उड़ली
पण आपला नेता येईल म्हणून हजेरी सर्वानी लावली
तोच म म्हणत मफलर डोलत स्टेजवर आली
अन फक्त माळीनीच टाळी वाजवली
म म मिनिटांत मुंडेंची हजेरी लागली
मी मराठा म्हणत धुन जोरात वाजली
आपला म येईना म्हणून मुस्लिमांनी मात्र बळजबरी मुंडी हलवली
म म्हणून मंचावरून 'मं' ची सुटका झाली
म म म म्हणत 'मं' ची मर्सिडीज धावत सुटली
म माझा माणूस घरची वाट शोधली
तोच, म माझ्या माडीत लाइट मात्र हरवली
म माझ्या मायन म मेणबत्ती लावली
मग,
म मजकडे पहात, म माझ्या मायन, म मा मायेन
म मऊ गालावर , म मा मारली !
दनकन आवाज झाला, अन माझी जीभ सुटली
" ये आय... , आपल्यावर परत ,"
"चुप, म..म..माझा म्हणण्याचा नाद सोड,
म..म..मत नकोय, आता हवय मत ठाम !"
तापल डोक शांत झाल, मग योग्य ते सुचल !
बस !, आता तुम्हीही ठरवा,
'मन' निर्धार करा, 'मत' ठोका
योग्य निवडा, देश घडवा !
- निवृत्ति भामरे, नाशिक