अब की बार 'मी' सरकार

Submitted by निव्रुत्ती भामरे on 20 April, 2014 - 10:30

कविता -

अब की बार 'मी' सरकार

नोकरी गेली, आता बायकोन सोडण्याची वेळ आलीय
अन गण्या म्हणे ,"मोदीची पण आहे बायको !"
फक्त रिशेशन सांगून मोकळा झाला मॅनेजर
तरी गण्या म्हणे, "मोदीन असा करावा कायको ?"

पन्नास वर्ष फुकतात गेली , चक्क राजभवन माखल
अन साग्या म्हणे ," पन्नास दिवसांत 'आप'न काय केल ?"
कांग्रेस च्या नावान गवत वाढली, तननाशक ही मुकल
तरी साग्या म्हणे, "अऱविंदच चुकल !"

'म' म्हटले की मराठी उठले अन 'शिव' म्हटले की शिवसैनिक सुटले
अन पप्या म्हणे ,"काय वाटत कोण आहे RIGHT ?"
दगडफेक च्या मारात पप्याचा बाप कालतक जख्मी लेटले
तरी आजतक म्हणे ,"अब होगी कड़वी FIGHT!"

देवारयातल्या रामावर चमकत नहीं LIGHT
अन नंदया म्हणे ,"राममंदिराची पक्की झालीय SITE !"
देवाच्या नावान नकोय वोट, आम्हाला विकास हवाय
पुढे भाजपा म्हणे, " MAY I RIGHT?"

'एकाच माळीचे मणि'त जाहिरात प्रत्येक मिनिटांत
अन कार्टून म्हणे, " अब की बार मोदी सरकार !"
पांच वर्ष ढुंकलेच नाहीत असे खजूर मार्केट मध्ये उतरवाल
तर रव्या म्हणे, "मोदी, कस येईल आपल सरकार?"

"साला अरविंद लय चढतोय, त्याला इंगाच दाखवतो", मंत्री भाषणात तापला
मग गोट्या म्हणे ,"जाने दो ना साहब नया है वह !"
"क्या नया है वह?", दगडू घुस्यात म्हटला
अन मला हसू फुटला !

आता मी म्हणतोय,
"आता टाईमपास संपला, गण्या- पप्या -गोट्या च सोडा
'मन' निर्धार करा , 'मत' ठोका
योग्य निवडा, देश घड़वा !

आता तुम्ही सन्मानान म्हणा,
"अब की बार, 'मीं' सरकार !"

- निवृत्ति भामरे, नाशिक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users