एकदा पाहिले हसून मला

Submitted by जयदीप. on 27 March, 2014 - 12:04

एकदा पाहिले हसून मला
तू तुझे घेतले करून मला

मोकळे सोडतेस केस तुझे
ठेवशी त्यात गुंतवून मला

जा तुला जायचे असलेच तर
एकदा बघ जरा वळून मला

ठेवला शब्द मी जपून तुझा
तो तुझा शब्दही जपून मला

मी तुझी वाट पाहतो तेथे
तू जिथे ठेवले लिहून मला

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकळे सोडलेस केस तुझे
ठेवले त्यात अडकवून मला

छान…. खयाल जुनाच आहे पण मांडणी नवी आहे.
हा शेर प्रेयसी शी केलेला Indirect संवादच असल्याने ठेवले'स' असे हवे.

शुभेच्छा.

वैभवजी धन्यवाद

हा मिसरा लिहिला तेव्हा हे वाक्य स्वगत अपेक्षित होतं मला

पण तुम्ही म्हणताय तसं हे वाक्य संवाद वाटत आहे

बदल करायचा प्रयत्न करतो