याचिका

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हेमलकशाच्या शाळेबद्दल, तिथल्या कॉम्प्युटर लॅब बद्दल लेख वाचलाच असेल सगळ्यांनी. ते वाचताना माझ्या डोळ्यासमोर इथे मिळणारे रीडर रॅबिट सारखे गेम आले. अशा गेम्स च्या सीडी भारतात त्यांच्यापर्यंत नेऊन द्यायची इच्छा आहे.

माझ्याकडचे, माझ्या मायबोलीबाहेरच्या मित्रमैत्रिणींकडचे गेम्स मी गोळा करत आहे.

तुमच्यापैकी कोणाकडे असे गेम्स असतील तर त्या सी डीज मला पाठवाल का ? मी लवकरच जाणार आहे तेंव्हा घेउन जाईन. डी एस, वी, ए़क्स बॉक्स अशा गोष्टी असल्याने, किंवा मुलं मोठी झाली म्हणून खेळत नसल्याने धूळ खात पडलेल्या त्या सी डी शोधा अन पाठवून द्या लवकर.

त्यांच्याकडे एक विंडोज ९८ अन बाकी एक्स पी चे कंप्युटर आहेत.

टायपिंग ट्युटर सारखे काही सॉफ्टवेअर असेल तर तेही उपयुक्त ठरेल.

१२/१४/२००८

काल हे लिहिल्यावर नंतर सुचलेले काही विचार
१. जुनेच सॉफ्टवेअर, गेम्स द्यायला पाहिजेत असं नाही काही. नवीन काही द्यायचं असेल तरी हरकत नाही.

२. कोण कुठली 'शोनू' आय डी ? त्यांना कसे काय सॉफ्टवेअर पाठवू मी ?सगळे घेऊन बसतील अन इबे वर विकायला लावले तर ? असा विचार येणं शक्य आहे. अशी काही शंका असेल तर चिनूक्स्,नूतन , सरीविना यांना कळवून ठेवा कुठले कुठले गेम्स/ सॉफ्टवेअर मला पाठवले आहेत ते. किंवा इथेच पोस्ट करा.

३. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक यांच्या कार्यक्रमांच्या सी डी, डी व्ही डी सुद्धा उपयुक्त ठरतील.

प्रकार: 

धन्यवाद शोनू.

याशिवाय खेळणी, कपडे, किंवा लहान मुलांची गोष्टींची पुस्तकंही चालतील.
पुण्यात/ मुंबईत मी हे सर्व साहित्य आपल्याकडून गोळा करू शकेन.

चिन्मय, काही गोष्टीची पुस्तकं (मराठी) आपण इकडे विकतही घेऊया. तू तिथल्या लायब्ररीत कोणती पुस्तकं आहेत हे एकदा कन्फर्म करशील का? म्हणजे रिपीट नको व्हायला..

चिनूक्स, सरिविना
दुर्दैवाने खेळणी, पुस्तकं अन कपडे या गोष्टींचं वजन जास्त असल्याने अशा गोष्टी फार मोठ्या प्रमाणात इकडून आणणं शक्य होत नाही. तरिही मी खेळणी अन पुस्तकांच्या बाबतीत प्रयत्न करीन.

शोनु, अगं तू वजनाचा विचार कर आणि मगच आण ह्या गोष्टी. कारण इथे पुणे-मुंबईकर त्या जमा करुन चिन्मयकडे सुपुर्त करु शकतात. त्याना ते सोपं पडेल. तुला तुझ्या इतर सामानाबरोबर हे सगळं आणणं कठीण जाईल..

शोनू,
ते खेळणी आणि पुस्तकांचं भारतातल्या माबोकरांसाठी होतं.. Happy

मराठीतली पुस्तकं, सीड्या/डीव्हीड्या दिल्या तर परिणामकारकता वाढेल. मराठीत सीड्या-डीव्हीड्यांमधले खेळ/शैक्षणिक साधनं थोडीशी मर्यादित संख्येने आढळतात.. पण त्यातल्या चांगल्या निवडायला हरकत नाही. पुस्तकांबद्दल सांगायचं झालं तर चौकसपणा आणि भावविश्वाचा आवाका वाढवायला उपयोगी पडतील अशी मराठी ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया, जागतिक भूगोल/इतिहास/साहित्य यांच्याविषयीचे कोष/पुस्तके, डिस्कव्हरी/नॅट जिओ वगैरे चॅनलांच्या काही कार्यक्रमांच्या सीड्या-डीव्हीड्या देणंही उपयोगी ठरू शकेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश


मुंबई मधे मराठी सीडी, लहान मुलांसाठी तुम्ही म्हटल्यासारखी पुस्तके इत्यादी कुठे मिळतील ? काही चांगल्या पुस्तकांची , लेखकांची, प्रकाशकांची नावे इथे देऊ शकाल का ?

शोनू,
पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर खेळीया आणि नीलायमशेजारी पाथफाईंडर आहे.. तिथे मिळू शकतील..

ऍनिमेटेड गोष्टीच्या सीड्या खूप मिळतात. गोष्टीही छान असतात आणि ऍनिमेशनमुळे वेगळीच मजा येते. 'फाऊंटन्'च्या अनेक सिडीज आहेत अश्या. जोगेश्वरीच्या शेजारी मोठ्ठं दुकान आहे सीडीजचं.

पण गोष्टींच्या सीडी दिल्या तर चालतील का? का, प्रामुख्याने अभ्यासाच्या हव्यात? माझ्या ऑफिसमध्ये एका सहकार्‍याने कलरिंगची सिडी स्वतः तयार केली आहे. २० चित्र आणि अगणित रंग आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळे रंग भरून कितीतरी चित्र तयार करू शकतो. असं काही चालेल का?

------------------------------------------
हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..

नक्की चालेल पूनम.

चिन्मय,

काही मायक्रोसॉफ्टचे लाइसनन्स (वर्ड) हवी आहेत का???

आनेवाला पल जानेवाला हे

जुने कपडे, जुनी भांडी, चादरी इ. वस्तूसुद्धा तिथे लागतात.
आनंदवनात अपंग, कुष्ठरोगी यांचे विवाह होतात. तेव्हा स्वतंत्र घर करून ही जोडपी आनंदवनातच राहणं पसंत करतात, कारण बाहेरच्या जगात त्यांना काहीच स्थान नसतं. त्यामुळे अशा वस्तू तिथे खूप उपयोगास येतात.

चिनूक्स,
मी नूतन यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी सांगीतले मला की जुन्या कपड्यांचे फार खराब अनुभव आल्यामुळे ते घेणे बंद केलय आणि नवीनच कपडे स्वीकारले जातात. की हे फक्त लहान मुलांच्या कपड्याच्या बाबतीत करायचे ठरवलय?

नाही. तसं काही नाही. चांगल्या स्थितीतील जुने कपडे हेमलकशाला अथवा आनंदवनात स्वीकारले जातात.
शिवाय मायबोलीकरांकडून कोणतीही वाईट स्थितीतील वस्तू दिली जाणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. Happy

चिनूक्स जुने कपडे कुठे द्यायचे ? म्हणजे सरी कडे पोचवले तर चालतिल का ?

~~~~~~~~~~~~~~~~
फिटे अंधाराचे जाळे .....
~~~~~~~~~~~~~~~~

मला एका मैत्रिणीकडनं मॅडन गेम्स मिळालेत पी सी चे. त्या गेम्स करता वेगळा कंट्रोलर लागेल का? हे कंट्रोलर मुंबईत किंवा पुण्यात सहजगत्या मिळतील का ? फ्क्त की बोर्ड अन माउस वापरून खेळता येतील ? २००१, २००३ अशा दोन आवृत्त्या मिळाल्या आहेत.

शोनू,
मी चौकशी करून सांगतो.
फक्त एक सुचवायचं होतं. शक्यतो गेम्स किंवा तत्सम वस्तू विकत घेऊ नका. त्याऐवजी आर्थिक मदत अधिक गरजेची आहे. रुग्णांची संख्या खूप वाढते आहे.
जर वापरलेल्या सीड्या, गेम्स असतील तर उत्तमच. पण कृपया काही विकत घेऊ नका. ते पैसे रुग्णालयासाठी किंवा शाळेत इतर काही विकत घेण्यासाठी वापरता येतील. Happy

शोनू, डिजिटल बी पी मॉनिटर पाठवायचा विचार आहे. घेऊन जाऊ शकशील का?
चिन्मय चौकशी करून असे मॉनिटर्स कितपत उपयोगी आहेत हे सांगशील का?

नागपुरहून कुणी जात येत असेल तर मी आईला फोन करून सांगते. तीची लहान मुलांसाठी मराठीत लिहिलेली बरीच पुस्तकं आहेत. विज्ञानावरची, गोष्टीरुपात लिहीलेली. देण्यासाठी त्याच्या कॉपिज आहेत का ते विचारते.

मृण्मयी,

डिजिटल बी पी मॉनिटर पाठवायला हरकत नाही. सध्या दिगंत आठवड्यातील काही दिवस इतर गावांमध्ये जातो. त्याला उपयोग होऊ शकेल.

नागपूरला प्रकल्पाची गाडी बरेचदा येत असते. मी दिगंतशी सविस्तर बोलून त्याबद्दल कळवतो. वर्धा रोडवर 'अशोकवन' आहे. तिथे राहणारे कार्यकर्ते पुस्तकं घेऊन येऊ शकतील.

धन्यवाद. Happy

शोनूच्या बॅगेत जागा असेल आणि वजनाचा प्रॉब्लेम नसेल तर नक्की पाठवते. शोनू तारीख कळवतेस का तुझ्या जाण्याची?

या इथे एवढं सारं Discussion चाललंय मला पत्ताच नव्हता. Wonderful!
psgने सुचवलेल्या पुण्यातल्या जोगेश्वरीशेजारच्या सीडीजच्या दुकानातून मी काही (२२) मराठी सीडीज घेतल्या आहेत. (इसापनीती, अकबर-बिरबल, तेनालीराम, आजोबांच्या गोष्टी, आजीच्या गोष्टी, बालगीतं, नाट्यछटा, पोवाडे, प्राण्यांच्या गोष्टी इ.)
शिवाय सरिविनाने शोध लावलेल्या एका दुकानातून विंडोज विस्टा व ऑफिस २००७ ची मराठी पुस्तकंही मिळालीत. संगणक प्रयोगशाळेत लावण्याजोगे २ तक्ते मिळालेत.
psgच्या मित्राने स्वत: बनवलेली रंग भरण्याची, २० चित्रं आणि अगणित रंगवाली सीडी आवडेल.
शोनूने सुचवलेल्या नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी वगैरेच्या सीडीज आहेत छान पण खूप महाग आहेत. शिवाय इंग्रजीतून असल्यामुळे तिथे त्या दाखवताना कुणीतरी मराठी कॉमेंटरी करत राहायला लागणार. म्हणून मी टाळल्या. पण खरंतर त्या छान आहेत.
दर रविवारी वेगवेगळ्या ग्रुप्सना सीडीज दाखवाव्यात असं ठरवतेय. गोळा केलेल्या सीडीज कशा दाखवायच्या याचाही काही निश्चित कार्यक्रम ठरवावा लागेल, तर त्यासाठी सगळे मिळून थोड्या सूचनाही करा.
pha ने सुचवलेला मराठी विश्वकोशाचा पर्याय आवडला. त्याच्या सीडीज असतात का? कारण हेमलकशाला इंटरनेट ऎक्सेस नाही.
नवनवीन शोधांबद्दल माहिती देणारे काही ऑडिओव्हिज्युअल्स मिळतील का? मराठीत तर असं काही सापडलं नाही मला. त्यामुळे इंग्रजी चालेल. निदान जग कुठे चाललंय याचा अंदाज तरी येईल. अशा सीडीज साठी मराठी कॉमेंटरी मी करीन.
या मुलांच्या अंगात दोन जन्मजात गुण आहेत - चांगले athlete असतात आणि ताल, नाद, लय यांची उत्तम जाण. या दोन्ही बाबतीत उत्तम मार्गदर्शन आणि शिक्षण यांची कमतरता आहे. नृत्य आणि Athletics बाबत माहिती, शिक्षण देणार्‍या सीडीज असतात का? कोणत्या, कुठे मिळतील? कोण देईल?
भूषण म्हणून एक आपला मित्र-हितचिंतक आहे. त्याच्याकडून कळलं की इन्फ़ोसिसमध्ये अशी एक स्कीम आहे की, मंदीच्या काळात सरप्लस प्रोग्रामर्सना ते अर्धा पगार देतात, या काळात त्या प्रोग्रामर्सनी एखाद्या सामाजिक कामासाठी - वर्षभर किंवा एखादा महिना - वाहून घ्यायचं असतं. असं काम करायला कोणी तयार असेल तर किमान महिनाभर तिथे राहून तिथल्या Data Management साठी काही प्रोग्राम्स बनवून देईल का?

मुंबई मधे मराठी सीडी, लहान मुलांसाठी तुम्ही म्हटल्यासारखी पुस्तके इत्यादी कुठे मिळतील ? >> मेधा shoppers stop वाल्या planet M मधे खोर्‍याने मिळतात. दादरला Ideal नि Majestic watch मधे पण मिळतात (limited stock). (Same goes for Rhythm house)

मॄ
मी पोचले ग बंगळूरू मधे Sad
ते बी पी मॉनिटर्स मी इतरांना मागे नेले आहेत. इथे चालतात. पण माझा डॉ चं म्हणणं आहे की ते मिसलीडिंग असू शकतात. आता अजून कोणी जाणारं ( येणारं ) असलं तर कळवीनच.

मला माझ्या मित्र मैत्रिणींकडून रीडर रॅबिट व इतर पी बी एस टाइपच्या बर्‍याच सीडीज मिळाल्या. त्या मी चिनूक्स कडे देईन. ( मला फोन नं कळवणार का इमेल मधून )

आता आज उद्या इथे लँडमार्क मधे जाउन इतर सीडी वगैरे पाहीन.

नूतन
तुमच्या कडच्या पी सी मधे डी व्ही डी पण चालतील का ? नॅशनल जीओग्राफिक किंवा ब्रिटानिका हे आता डी व्ही डी मधे पण मिळतात. तशा मी शोधून पाठवू शकेन.

'आपली सृष्टी आपले धन' जर कुठे मिळत असेल तर तेही मला घ्यायचं आहे. कोणाला माहित असेल तर सांगा प्लीज.

शोनू, काही हरकत नाही. मला हे उशीरा सुचलं. इतर कुणाबरोबर पाठवीन.

मिसलिडिंगवरून आठवलं... डॉक्टरांकडे जाताना मी माझं मॉनिटर घेऊन जाते. डॉक्टरांच्या आणि माझ्या मॉनिटरमधे १-२ आकड्यांचा फरक असतो. तो अगदी नॉर्मल आहे असं त्यांनी सांगीतलं. त्यांच्याच रेकमेंडेशनवर मी माझं मॉनिटर घेतलंय. आजकाल इथे दवाखान्यातसुध्दा डिजिटल वापरतात. नीट कॅलिब्रेट केलेली असतात.

हो. हो. आमच्याकडच्या टीव्हीला जोडलेल्या प्लेअरमध्ये डीव्हीडीपण चालतात.
National Geographic, Britanica वगैरे चालतील.

नूतन
रोज रोज मायबोलीवर यायला जमत नाहीये . सध्या माझ्याकडे अशा डि व्हि डी नाहीयेत. पण मी पुढे कधी तरी नक्की पाठवीन.