शून्य उरलेले.

Submitted by धनेष नंबियार on 1 April, 2014 - 10:18

नयनी तुझ्या गीत सजलेले,
मनही माझे त्यात रमलेले.

गुंतत गेलो तुझ्याच शब्दात,
कळले नाही घात लपलेले.

कशास हवे खोटे देखावे ?
सगळे काही रंग उडलेले.

आशेपोटी आकडेमोड ही,
फसली आशा, शून्य उरलेले.

नको 'धनेषा' प्रयत्न फुकाचा,
जुळणे नाही नाळ तुटलेले...

- धनेष नंबियार (३१-३-२०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच ख्याल आवडले धनेषजी

वैभवजी सांगत आहेत तसं लयीचं बहाल

धन्यवाद