मुंजीसाठी पुण्यात (२०० कॅपॅसिटी चा) हॉल सुचवाल का

Submitted by mansmi18 on 15 March, 2014 - 06:56

नमस्कार,

मुंजीसाठी पुण्यात (२०० कॅपॅसिटी चा) हॉल सुचवाल का? जवळ गणपती मंदिर असल्यास उत्तम.

आम्ही पुढील हॉल कन्सिडर करतोय:
गणराज मंगल कार्यालय - बाणेर
इंद्रप्रस्थ - सेनापती बापट रोड
शक्यतो वेस्ट पुणे - औंध, बाणेर पण सिटी मधेही चालेल..
(आपले चांगले/वाईट अनुभव सांगा..)

आम्ही काही ठिकाणी चौकशी केली तिथे संपुर्ण भाडे इन अ‍ॅडवान्स घेणार आणि कॅन्सलेशन करायचे असल्यास..जर तो हॉल त्या दिवशी दुसर्‍या कोणी घेतला तरच २५% रक्कम परत मिळेल नाहीतर काहीच परत मिळणार नाहीत असे सांगितले आहे..ही स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलं बजेट काय?

जिजाऊ मंगल कार्यालय चालू शकेल काय?

https://maps.google.co.in/maps?q=jijau+mangal+karyalay&ie=UTF-8&ei=HTYkU...

Jijau Mangal Karyalay
SRPF, Wanowrie, Pune, MH 411022 ‎

अतिशय स्वस्त आणि मस्त. भाडे रुपये २५,०००/- पोलिस किंवा एस आर पी त कोणी ओळखीचे असेल तर फक्त रुपये १०,०००/-

अतिशय महागडे आणि राजेशाही थाटमाट हवा असेल तर हे घ्या:-

https://maps.google.co.in/maps?q=jijau+mangal+karyalay&ie=UTF-8&ei=HTYkU...

Rajyog Banquet Hall
11b, Near Bhatar Petrol Pump, 411003,, Sfurti Society, Wakadewadi, Shivaji Nagar, Pune, Maharashtra 411003 ‎
020 2551 1051 ‎ · rajyoggroup.com

<< संपुर्ण भाडे इन अ‍ॅडवान्स घेणार आणि कॅन्सलेशन करायचे असल्यास..जर तो हॉल त्या दिवशी दुसर्‍या कोणी घेतला तरच २५% रक्कम परत मिळेल नाहीतर काहीच परत मिळणार नाहीत असे सांगितले आहे..ही स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे का? >>

हे योग्य नसले तरी सगळीकडे असेच चालते. जुळवून घ्यावेच लागणार, पर्याय नाही. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा उपटण्याची रीत सर्वत्रच असते.

लक्ष्मीकृपा हॉल, सदाशिव पेठ

उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ

कलाप्रसाद मंगल कार्यालय, विजयानगर कॉलनी

फडके हॉल, सदाशिव पेठ, खजिना विहिरीजवळ

विष्णुकृपा हॉल, शनिवार पेठ

ब्राह्मण मंगल कार्यालय, सदाशिव पेठ

सिद्धार्थ हॉल, कर्वे रोड

रमारमण मंगल कार्यालय, न ता वाडी, शिवाजीनगर

केसरीवाड्याचे सभागृह / हॉल

वर्तक आश्रम, शनिवार पेठ

कामायनीचा मुनोत हॉल, पत्रकार नगर, सेनापती बापट रोड

स्वप्नशिल्प हॉल, डेक्कन जिमखाना

(शनिवार पेठेत अगदी दर पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर मंगल कार्यालये आहेत. सुयश मंगल कार्यालय, कर्वे मंगल कार्यालय इ.इ.)

जस्ट डायल वर सर्वांचे पत्ते, फोन इ. मिळतील.

किंवा सर्च माय हॉल येथे पाहा. www.searchmyhall.com/

तुम्ही मुंज कधी करणार आहात? कारण मागच्याच महिन्यात बहिणीच्या मुलाच्या मुंजीसाठी कोथरूड भागात चौकशी केली. त्याप्रमाणे:
१. लग्न आणि मुंज ह्यांचे एकाच दिवशी मुहूर्त असेल तर मुंजीसाठी सहसा कार्यालय दिले जात नाही. (लग्नाचे कार्य लग्नाला प्राधान्य दिले जाते.)
२. आपल्या सोयीचा मुहूर्त हवा असेल तर बरंच आधी म्हणजे साधारण १ वर्ष आधी बुकिंग करावे लागते.
३. बुकिंग च्या वेळेस पूर्ण पैसे देण्याबाबत मला तरी कुठे अनुभव नाही आला.

मी कोथरूड मध्ये चौकाधी केल्याने तिथले हॉल सुचवत आहे:
१. अंबर कार्यालय, कर्वे रोड
२. मोरेश्वर सभागृह, जोशी रेल्वे म्युझियम जवळ
३. उत्सव मंगल कार्यालय, वनाझ जवळ
४. राजलक्ष्मी, गुरु गणेश नगर जवळ
५. कलादर्शन, गुरु गणेश नगर जवळ (राजलक्ष्मी आणि कलादर्शन हे एकाच बिल्डींग मध्ये आहेत. केटरिंग उत्तम आहे)

माझ्या मुलाची मुंज२०११ मध्ये इंद्रप्रस्थ मधे केली होती.
तेव्हा आमची शंभर माणसेच होती. तेव्हा तरी ते तिसर्‍या मजल्यावरचा छोटा हॉल देत होते. आता माहीत नाही. लिफ्ट आहे.
जेवण अतिशय छान होते.

तेव्हा तरी ते तिसर्‍या मजल्यावरचा छोटा हॉल देत होते << ओह असा हॉल आहे हेच माहित नव्हते. माझे लग्न तिथे झाले होते आणि तो हॉल मोठ्ठा आहे.

हो, त्यादिवशीही खाली लग्न नि वरती मुंज होती.
जेवण तर उत्तम होतेच पण इतर सोयही खूप छान केली होती. मला तरी आवडले.
माझ्या बहिणीचे लग्न कोहिनूर मंगल कार्यालयात झाले होते. ते पण फारच मस्त. काहीच बघावे लागले नाही.

पौड रोडला गाडगीळांच्या दुकानासमोर पुण्याई हॉल आहे. जेवण पण चांगले असते. २०० माणसांसाठी चांगला आहे.

इंद्रप्रस्थला दोन-तीन वेगवेगळे, निरनिराळ्या आकाराचे हॉल्स आहेत. जेवणाबद्दल अनुमोदन.

जनरली कार्यालय निवडताना देण्यात येणार्‍या सोयी + केटरर + रेट्स असे बघून कार्यालय निवडलेले छान. कोहिनूरही चांगले आहे. मनोहर मंगल कार्यालय, पाडळे पॅलेस (कर्वे रोड, नळस्टॉप / मेहेंदळे गॅरेज) हेही पर्याय आहेत. श्रुती मंगल कार्यालयाचे चे जेवण बेष्ट असते.
बरीचशी कार्यालये अ‍ॅडवान्स पेमेन्ट घेतात. शिवाय तुमचे कार्य जेव्हा असते तेव्हाचे वाढलेले दरही बिलात समाविष्ट होतात. (एक वर्ष किंवा बरेच महिने अगोदर बुकिंग केले असल्यास)

बेडेकर गणपती हॉल (पौड रस्ता, कोथरुड) देखील छान आहे, जेवण उत्तम. व्यवस्थाही चोख असते.

देसायांचा स्वामीकृपा हॉल, कर्वे रोड देखील ओक्के आहे. बहुतेक त्यांचेच केटरिंग असते.

हॉटेल राजवाडा येथेही वरच्या मजल्यावर २०० लोकांची कपॅसिटी असलेला एसी हॉल आहे. जेवण चांगले आहे.

गोविंद गार्डनचा हॉल पाहिलात का?

<<<रश्मी.. | 15 March, 2014 - 17:56
मित्र मन्डळ, सारसबाग.>>>फार उत्तम आहे . प्रशस्त जागा, गोखल्यांचे उत्तम जेवण आणि अगदी रिअलीस्टिक दर ! यांचाच आणखी एक हॉल संतनगर मध्ये आहे तोही उत्तम. मित्रमंडळ शेजारी आणखी एक महालक्ष्मी हॉलदेखील छान आहे.

सगळे चांगली माहिती देत आहेत धन्यवाद.

@अरुंधती
हॉटेल राजवाडा म्हणजे पाषाण ला आहे ते का? (तिथे हॉल आहे हे माहित नव्हते).
गोविंद गार्डन पिंपळे निलाखचे का?

@मधुरिमा
आम्ही २०० हायर साईडचे धरले आहे.. कमीच होतील. तिकडे विचारुन पाहतो.
सेनापती बापट रोडवर जवळ गणपती मंदिर आहे का?

श्रुति मंगल कार्यालयाबद्द्ल अकुला अनुमोदन. फार छान जेवण होते. एकूणातच सर्व व्यवस्था व चॉईसेस अगदी रिजनेबल होते. माझ्या मुलाची मुंज तिथेच केली. अर्थात त्याला बरीच वर्षे झाली, अजूनही तेच व्यवस्थापन असेल तर फार चांगले कार्यालय आहे.

श्रुति मंगल कार्यालय,आपटे रोड,डेक्कन जिमखाना हे सर्वच दृशीने एकदम उत्तम आहे.जेवण,व्यवस्था सुंदर. येथील व्यवस्थापन अजुन तेच जुनेच आहे.

कार्यालयाचे एका कार्याचे भाडे किती असते हल्ली? ५ वर्षापूर्वी १ लाख लग्नासाठी होते. ५० माणसे आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी १०० माणसे धरून होता हा रेट. जिलबीच्या जेवणाचा. ह्यात फोटोग्राफर पासून भटजी वगैरे सगळे मिळायचे.

पुण्यातल्या माहितीनुसार इंद्रप्रस्थ किंवा साधारण त्या दर्जाच्या हॉलचे भाडे साधारण पन्नासहजार रुपये आहे. जेवणाचा दर साधारण २०० ते २४५ पासून सुरु होतो. बेसिक रेटमध्ये महाराष्ट्रियन पद्धतीच्या भाज्या आणि जिलेबी असते. गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी ह्यासारखे गोड आणि पंजाबी भाज्या ठेवल्यास किंमत वाढते. साधारण २८५ ते ३५० पर्यंत किंमत जाईल ताटामागे.
हॉटेलचा हॉलही हल्ली फंक्शनसाठी मिळतो. ताटाचे ४५० रु. च्या आसपास लावतात, वेगळे भाडे घेत नाहीत. त्यांच्यात कार्यालयांसारखी किंमतीची रेंज मिळत नाही पण मेन्यूत सूपपासून- आईस्क्रीमपर्यंत पदार्थ मिळतात.

फुले आणि इतर सजावटीचे दर, फोटोग्राफर वगैरे ह्यात समाविष्ट नाहीत.

मी चौकशी केली नाहीये पण तरी पेठांतल्या हॉलमध्ये हे दर खूप वाजवी असतील असे मला वाटते. फक्त तिथे पार्किंग मिळायला कठीण वाटते हा एक मुद्दा आहे.
इंद्रप्रस्थलाही स्वतःचे पार्किंग नाही पण ३००० रुपये देऊन ४० गाड्यांचे पार्किंग विकत घेता येते असे त्यांनी सांगितले.

पेठांमध्ये काही कार्यालयांना स्वत:चे छोट्या प्रमाणात पार्किंग आहे.उदा. विष्णुकृपा कार्यालय. पण बहुतेक पेठेतील कार्यालयांना खूपच मर्यादित पार्किंग आहे हे खरे. तरी जवळपास पेड पार्किंगचे पर्यायही मिळू शकतात.

Pages