" बळ "

Submitted by -शाम on 14 April, 2014 - 11:05

तिलाही किळस येते
तिलाही त्रास होतो...

खाटेचे भाडे भरताना
दलालीचा हिस्सा करताना

आणि
क्षणाक्षणाला चुरडत जाताना...

पडले घरटे फांदीला टांगता येत नाही
औषधाने बुक्क्याचे कुंकू होत नाही

सगळ्या घिरट्या
सगळे आक्रोश
थंड होत जाताना

ती विनवते आभाळाला ...
पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत
विझू देऊ नकोस
या जगाची आग...
_____________________________ शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रिया आणि रिया,

शामच्या कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम पुण्यात ठेवण्याची कल्पना कशी वाटते?

शामबरोबरच भारती बिर्जे डिग्गीकर आणि क्रांति सडेकरही?