मुंजीसाठी पुण्यात (२०० कॅपॅसिटी चा) हॉल सुचवाल का

Submitted by mansmi18 on 15 March, 2014 - 06:56

नमस्कार,

मुंजीसाठी पुण्यात (२०० कॅपॅसिटी चा) हॉल सुचवाल का? जवळ गणपती मंदिर असल्यास उत्तम.

आम्ही पुढील हॉल कन्सिडर करतोय:
गणराज मंगल कार्यालय - बाणेर
इंद्रप्रस्थ - सेनापती बापट रोड
शक्यतो वेस्ट पुणे - औंध, बाणेर पण सिटी मधेही चालेल..
(आपले चांगले/वाईट अनुभव सांगा..)

आम्ही काही ठिकाणी चौकशी केली तिथे संपुर्ण भाडे इन अ‍ॅडवान्स घेणार आणि कॅन्सलेशन करायचे असल्यास..जर तो हॉल त्या दिवशी दुसर्‍या कोणी घेतला तरच २५% रक्कम परत मिळेल नाहीतर काहीच परत मिळणार नाहीत असे सांगितले आहे..ही स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदश्री हॉल, बाजीराव रोड
लक्श्मीकृपा हॉल, शनिपार
पार्वती हॉल, सुपर्ण हॉल, निर्मलबाग सभागृह, सुरभी मंगल सर्व सहकार नगर मध्ये.
संतोष हॉल, पुष्पक मंगल सिंहगड रोड
शैलेश सभागृह नवसह्याद्री

स्वप्नशिल्प हॉल, आपटे रोड. मस्त आहे. जेवण पण अप्रतिम आहे. खूप स्वच्छ आणि नवीन वाटतो. आमच्या घरातील दोन लग्ने तिथेच झालीत. मॅनेजर आणि मालक जातीने उपस्थित राहतात. आणि किमती खूप माफक आहेत.

स्वप्नशिल्पचा आमचा अनुभव एकदम उलट.

अतिशय उद्धट मालक आणि सेवक. जेवण यथातथाच. माझ्या भावाचे रिसेप्शन झाले होते तिथे २००७ मधे

मनस्मि,

राजयोग कसं आहे ते पण लिहता का?
तिथे दोन हॉल आहेत ना ? आम्ही आमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी ५०० लोकांचा हॉल बुक करायच्या विचारात आहोत.

अतरेंगी
अतिशय छान आणि प्रशस्त आहे. पार्किंगही चांगले आहे. आम्ही लहान हॉल बुक केला आहे. मला वाटते जो मोठा हॉल आहे तो ५०० लोकांसाठी बरोबर होइल.

माझ्या मुलाच्या मुंजी साठी पुढच्या महिन्यात मी गोवर्धन मंगल कार्यालयाचा गोकुळ हॉल (रसोई Dining हॉल) ठरवत आहोत कुणाला त्या बद्दल काही माहिती असल्यास कृपया सांगा (केटरिंग व व्यवस्थापना बद्दल)

राजेंद्र
मागच्या वर्षी आम्ही पुण्यात शनिवार पेठेत रसोई Dining हॉल मध्ये जेवलो होतो. हे तेच असेल तर त्याचं जेवण चांगल होत. व्यवस्थापना बद्दल माहिती नाही.

अरे लिहायला विसरलोच..

अतिशय चांगला हॉल आहे आणि सर्विसही छान. तिथे पाच रुम्स आहेत तिथे आदल्या दिवशी २०/२५ माणसे राहतील अशी सोय आहे. एकंदरीत चांगला अनुभव.

Pages