Submitted by शबाना on 18 April, 2014 - 16:18
या लेखमालेतील पुढील काही लेख माझ्या अनुदिनीवर प्रकाशित केले आहेत. सर्व लेख एका ठिकाणी संकलित केले जावेत आणि माझ्या पुढील लेखनासाठी वेळ मिळावा म्हणून एकाच ठिकाणी मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना हे लिखाण वाचण्याची इच्छा आहे त्यांनी अनुदिनीवर वाचावेत.
मी हे लिखाण आवड म्हणून करत आहे. नोकरी आणि संसार अशा दोन्ही आघाड्या सांभाळून हे लिखाण चालू आहे. एका पेक्षा अधिक ठिकाणी लिहिणे आणि प्रतिक्रियांना सामावून घेणे थोडे अवघड जात आहे, म्हणून हा बदल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमचं धोरण पटलं नाही. इथे
तुमचं धोरण पटलं नाही. इथे सगळेच नोकरी संसार सांभाळून लिहितात.
एक्स्क्लूजिव माबो लेखक असे कुणी नाही.
मूळात प्रत्येक प्रतिक्रीयेला सामावून घेतले पाहिजे असे अज्जिबात नाही.
आणि कुचाळक्या करणार्यांचा मनस्ताप करून घेऊ नये. इथे लोकांना स्वतःचं तुणतुणं वाजवायची वाईट सवय आहे.
इतक्या सेंसिटीव विषयावर लिहिताना अश्या प्रतिक्रीया येतीलच अशी मानसिक तयारी ठेवायला हवी.
असो. मी काही ब्लॉगवर जाऊन वाचायचे कष्टं घेईन असे वाटत नाही.
तुझ्या पुढिल ब्लॉग लेखनाला शुभेच्छा.
साती, तुमचा निर्धारपूर्वक
साती,
तुमचा निर्धारपूर्वक नकार- मी काही ब्लॉगवर जाऊन वाचायचे कष्टं घेईन असे वाटत नाही.--ऐकून मात्र मी माझा विचार बदलला.
इथेही पोस्ट करते.
पूर्णवेळ लिखाण या अर्थाने की उपरोक्त विषय माझ्या पदव्युत्तर अभ्यास किंवा व्यावसायिक कामाचा भाग नाही.
>>>>> तुमचा निर्धारपूर्वक
>>>>> तुमचा निर्धारपूर्वक नकार- मी काही ब्लॉगवर जाऊन वाचायचे कष्टं घेईन असे वाटत नाही.--ऐकून मात्र मी माझा विचार बदलला. स्मित इथेही पोस्ट करते. <<<<<<
व्हेरी गुड्ड!
तुमच्या अभ्यासात/व्यासन्गात तुम्हाला जे काही भासलय/ तुम्ही अभ्यासलय्/ तुम्हाला वाटलय-पटलय, अन कुणालातरी त्याबद्दल बरच काही सान्गावस वाटतय, अस असेल तर मायबोलिसारखे व्यासपीठच हवे
साती म्हणते तसे, सर्वच प्रतिक्रियान्ना उत्तर द्यायच्या भानगडित पडूच नका, किम्बहुना, प्रतिक्रियान्ना उत्तर दिलेच पाहिजे अशी सक्ति इथे नाही.
तुम्ही जर काही अभ्यासपूर्ण लिहीलेत, तर इथे त्याला हुकमी अभ्यासू वाचक मिळतील तसेच कुचाळक्या करणारे वा एकान्गी विचार करणारेही भेटतील.
प्रश्न असा आहे, की तुमचे अभ्यासाद्वारे तुमच्याच मनात देवदयेने उद्भवलेल्ल्या विचारांना प्रसिद्धि देणे हे योग्य वाटत असेल तर अर्थातच ते करीत रहा. त्याबाबत कोण काय म्हणते आहे याचा विचार करु नये.
मतभेद होऊ शकतात, पण प्रत्येक मतभेदामुळे एकेक माणसापासून दूर होत गेलो तर काही दिवसातच एकट्यानेच हिमालयात जाऊन रहावे लागेल.
सबब, तुमच्या सत्सद्विवेक बुद्धिला जे पटेल ते जरुर लिहीत रहा.
स्वतःचा ब्लॉग वगैरे बनवुन त्यावर लिहीत रहाणे हे निदान मला तरी "बाथरुममधे आन्घोळीच्या वेळेस म्हणल्या जाणार्या गाण्यासारखे" वाटते...... आपणच गायक, आपणच श्रोते, तसे आपणच लेखक, आपणच वाचक! अन म्हणूनच मी आजवर माझा असा ब्लॉग बनविण्याचा गम्भिर प्रयत्न कधी केलाच नाही व मायबोली या व्यासपीठाशी एकनिष्थ राहिलो.
आता तुमचे बघा बोवा तुम्हीच काय करताय ते!