तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

Submitted by dr.sunil_ahirrao on 16 March, 2014 - 08:17

अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही
सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही

जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे,
छल-कपटाचा तुला पुरेसा सराव नाही

किती दयाळू, महान आहेस तू खरोखर
तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही!

तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी
मला उमगले कुठेच माझा पडाव नाही

अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला
तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही

हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने
तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही

अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता
तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

डॉ.सुनील अहिरराव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक ओळी खूप छान उतरल्या आहेत भट साहेबांच्या एका गझलेवरून जमीन घेतल्याचे जाणवते आहे
असो
एकंदरात मला गझल आवडली
पडाव आणि दबाव जास्त आवडले
टीप : शेवटून दुसरा शेर एकाच ओळीत सलग टाईप झाला आहे त्याला योग्य पद्धतीने २ ओळीत टाईप कराल का

वैभव वसंतराव कुलकर्णी, मोबाईलवरुन टाईप केले आहे मी प्रयत्न करतो ठिक करण्याचा. मराठी गजलेवर भट साहेबांचा अमिट ठसा आहे, हे तर खरेच; पण जमीन सादृश्य दाखवणारी असेल तर तो शब्दयोजनाचा भाग असू शकतो.

त्या ओळीँची मांडणी बहुतेक व्यवस्थित झाली असावी. मोबाईलवरुन नेमका अंदाज येत नाही.अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.