चोरकी दाढीमे तिनका

Submitted by pkarandikar50 on 16 March, 2014 - 01:26

चोरकी दाढीमे तिनका . . .

"प्रसार माध्यमातील ’पेड न्यूज’ वाल्यांची रवानगी तुरुंगात करू" या केजरीवालांच्या विधानावर झाडून सगळ्या -विशेषतः इलेक्ट्रॉनिक- माध्यमांनी टीकेची झोड उठवली खरी, पण त्यातून त्यांचंच पितळ उघडं पडलं. एक तर ’पेड न्यूज’ हे एक कठोर वास्तव असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अशोक चव्हाणांसारख्या काही मात:ब्बर नेत्यांविरुद्ध त्या संदर्भातली प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. दुसरं म्हणजे या संबंधातल्या काही सर्वेक्षणातून शेकडोवारी बातम्या अशा प्रकारात मोडत असल्याचं दिसून आलं आहे. अगदी निवडणूक आयोगानंही याची दखल घेत, " पेड न्यूजवर लक्ष ठेवा" अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्याला काही आधार असणारच ना? ’कॅश फॉर व्होट’ हे प्रकरण संसदेत गाजलं होतं. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा खासदार पैसे घेतात हे काही गुपित राहिलेलं नाही.

आपल्या लोकशाहीला आणि समाज जीवनाला सगळ्याच स्तरांवर भ्रष्टाचारानं पोखरलं आहे हे वास्तव सर्वमान्य आहे. स्वत:ला लोकशाहीचा ’चतुर्थ स्तंभ’ म्हणून घेत मिरवणार्‍या प्रसार माध्यमांनाही या रोगाची लागण झाली असली तर त्यात नवल नाही. पण हे वास्तव कोणी उघडपणे मांडलं की या मिडियावाल्यांच्या अंगाचा तिळपापड का व्हावा?

शेवटी, ज्या जनमानसावर प्रभाव टाकण्याची धडपड हे मिडियावाले सातत्यानं करत असतात, त्या जनमानसा्ला केंव्हाच मिडियातला भ्रष्टाचार दिसलेला आहे. आता केजरीवलांवर मिडियानं आगपाखड केल्यामुळे केजरीवालांची प्रतिमा खराब होईल हा भ्रम आहे. उलट, या सर्व प्रकरणात माध्यमांचीच प्रतिमा आणखी मलीन झाली आहे.

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे नि:संशय भ्र्ष्टाचारी आहेत अशांच्या व त्यांच्या कुटूंबियांच्या मुलाखती, भाषणं जेंव्हा वारंवार मिडीयात कौतुकाने दाखवल्या जातात, तेंव्हां मिडीयाची ही लबाडी लक्षात येतेच. त्यामुळें एखाद्या 'स्टींग ऑपरेशन'मधून खरंच एखादा भ्रष्टाचार मिडीया उघडा पाडते, तेंव्हाही त्यावर कितपत विश्वास ठेवावा हा संभ्रम निर्माण होतोच. निवडणूकी तोंडावर आल्या असताना तर 'इमेज बिल्डींग'साठी मिडीयाचा आतां सर्रास वापर होईलच [ हें सुरूं झालंच आहे ] व मिडीया त्या कामात स्वतःला कमी पडूं देणार नाही हें नक्की !
केजरिवाल यांच्यावर 'स्टंट'बाजीचे आरोप होत असले [व त्यांत कांहींसं तथ्यही असलं ] तरीही केवळ त्यामुळें ते जें बोलतात - व ओरडून बोलतात - त्यातल्या सत्याला बाधा येतेच असं नाही, हें लक्षात घ्यायलाच हवं !

a-sky2.JPG

मागच्याच लोकसभा निवडणुकीत विवीध वृत्तपत्रांचे पॅकेजेस आले होते. पत्रकारीता आता इतर व्यवसायांसारखाच झाला आहे आणि तो होणारच होता कारण त्यामध्ये माणसेच काम करतात.