गरुडेश्वर आणि नारेश्वर येथे जाण्या/राहण्याविषयीची माहिती हवी आहे

Submitted by गमभन on 17 March, 2014 - 23:29

आम्हाला मुंबईहून गरुडेश्वर आणि नारेश्वर येथे जायचे आहे. त्याबद्दल माहिती हवी आहे.

नेटवर शोधल्यावर कळले की गरुडेश्वर बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर या तिन्ही ठिकाणांहून गरुडेश्वर जवळजवळ ८०-१०० किमी आहे.

मुंबईवरुन रेल्वेने बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर पर्यंत जाऊन तिथुन बसने जायचा प्लान आहे.

भरुच किंवा अंकलेश्वर यापैकी कोणत्या ठिकाणापासुन बस कनेक्टिविटी चांगली आहे? तिथे राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे?

गरुडेश्वर/नारेश्वर याखेरीज जवळपासची इतर कोणती स्थळे पाहता येतील का?

आधी हा प्रश्न तीर्थस्थळांविषयीची माहिती या धाग्यावर विचारला होता, पण वेबमास्तरांच्या सुचनेनुसार नवीन धागा उघडला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ वर्षापुर्वी गेलेलो गरुदेश्वारला. मुंबईहून बरोडा पर्यंत बस ने गेलेलो. बरोद्याला कुठल्यातरी flyover चा stop होता. तिथून taxi केलेली. साधारण १ तास लागतो. गरुदेश्वारला रूम देतात. धर्माशालेप्रमाणे सोय असते.खूप छान ठिकाण आहे.

लक्ष्मी,

हो, अंकलेश्वर, भडोच, नारेश्वर आणि गरुडेश्वर नर्मदातटावर आहेत, म्हणून परिक्रमेतही येतात.

पसद,

टॅक्सीने गेल्यास किती खर्च होईल? अंकलेश्वरहुन गरुडेश्वरला जाता येईल का? कारण मुंबईहुन अंकलेश्वर जवळ पडेल. शिवाय अंकलेश्वर ते बडोदा हा प्रवासदेखील वाचेल.