Submitted by सातू on 24 March, 2014 - 07:34
मला विमानप्रवासाचा फोबिया आहे. त्यात मलेशियन विमानाचा अपघात झाल्यापासून मला प्रवास करायचे खूप टेन्शन येत आहे . पुढच्याच महिन्यात मला भारत अमेरिका प्रवास करावा लागणार आहे . काय करू म्हणजे टेन्शन जाईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मे बी तुम्ही पाण्याचा प्रवास
मे बी तुम्ही पाण्याचा प्रवास करु शकता.
भारतात रस्त्यावर अपघातात
भारतात रस्त्यावर अपघातात मरण्याची शक्यता वि. विमान अपघातात मरण्याची शक्यता याचे स्टॅटिस्टिक्स वाचा नेट वर. विमानाने सुखरूप प्रवास वि. अपघातग्रस्त विमानात असण्याच्या शक्यता याचेही स्टॅट्स पहा. बघा जरा बेटर वाटते का
गंमत नाही, खरंच म्हणतेय.
हनुमान चालिसा वाचा
हनुमान चालिसा वाचा विमानात!!
दुसरा अक्शीर इलाज म्हणजे दोन तीन लावूनच विमान चढा (आता काय ते विचारू नका बरं!! :))....काहिच कळत नाही. खरंच्....स्वानुभव म्हणुन सान्गतो....लै भारी....
सातू काळजी वाटणे सहाजीक आहे,
मग असे असेल तर पायलट, एअर होस्टेस, त्यान्चा इतर स्टाफ यानी काय करावे?( स्पाईस जेटच्या पायलटचा बलम पिचकारी डान्स बघा यु ट्युबवर, मग तुमची भीती पळुन जाईल.:खोखो:)
मी तर म्हणते बसाच आणि भिती
मी तर म्हणते बसाच आणि भिती घालवा.. काही होत नाही. २ मिनिटं पोटात पाकपुक होतं. नंतर आकाशात गेल्यावर तर काहीच कळत नाही. स्पीड कळत नाही कारण नुसते ढगच असतात.
सातू.. मोठ्या विमानाने जा
सातू.. मोठ्या विमानाने जा (बोंईग ७४७).. बोंईग ७७७ ने गेलात तर ते Thunderstorm मध्ये खूप हालते कारण ते जरा लहान आहे...
सातू, ह्यापूर्वी विमानाने कधी
सातू, ह्यापूर्वी विमानाने कधी प्रवास केला आहेत का ? त्यावेळी किती भिती वाटली होती किंवा फोबियापायी विमानप्रवासादरम्यान कुठल्या लक्षणांना सामोरे जावे लागले होते ? की भिती इतकी तीव्र आहे की आत्तापर्यंत विमानप्रवास करायचेच टाळले आहे ?
केवळ टेंशन येत असेल आणि ते इतरांपेक्षा जास्त आहे असे वाटत असेल तर वर मैत्रेयीने सुचवलेला उपाय करा किंवा गुगलवर how to overcome phobia of air travel ? असा सर्च देऊन बघा. त्यात स्टेप बाय स्टेप करायचे उपाय मिळतील. उदा. ही एक साईट. अशा अनेक मिळतील.
मात्र भितीवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील. ते प्रवासात स्ट्रेस येऊ नये म्हणून औषधे सुचवू शकतील.
सातू, (मलेशिया विमानाचा
सातू,
(मलेशिया विमानाचा एपिसोड झालेला नसतानाही) विमानप्रवासाचे टेन्शन येणे साहजिकच आहे. पण त्यावर काही उपाय करता येतील.
१. नाना फडणवीसानी सांगितलेला मार्ग छान आहे. पण ते विमानातही मिळते (सौदी सोडले तर).
२. एखादे अगाथा ख्रिस्तीचे/किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही पुस्तक किंवा (आस्तिक असलात तर) एखादी पोथी घेउन जा आणि विमानात वाचा.
३. विमानातले सीटवर स्क्रीन असेल तर एखादा भिकार चित्रपट/कार्यक्रम लावा म्हणजे त्याला शिव्या घालण्यात वेळ चांगला जाईल.
४. मी तर तो लाईव मॅप येत असतो तो पाहत बसतो..अंतर, वेळ, कमी झालेले पहाण्यात वेळ छान निघुन जातो.
५. जेव्हा विमान समुद्रावरुन जात असते तेव्हा बंपी होउ शकते, तेव्हा स्टुअर्ड्/स्टुअर्डेस कडे पहावे ते शांत असले की सगळे आलबेल असेल.
६. युटाह वरुन जाताना काही वेळा टर्ब्युलन्स जाणवतो..फॉलो ५.
७. विमान प्रवासाला जाण्याच्या ३/४ दिवस आधी Executive decision, Die Hard2, Con AIr इ. चित्रपट पाहणे टाळा
काही काळजी करुन नका. व्यवस्थित जाल.
तिकडे पोहोचल्यावर प्रवास अनुभव लिहा
Happy Journey!
सातू तुम्ही आकाश पाळण्यात
सातू तुम्ही आकाश पाळण्यात बसला असाल, तर त्याची तीव्रता ( विमान प्रवासाची )कमी वाटु शकते. आणी तसेही विमान एकदा स्थिर झाले की खूप रिलॅक्स वाटते. वर मनस्मि आणी अगोने उपाय सुचवलेच आहेत.
बाय द वे, आधी तुम्ही स्वतःच मानसीक तयारी करा. तुमचे पॉझीटिव्ह विचारच तुमचा प्रवास सुखकर करतील.:स्मित:
मलेशियन विमानाबद्दल वाईट वाटते, पण ईलाज नाही.:अरेरे:
दुसरी गोष्टः माझी वरची पोस्ट तुम्हाला विचीत्र वाटु शकते, वाटली असेलही. आणी तुम्ही दुखावल्या गेला असाल तर सॉरी. पण मी स्वतच यातुन गेल्याने आपल्या भीतीवर आपणच मात करणे हाच उपाय शिकले. अगदी पहिली सायकल चालवताना येणार्या अनूभवापासुन. तेव्हा नवीन क्षणाचा अनूभव आनन्दाने घ्या, नवीन विश्व खुले आहे तुमच्यापुढे.:स्मित:
आकाश पाळण्यात बसला असाल, तर
आकाश पाळण्यात बसला असाल, तर त्याची तीव्रता ( विमान प्रवासाची )कमी वाटु शकते >> फुल्ली अॅग्री.
पाळण्यात टेक ऑफ च्या अनुभूती दर आवर्तनाला मिळतात. पण विमानात एकदाच. लँडिंगला तर काहीच कळत नाही. डायव्हर प्रोफेशनल नसेल तर जरासा जर्क बसतो. कधी कधी दिशा बदलताना विंग्ज वरखाली होतात, पण त्याची भिती बाळगायची गरज नाही.
एका नातेवाईक महिलेचा
एका नातेवाईक महिलेचा किस्सा:
बरेच दिवस घसा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेले. थायरॉईड वगैरे सगळ्या चाचण्या झाल्या. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मग त्यापुढच्या डॉक्टरकडे गेले.
डॉक्टर: तुम्हाला काहीही झालेले नाही. तुमचे दुखणे मानसिक आहे. कसले टेन्शन आहे तुम्हाला?
नाते. म. : (मौन)
डॉक्टर पुन्हा विचारतात. तरीही यांचा चेहरा चिंताग्रस्त.
मग डॉक्टरांनी नवर्याला विचारले.
डॉ. : कसले टेन्शन घेतात का या?
नवरा: हो. ती काही गोष्टींचं खूप टेन्शन घेते.
डॉ.: आता कसले घेतलेय?
नवरा: कॅन्सरचं!
डॉ: (नाते. म. ला) : समजा आता तुम्ही इथून निघून घरी जायला निघालात आणि रस्त्यावर गाडीखाली आलात तर?
नाते. म. : ते परवडलं. पटकन मरण आलेलं चांगलं. कॅन्सरपेक्षा.
डॉ.: मग असं करा. तुम्हाला कॅन्सर झाला की माझ्याकडे या. मी तुम्हाला मरायचं इन्जेक्शन देईन. या गोळ्या घ्या आणि जा घरी! नुसते टेन्शन घेऊन कॅन्सर व्हायचाच असेल तर दूर पळणार नाही. बिनधास्त राहा.
आणि खरोखरच चार दिवसांत त्यांची घसादुखी पळून गेली.
सातू, तेंव्हा तुम्ही डोक्यातून असले सगळे काढा. काही होत नाही. प्रवासासाठी शुभेच्छा!
सगळ्यांना धन्यवाद . माझा हा
सगळ्यांना धन्यवाद . माझा हा पहिला विमान प्रवास नाही . पण प्रत्येक वेळी मला एवढीच भीती वाटते . कोणीतरी सुचवल्याप्रमाणे मी २/३ लावून बसू शकत नाही कारण माझे छोटे पिल्लू माझा बरोबर आहे. तुमच्या सर्वांचे सल्ले वाचून थोडे टेन्शन कमी झालेय . ह्याचीच प्रिंट आउट काढून विमानात वाचत बसीन .
<<मग असे असेल तर पायलट, एअर
<<मग असे असेल तर पायलट, एअर होस्टेस, त्यान्चा इतर स्टाफ यानी काय करावे?( स्पाईस जेटच्या पायलटचा बलम पिचकारी डान्स बघा यु ट्युबवर, मग तुमची भीती पळुन जाईल>> याच्या आधी मी फिन एयर चा सरप्राईझ डान्स बघितला होता २६ जानेवारीला. तसा निघता निघता बघा. मस्त फ्रेश वाटेल
काही होत नाही.... मला तर
काही होत नाही....
मला तर दरवेळा टेकऑफ ला प्रचंड भिती वाटते... डोळे गच्च मिटून हात खुर्चीला घट्ट धरून ठेवतो... २ मिनिट मधे टेकऑफ होते... मग परत नार्मल होतो... मनात गाणी म्हणायची, हेडफोन लावून गाणी ऐकायची, लक्ष दूसरी कडे वळवायचे स्वत: चे
मस्त पिक्चर बघा... आणि
मस्त पिक्चर बघा...
आणि तसंही पिल्लू तुम्हाला बिझी ठेविलच, त्याच्यामुळे भीती जाणवणार नाही
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=glOuOSeoS0E
सातू, तुमचा देवावर विश्वास
सातू, तुमचा देवावर विश्वास असेल तर कुलदैवताचा जप करा. मनातल्या मनात केला तरी चालेल. मध्येच थांबला तरी चिंता नको. आठवण आली की लगेच सुरू करायचा.
प्रवासास शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
अजून एक महिना अवकाश आहे विमान
अजून एक महिना अवकाश आहे विमान प्रवासाला, दर आठवड्याला एक असे चार प्रोटोटाईप प्रवास करा, फोबिया आणखी कमी होईल. ज्या गोष्टींचा फोबिया आहे त्या गोष्टी करून करूनच आपण फोबियावर मात करू शकतो. जिंनामेदो हा हिंदी सिनेमा पहा, त्यात "फोबियावर मात" हा विषय खुपच सुंदररित्या गुंफलेला आहे. ह्रुतिक, फरहान अन अभय देओल सिनेमाच्या शेवटी स्वतःच्या फोबियावर मात करतात !
सातू: >> ह्याचीच प्रिंट आउट काढून विमानात वाचत बसीन <<< प्रवास ओके झाला तर आम्हा सभासदांना छानशी पार्टी द्यायला विसरू नका .....
सुजा: >>> स्पाईस जेटच्या पायलटचा बलम पिचकारी डान्स बघा यु ट्युबवर, मग तुमची भीती पळुन जाईल<<< .....धमाल !
सगळ्यांना खरेच धन्यवाद. मला
सगळ्यांना खरेच धन्यवाद. मला इतके छान वाटत आहे तुमच्या प्रतिक्रिया वाचून. माझ्यासारखी माणसे त्यांच्या आयुष्यात न घडणार्या वाईट घटना नुसते इमाजीन करूनच रोज जगतात.
सातू, Fear of Flying वर SOAR
सातू,
Fear of Flying वर SOAR चे व्हिडियोज आहेत आणि त्यांचे इमेल अपडेटस असतात ते पहा.
त्यांनी भीतीचे व्यवस्थित वर्गीकरण आणि त्यावर साधे, सोपे आणि प्रभावी उपाय सुचवले आहेत.
काही लोकांना लँडिंग, टेकऑफ आणि काहींना टर्ब्युलंसची, काहींना claustrophobia, काहिंना व्हर्टिगोची भिती वाटते.
या सर्वांना वेगवेगळे साधे उपाय लागू पडतात. मुख्य म्हणजे, असे शेकड्याने लोकं असतात ते कळते.
मेडिकेशन घेण्याएवढी भिती वाटत असेल तर जरुर डॉक्टर गाठणे, कारण इतरांना त्रास व्हायला नको. शिवाय तुमच्या सोबत लहान मुल असेल.
भिती आपोआप जात नाही, प्रयत्नपूर्वक जाते. काही वेळा आपोआप येते, एखाद्या आजारासारखी आणि काही वर्षात जाते. काही लोकांना मात्र अतोनात त्रास होतो. तुमचा त्रास किती तीव्रतेचा आहे ते फक्त तुम्हाला माहित आहे. उपचारांची गरज आहे की नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. काही बायकांना अचानक प्रेग्नंसीनंतर हा त्रास उद्भवतो. काहींना एखाद्या अति bumpy flight मुळे.. कारणे शोधून उपाययोजना करावी लागते.
रैना छान पोस्ट
रैना छान पोस्ट
छान डिटेल्स लिहिलयत रैना !
छान डिटेल्स लिहिलयत रैना ! माझी फोर-व्हीलर ड्रायव्हिंगची भीती मी प्रयत्नपुर्वक घालविली. चिकाटीने प्रयास केले, सराव केला तेंव्हा ओके. टू-व्हीलर ड्रायव्हिंग, ट्रेकींग, स्वीमींग नेहमी करत असुन सुद्धा मला समजत नव्हते की मला फोर-व्हीलर ड्रायव्हिंगचा फोबिया का आहे. पण सरावाने भीती गेली. आता ड्रायव्हिंग एन्जॉय करतो.
रैना, तू सांगितलेले व्हिडिओ
रैना, तू सांगितलेले व्हिडिओ बघतो. धन्यवाद, माहितीसाठी.
रैना धन्यवाद तुम्ही
रैना धन्यवाद तुम्ही सांगितलेले व्हिडीओज नक्की बघीन. मला जास्त करून tarbulance मुळे भीती वाटते.
कितिहि थेअरी माहित असेल तरीही भीती वाटते . अर्थात कोणाला त्रास होण्याइतकी नाही पण मलाच जास्त त्रास होतो .
Satu, mazya 20 varshachya
Satu,
mazya 20 varshachya mulala pan same problem ahe....
mi punyat asate.....mazi ek maitrin flower remedy cha abhyas ani practice karat ahe.
tine tyala kahi flower remedy til medicine che mixture Karun dile ahe....
tyala farak vatat ahe.....jar tumhala adhik mahiti havi asel tar ticha cell
no.kalavate...
मोराप, माझ्या एका ओळखीच्या
मोराप,
माझ्या एका ओळखीच्या मुलाला उंच ठीकाणी जाण्याची खुप भीती वाटते.त्यामुळे त्याला खुप अडचणी येतात. तुम्ही काही मदत कराल का?
मला वाटत फोबिया साठी
मला वाटत फोबिया साठी सायकियाट्रिस्टचा उपचार घ्यावा.शिवाय सायकोथेरपिस्टचाही घ्यावा. मित्र, हितचिंतक यांच्या मदतीने हा फोबिया नक्की जातो. जसे की तुम्ही आत्ता शेअर केलेत. गामा पै चा उपाय कोग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे माईंड डायवर्टिंग टेक्निक साठी वापरतात. श्रद्धा असेल तर उत्तमच नसेल तरी काही वांधा नाय. पाढे परिच्छेद वाचन ओरेगामी वगैरे चाळे देखिल उपयोगी असतात. शुभेच्छा
मला गॅमोफोबिया आहे
मला गॅमोफोबिया आहे
२०१४ चा धागा आहे.
२०१४ चा धागा आहे.
मग , गेलात कि नाही ?