संताच्या नातवा...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 March, 2014 - 03:58

मजला कळेना गादीचा प्रकार
संताच्या नातवा कैसा अधिकार
मानसिकता ही इथल्या जनाची
सवय असे का सदा गुलामीची
काय त्याने इथे मिळविले असे
जनासी दिधले कधी काय कैसे
त्यांना विचारीता शब्दे डाफरती
भक्ताळले डोळे मोठे वटारीती
अथवा मिळतो फटक्यांचा मार
चौदाही पिढ्यांचा घडतो उद्धार
गादीवरी राजा अरेरे म्हणतो
मंबाजी नाटक छान वठवतो
अज्ञानी मी मूढ गरीब बिचारा
पोहोचतो पार नरकाच्या दारा
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान खूप छान

तुमच्या कवितांमध्ये ते नक्की काय आहे जे त्यांना इतक्या उत्तम बनवतं त्याचा मी अजून शोध घेत आहे
प्रार्थना करा की मला ते लवकर समजेल आणि मलाही अश्या कविता करता येतील

ह्या कवितेला अजून तिचा परफेक्ट फिनिशिंग टच ..नेमका एंड मिळाला नाही (म्हणजे ती अजून अपूर्ण आहे ) असे राहून राहून वाटते आहे ..विचार व्हावा !

Happy
धन्स विक्रांतजी

वैभव ,अभिप्राया बद्दल धन्यवाद .
शक्य आहे ,तुम्ही म्हणता ते .परफेक्ट फिनिशिंग टच..बघू काही सुचते का .
तुमच्या कविता मुख्य म्हणजे गझल प्रचंड ताकदीच्या असतात .ती नेमक्या शब्दातील नेमक्या अभिव्यक्तीची आपली साधना थक्क करणारी आहे .
पुन्हा धन्यवाद