पायात क्रॅम्पस् येणे

Submitted by प्रमोद् ताम्बे on 11 April, 2014 - 08:00

माझ्या पायांना वरचेवर क्रॅम्पस् येतात व आले की मरणाचा त्रास होतो.जाता जात नाहीत.कधी कधी एक-एक तासही टिकतात.पायाची जराही हालचाल केली की जास्तच त्रास होतो. मग कधीतरी आले तसेच अचानक सुटतात. यावर कुणी मला हे क्रॅम्पस् येण्याचे कारण व त्यावरचे एखादे औषध सांगेल का ? काही पथ्ये असतील तर तीही सुचवावीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

calcium defficiency हे कारण असु शकतं.
डॉक्टरांना विचारून calcium supplement चालू करू शकता.

पाणी भरपूर प्या. खरे लिहीतीय. पाणी कमी प्यायले गेले की डोकेदुखी पण चालू होते. प्रयोग करुन बघा. कदाचीत पाण्याने फरक पडेल.

http://www.medicinenet.com/muscle_cramps/article.htm

Vayu Mudra_0.JPG
वातमुद्रा: वर चित्रात दाखवल्याप्रमाणे अंगठ्याच्या बाजूचे बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचे व त्यावर अंगठ्याने दाब द्यायचा.
पायात येणार्‍या क्रॅम्प्सवर(गोळे) एक उत्तम आणि प्रभावी योगमुद्रा आहे..ती म्हणजे वातमुद्रा...जेव्हा केव्हा असा वात गोळा पायात येईल तेव्हा जरूर करा..दोन ते तीन मिनिटात तो गोळा आपोआप निघून जाईल.
मलाही हा त्रास आहे आणि ह्या मुद्रेचा मला नेहमीच फायदा होतो...हा स्वानुभव आहे म्हणूनच इतक्या खात्रीने सांगतोय.
पेनकिलर गोळी जसे काम करते..तशाच प्रकारचे काम ही मुद्रा करते.
बाकी, कोणत्या कमतरतेमुळे (जीवनसत्त्व इत्यादि) हा त्रास होतो आणि त्यावर कायम स्वरूपी काय उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

हो मुद्रेबाबत माझ्या आईचा पण अनूभव चान्गला आहे. आईने मला वरील झेरॉक्स दिल्या होत्या. पण आळशीपणाने मी त्या बाजूला ठेवल्या. प्रमोद देव धन्यवाद.:स्मित:

वात मुद्रेबरोबर अपान मुद्रा आणि अपान वायू मुद्रा देखील पूरक ठरतात!

ह्या नावांनी गूगल करून बघा. एकेक मुद्रा साधारण १०-१५ मिनिटे ठेवल्याने चांगला फायदा होतो. (बसल्या-बसल्या सहज करता येते!)

''आरोग्य-मुद्रा'' नावाचे एक छोटेसे पुस्तक आहे. पॉकेटबुक. अप्पा बळवंत चौकात सहज मिळू शकेल. प्रत्येक मुद्रेचे चित्र आणि त्यामुळे मिळणारे फायदे इत्यादी लिहिले आहेत. अवश्य पाहावे.

तसेच पायात गोळे हे कोणत्या व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे येत नाहीयेत ना, हेही तपासून घेणे.
पाणी पिण्याबाबत अनुमोदन.

पायात गोळे आल्यावर जनरली उभे राहणेही अवघड असते, परंतु त्या वेळी जमेल तसे (अगदी वाटल्यास आधार घेऊन!) चालले की गोळे कमी होतात हाही एक उपाय आहे.

ह्यावर अगदी रामबाण उपाय

ह्यावर अगदी रामबाण उपाय म्हणजे रोज पहाटे अनाशापोटी दोन डोंगरी आवळे खा. लगेच फरक पडतो. मलाही हा त्रास होता पण आवळ्यामुळे एकदम दुर झाला.

माबो च्या वर्षा विहार ला हा उपाय देवकाकांनी सांगितला होता. उत्तम उपाय. खूप च फरक पडतो.
धन्यवाद देव काका.
प्रमोद काका , प्रमोद काकांचा उपाय करून पहा. Happy

शेलकॅल ५०० या कॅलशियमची रोज एक गोळी घेतो. केली खाऊ शकत नाही कारण मला साखरेची गोड व्याधी आहे ना ! गेले वर्षभर मी प्रयत्नपूर्वक जास्त पाणी पितच आहे. एका डॉक्टर मित्रांनी सुचवल्यावरून मी एव्हीऑन-४०० या गोळ्या मी गेले काही दिवस घेत आहे,त्याचा परिणाम म्हनून असेल कदाचित पण जरी क्रॅम्पस् आले तरी लवकर जातात.
आता बी यांनी सांगितलेला उपाय म्हणजे रोज सकाळी अनशापोटी दोन डोंगरी आवळे खाऊन बघणार आहे, कारण हा बी यांचा स्वानुभव आहे व लगेच फरक पडतो असे ते लिहितात.

अहो 'बी' मला एक सांगाल का ? की हे दोन मोठे डोंगरी आवळे एकाच वेळी खायचे कसे ? का रस काढून प्यायचा ? साखर घातली तर चालते का ? जरा सविस्तर मार्गदर्शन कराल तर बरे होईल.

तांबे काका, मी योगा शिकवतो. योगानी फरक पडणार नाही. पण जर उज्जेयी केली तर वात निघून जातो.

तुम्ही डोंगरी आवळे काय खात रहा. आवळ्याचा रस वगैरे काढायचा नाही. अगदी कचकच चावून त्यातला रस प्राशन करायचा. दात आंबतील ही भिती बाळगायची नाही. आवळा खाल्ला की कोमटसर पाण्याची गुळणी करुन ते पाणी पिऊन टाकायचे. चुळ बाहेर टाकायची नाही. आवळे खाल्यानी दात उलट मजबुत होतात. पाणी गोड लागत नंतर Happy

जेवण करुन आवळे खाऊ नका. जर दोन आवळे जास्त होत असतील एकानी सुरवात करा.

मी रोज एक आवळा खातो. खूप फायदा होतो. अनेक फायदे आहेत आवळे खाण्याचे. ते सगळे फायदे तुम्हाला मिळोत.

प्रमोद,
डॉ. शांताराम काणे , sgkane@gmail.com, 2567 2833/6160
यांना विचारून बघ. माझ्या सौ. च्या पायाचे दुखणे, जे इथे कुणालाहि बरे करता आले नाही ते त्यांनी केले.

बाळंतपणात पिंढरीत (??) गोळे यायचे ते भयंकर फार भयंकर असायचे. (पिंढरी बरोबर शब्द आहे का, खुप वर्षात वापरला नाही म्हणजे पायाची मागची मऊ बाजु). तिथेच तुम्हाला पण गोळे येतात ना?

मग डॉ.ने उपाय सांगितला तो असा -
भिंतीला हात टेकवुन पाय भिंतीपासुन फुटावर लांब ठेऊन उभे रहायचे.
मग ज्या पायात गोळा आलात तो अजुन जरा मागे न्यायचा व त्याचबरोबर त्याच पायाचे पाऊल पण पायाच्या सरळ रेषेत करायचा प्रयत्न करुन ताणायचे. भार दुसर्‍या पायवर असुद्या. एकावेळी एकाच पायात गोळे आले असेल तर हे करावे, नाहीतर बसल्याबसल्या करावे दोन्ही पायांना. ह्यात पिंढरीत ताण यायला हवा. तर पाऊल असे जमेल तितके सरळ करायचे व त्या ताणलेल्या स्थितीत ४-५-१० सेकंद गोळा जिरेपर्यंत उभे रहायचे. पिंढरी हळुच ताणली जाईल असे बघा, एकदम भस्स्कन ताणायला जायचे नाही. मग त्या ताणाने एकदम आकुंचन पावलेला स्नायु हळुहळु प्रसरण पावतो व गोळा निघुन जातो.

आता बाळंतपण वगैरे संपुन खुप काळ झाला तरी, कधीकधी एकदम झोपेत असताना अचानक असा गोळा येतो तेव्हा उठुन भिंतीकडे जाऊन ताणण्याऐवजी सरळ झोपल्याझोपल्याच पाय बेडवरच (उभा, एका अंगावर कसाही) ठेऊन फक्त पाऊल ताणवुन सरळ करते. त्यानेपण योग्य तो ताण येतो पिंढरीवर व गोळा हळुहळु नष्ट होतो.

हे नक्की करुन पहा पुढ्च्यावेळी. आधी हवीतर चक्क प्रॅक्टीस करा. अशा आहे ह्याचा मला झाला तसा तुम्हाला उपयोग होईल.

माहिती आहे हे किती भयंकर दुखते. मला ३ सेकंद पण सहन होत नसे. तुम्हाला तर इतके जास्तवेळ सहन करायला लागते हा विचार करुन माझेच पाय दुखु लागले. खरच.

खुप शुभेच्छा.

वर रश्मी यांनी सुचवल्याप्रमाणे भरपुर पाणी पिऊन बघा. मलाही त्रास व्हायचा , पण पाणी भरपुर प्यायला लागल्या पासुन अजिबात त्रास नाही आणि हो , क्रॅम्स आले की पाय तसाच न हलवता ५ मिनिटं ठेवायचा , क्रॅम्प हळूहळू ओसरतात (?) , हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर मात्र जाम त्रास होतो.
सुनिधी पिंढरी शब्द बरोबर आहे , किमान आम्ही तरी तोच शब्द वापरतो.

दुपारपासूनच लिहायचे होते, पण असे साहस करण्यासही एक 'वेळ' यावी लागते.

'बी' ह्यांचा प्रतिसाद सर्वोत्तम असल्याचे नेमके कशावरून ठरले / ठरते हेच आकलन होत नाही.

आनंद म्हसकर वर्गमित्राला बरे करण्यासाठी भारतातले फोन नंबर्स देतात ही वस्तूस्थिती हास्यस्फोटक आहे.

माझे 'विपूवाचन' चांगले आहे वगैरे उपरोधिक अभिप्राय टाळल्यास आभारी राहीन.

सुनिधींचा प्रतिसाद 'लिंगनिरपेक्ष' आहे की नाही हे संयुक्ताने ठरवावे.

सर,

पायात क्रॅम्प्स येत असतील तर डॉक्टरला भेटा / मायबोलीवर विचारा, ह्यातील दुसरा पर्याय निवडलात ह्याला काय म्हणावे?

-'बेफिकीर'!

(तुम्हाला काहीही चेक करून घ्या असं सांगूनही फायदा नाहीच आहे )<<<

सर,

पाणी प्या, केळी खा, इंडराल किंवा सिप्लार एल ए ४० ह्यातील एक गोळी घ्या आणि इब्लिस, कैलास गायकवाड, साती, सुरेश ह्यांच्यापैकी कोणालाही विपू करा, ते खराखुरा उपाय सुचवतील.

धन्यवाद सामी!
सामी, आजवर हा उपाय मी कैक लोकांना सांगितलाय आणि त्यापैकी ज्यांनी हा प्रामाणिकपणे केला त्यांना त्याचा खचितच फायदा झाल्याचे त्यांनी मला आवर्जून सांगितले आहे...अर्थात हे सगळे उपाय आधीपासूनच जगजाहीर होते आणि आहेत...मी फक्त त्याचा स्वतः अनुभव घेतला आणि म्हणूनच इतरांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून सांगत असतो...माझं तत्त्वच आहे...अनुभवाविण मान डोलवू नको रे!
तांबेसाहेब, मी अतिशय सोपा उपाय सांगितलाय आणि तोही स्वानुभव आहे म्हणूनच....
म्हणून ज्यांना हा असा त्रास असेल त्यांनी मी सांगितलेला पर्याय जरूर अजमावून पाहावा...उपयोग नाही झाला तर द्या सोडून...कारण त्यात एकाही पैशाचा खर्च तर नाहीच किंवा काही अवघड अशी शारिरीक क्रियाही नाहीये.

आवळा खुपच औषधी आहे त्यामुळे फरक पडेल. पाणी पिणे पण योग्य आहे. सकाळी उठल्यावर आणखी एक उपाय रोज करावा. घोट्यापासुन पाय चक्राकार फिरवावा. घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ५ वेळा आणि विरुध्द दिशेने ५ वेळा असे दोन्ही पायांनी.

हा व्यायाम आपण झोपले असताना जाग आल्यावर अंधरुणातच करा किंवा उठुन बसा. पलंगावरुन पाय खाली सोडुन करा. हा व्यायाम साधारण १ ते २ मिनीटात आटपतो पण पायामधले रक्ताभिसरण सुधारण्य्यास उपयोग होतो.

अनुभव कळवा.

बराच खर्च करून अनेक पॅथ्यांचे डॉक्टरी इलाज करून झाले व चालूही असतात पण पैसे जाऊनही दुखणे मात्र तसेच असल्याने सहज विचार मनात आला की मायबोलीवर प्रश्न विचारल्यास ज्यांना याच प्रकारचा त्रास होता व एखाद्या औषधाने जर तो बारा झाल्याचा त्यांचा स्वतःचा अनुभव असेल तर आपल्याही तो करून बघता येईल.
'बी' याचा उपाय मला सर्वोत्तम वाटला याचे कारण त्या उपायाने त्यांना स्वत:ला :गुण आला हे एक,दुसरे आवळा हा बहुगुणी आहे हे मला खूप वर्षांपासून नक्की माहिती आहे,त्यामुळे कदाचित त्याचा हाही गूण असणे अशक्य नाही,तिसरे डोंगरी आवळा हा सहज उपलब्ध होऊ शकतो व त्याची किंमतही खिशाला परवडेल अशीच आहे. त्यामुळे मला ही कदाचित त्याने गुण येऊ शकेल आणि नाही झाला तरी अपाय तर नक्कीच होणार नाही असाच विचार निदान मी तसरी केला.

सुजा, तुम्ही suganril म्हणतांय कां?? या गोळ्या Acute Gout मुळे आलेली सूज उतरवण्यासाठी असतांत. माझ्या वडिलांना या prescribe केल्या गेल्या होत्या.

ताम्बे साहेब, पोटातुन घेणारे कुठलेही औषध अथवा आणखीही काही सेवन /प्राशन करणे यापेक्षा डॉक्टरी सल्ला घेणं केव्हाही श्रेयस्कर. नक्की कुठल्या कारणाने क्रॅम्प्स येत आहेत त्याचे निदान तरी करवुन घ्या. अगदी व्यायाम देखिल तज्ञांच्या सल्ल्यानुसार करा. देव काकांनी सुचवलेली मुद्रा करुन पहायला हरकत नाही.

भ्रमर एकदम बरोबर कारण सल्ले देणारे आम्ही कुणी डॉक नाही आहोत.:फिदी:

डॉ. साती, इब्लिस आणी कैलास गायकवाड कुठेत?

हो भ्रमर तू म्हणतो आहेस त्याच गोळ्या . मला पण हा त्रास बरेचदा होतो. माझ्या आईला बर्याच वर्षांपूर्वी डॉक्टरांनी सुचवल्या होत्या. कारण तिला पण हाच त्रास आहे . ती पण याच गोळ्या घेते आणि मी पण .आम्हाला दोघीनाही त्याचा ताबडतोब फायदा होतो Happy

सगळ्यान्चे प्रतिसाद वाचले... मला पण हा त्रास गेली अनेक वर्षे आहे ....पायात गोळा आला की सरळ दोघी पावले जमीनीवर टेकवुन उभे रहाणे आणी वर दिलेली मुद्रा करावी .... नक्कीच गोळा कमी होतो....ह्यासाठी preventive म्हणुन ..... लिम्बु पाणी प्यावे आणी जवळ Dark Chocolate ठेवावे .... त्यात पॉटॅशिअम आणी कोका असते त्यामू ळे असे गोळे येणे नक्किच कमी होते ....डायबेटिस असेल तरी ह्या Dark Chocolate मधे साखर नसते .. ( अर्थात लेबल पाहुन घ्यावे ) ...

आपल्याला आराम पडेल नाक्किच ....

हालचालीने अन्न जळते आणि अशुध्द द्रव्ये तयार होतात .ती मूत्रातून बाहेर पडली नाहीत की पायात जमा होतात .त्याने पायांत पिंढऱ्यांत पेटके येतात .खेळाडूंनाही मरेथॉन धावणारे यांना हाच त्रास होतो .एवढेच सांगतो .

हालचालीने अन्न जळते आणि अशुध्द द्रव्ये तयार होतात .ती मूत्रातून बाहेर पडली नाहीत की पायात जमा होतात .त्याने पायांत पिंढऱ्यांत पेटके येतात >>> एतेन

बेफिकीर,
'पाय' हा अवयव लिंगनिरपेक्ष असतो का? नाही ना? मग? तो तर प्राणीजात निरपेक्ष असतो.