मी कित्ती लकी... !!!

Submitted by पीनी on 29 March, 2014 - 04:05

खूप वेळा अगदी थोडक्यात एखादी गोष्ट हुकते.. थोडक्यात एखादा चान्स जातो.. मग वाटते की लक फॅक्टर आपल्याला नाही लाभत बरं का... आपल्याला जे काही मिळतं ते प्रचंड कष्टामुळेच...
पण कधी कधी अगदी छोट्या प्रसंगी आपण लकी ठरतो.. खूप मोठी घटना असतेच असं नाही.. किंवा खूप मोठी अचिव्ह्मेंटही नसते ती..
पण तरीही छोट्या लकी गोष्टी लक्षात ठेवणे, एन्जॉय करणे मला आवडते...
१. मी कंपनी जॉईन केली तेंव्हा एच आर ने सांगितलं होता कि तू या या तारखे नंतर जॉईन झालीस, त्यामुळे तुला आता पगार वाढ ह्या नाही पुढच्या वर्षी (५ मिनिटे लागली या शब्दाला Sad ) मिळेल. मला हा अंदाज होताच. पण काही दिवसांनी जेंव्हा पगारवाढ जाहीर झाली तेंव्हा मलाही पगारवाढीचे ई पत्र आले.. अधिक चौकशी केली तेंव्हा कळले की फक्त या वर्षी मी ज्या दिवशी जॉईन केलं त्या दिवसापर्यंत जॉईन झालेल्या सगळ्यांना पगारवाढ दिलेली आहे. पॉकेट मनी इतकीच होती.. पण होती..
आणि खरंतरं आधी काही कारणांमुळे मी पंधरा दिवसांनी जॉईन करणार होते..पण गोष्टी जुळून आल्या आणी मी वेळेत जॉईन केले.. मी कधी नव्हे ते लकी ठरले...
२.त्यादिवशी ऑफिसला जाताना दोन टमटम (पॅगो / शेअर रिक्शा) बदलाव्या लागल्या. ऑफिसच्या मेन गेट मधून आत शिरले आणि लक्षात आलं की गळ्यात फक्त पट्टा आहे..त्याला लटकवलेलं आय कार्ड कुठेतरी पडलयं. दुसरं कार्ड मिळवून डेस्क पर्यंत पोचायला भली मोठी प्रोसेस आहे. म्हणून मग मागून येणारी दुसरी टमटम पकडली. म्हणलं शेवटच्या स्टॉपला जाऊ तिथे ती टमटम असेल. पण तिथे एकही रिक्षा नव्हती. मग ज्या स्टॉप वरुन टमटम बदलली होती तिथे गेले. तिथेही एकही टमटम नाही. सगळ्या प्रवास करत होत्या बहुतेक. तेवढ्यात मागून एक टमटम आली आणि त्यात माझा कार्ड पडलं होतं.
जे लोक रोज हिंजेवाडीला जातात त्यांना कल्पना असेल की तिथे किती टमटम आणि लोक रोज प्रवास करतात. आणि हिंजेवाडी पूल ते फेज तीन (साधारण सात कि.मी.) या दरम्यान कुठेही पडलं असलेलं (कदाचित रस्त्यावरसुद्धा) कार्ड दहा ते पंधरा मिनिटात मिळणे किती अवघड आहे...
टीप - दुसर प्रसंग वेंधळेपणा मध्ये टाकू शकते, पण माझ्या मते आय कार्ड अश्या पध्दतीने हरवणे वेंधळेपणा ठरतो पण ते पटकन परत मिळणे माझ्यासाठी लकी घटना आहे.. Happy

तूम्ही कधी ठरला आहात असं लकी... ???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users