कुठलेही लेखन पटकन कानोकानीत सांगायची सोय.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीवरचे सगळे लेखन कानोकानीत सांगायची सोपी सोय केली आहे. प्रत्येक लेखनाच्या खाली कानोकानी या शब्दावर टिचकी मारली की त्या पानाची लिंक कानोकानीत देता येईल. तुम्ही मायबोलीवर प्रवेशाची नोंद केली असेल तर परत कानोकानीत करायची गरज नाही.

१. नुसती टिचकी मारली तर त्या पानाचे शिर्षक आणि दुवा आपोआप कानोकानीच्या पानावर भरला जाईल. तुम्ही तो फॉर्म साठवल्यावर कानोकानीत नोंद होईल. इतर मायबोलीकर त्या दुव्यावर मतदान करून त्यांचा अभिप्राय देऊ शकतील.

२. टिचकी मारायच्या अगोदर जर मजकुरातला काही भाग निवडला असेल (सिलेक्ट करून ठेवला असेल) तर टिचकी मारल्यावर दिसणार्‍या फॉर्ममधे तो आपोआप भरला जाईल. वेगळे टाईप करायची गरज नाही.

३. तुम्ही एखादी गोष्ट कानोकानीला पाठवायचा प्रयत्न केला, आणि ती अगोदरच कुणीतरी पाठवली असेल, तर तुम्हाला नवीन कानगोष्ट पाठवण्याचा फॉर्म न दिसता, त्या गोष्टीवर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

मायबोलीवरच्या लेखनाला अभिप्राय देता यावा, मतदान करता यावे अशा सुविधेची मागणी अनेक मायबोलीकरांनी केली होती. थोड्या वेगळ्या पद्धतीने ही सोय करतो आहोत. भविष्यात एखाद्या लेखनाला आलेली मते त्या लेखनाच्या खालीच दिसतील आणि लगेच तिथे मतदान करता येईल अशी सोय करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.

तुम्हाला एखादं लेखन आवडलं तर जितकं आवर्जून सांगता तितकंच कानोकानीवर सांगतलं / मतदान केलं तर चांगलं लेखन जास्त लोकाना पटकन शोधता येईल.

विषय: 
प्रकार: