तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात...

Submitted by अतुल ठाकुर on 15 March, 2014 - 00:54

नियम माहित नसल्याने हे फोटो टाकले होते. आता माहित झाल्याने काढुन घेतले आहेत. क्षमस्व!

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल....

अभ्यासानिमित्ताने होणार्‍या भटकंतीमध्ये तुमच्या सोबतीला कॅमेरा असणार याची मला खात्री होतीच. आज त्याचा अचूक उपयोग दिसला. "अकृत्रिमपणातच त्यांचं सौंदर्य जाणवलं....." हे मत फार पटले. पूर्वी स्त्रियांचा गट असा. कॅमेरामनच्या समोर उभाही राहात नसे; पण आधुनिकतेच्या सोबतीने त्यांच्यातही धीटपणा वाढत चालल्याचेच हे लक्षण होय.

एकमेव पुरुष आहे फोटोत....पण हेच गृहस्थ अगदी "स्कॉलर" वाटतात....[ असाच एक फोटो मी कोल्हापूरातील शाहु स्मारक भवनात आयोजित केलेल्या फोटो स्पर्धा प्रदर्शनात पाहिला होता. त्याला त्या कलाकाराने 'स्कॉलर' हे नाव दिले होते. प्रथम क्रमांक मिळाला होता, त्याची आठवण झाली....पण आता वाटते की तुमचा फोटो अस्सल आहे. डोळ्यातील ती तपकिरी झाक तर किती आणि कसले पावसाळे उन्हाळे मी काढले आहेत हे सांगणारी].

अशोकराव अगदी खरं आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तरी या लोकांसमोर नामोहरमच झालो. साला शिक्षणाचा अभिमान वगैरे साफ उतरुन गेला. अकृत्रिमपणात, निरागसतेत काहीतरी "फायरब्रश" सारखं असतं वाटतं. जळमटं धुवुन टाकणारं Happy

सुंदर फोटो. पहिला फोटो खुप आवडला.

आपल्याला नीटनेटके, आपल्या मापदंडानुसार भारी कपडे घातलेले आणि अस्सेसरीज ल्यायलेले लोकच स्मार्ट वाटतात. पण मुद्दाम आजुबाजुला दिसणा-या बंजारी, राजस्थानी आणि इतर अशाच वेगळ्या पेहरावात असलेल्या बायकांचे निरिक्षण केले तर त्यांच्यात दडलेले सौंदर्य लक्षात येते. वाटते किती छान दिसताहेत या सगळ्या. फक्त त्यांच्या रोजगाराने त्यांना मळकट केलेय, त्यांचे रंग रापलेत.