लेझी आय (Amblyopia) निदान आणि उपाय

Submitted by mansmi18 on 21 March, 2014 - 06:38

नमस्कार,

माझ्या मुलाला एका डोळ्यात लेझी आय सिंड्रोम (Amblyopia) डिटेक्ट झाला आहे.
त्याला शाळेत मागच्या बाकावरुन नीट दिसत नाही म्हणुन तो तक्रार करायचा..गेल्या महिन्यात पीटीए मीटींग मधे त्याच्या शिक्षकांनी डोळे तपासुन घ्यायचा सल्ला दिला आणि डॉक्टरकडे गेल्यावर हा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला. त्याला करेक्टिव ग्लासेस आणि पॅच थेरपी (चांगला डोळा ५-६ तास कवर करुन दुसर्‍या डोळ्याला पाहाण्याची सवय करणे) हे सांगितले आहे. डॉक्टरांच्या मते जितक्या लहान वयात आणि जितक्या लवकर हा प्रॉब्लेम कळेल तितके उपाय इफेक्टीव ठरतात.
ज्यांची मुले लहान ( Infant to 7-8 years) आहेत त्यांनी कृपया आय स्पेशालिस्ट कडे जाउन मुलांचे डोळे एकदा तपासुन घ्या. या लहान वयात मुले काही प्रॉब्लेम आहे हे सांगु शकतीलच असे नाही.
http://www.lazyeye.org/

हा प्रॉब्लेम इतर कोणाला आला असेल त्यानी कृपया आपले अनुभव शेअर करावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म… माझ्या नणंदेच्या मुलाला हा त्रास आहे. त्याचा खूपच लवकर म्हणजे साधारण वयाच्या दुसर्या वर्षीच लक्षात आला. बर्याच डॉ. ना दाखवले आणि त्याला चष्मा वापरायला सांगितला.

परंतु मध्यंतरी त्याला कोथरूडमध्ये डॉ. निवर्गी आहेत त्यांच्यालाडे नेले आणि त्यांनी सुद्धा पॅच थेरपी सुचवली. त्याने त्याला बराच फायदा झाला. त्यासाठी एक चष्मा करून घेतला ज्यात चांगल्या डोळ्याची काच धुसर होती.

तुमच्या मुलाच्या उपचारांसाठी शुभेच्छा!