बीटेक स्क्रिप्टसाठी मदत हवीये- युनिक्स

Submitted by रीया on 14 March, 2014 - 06:14

मी एक बीटेक स्क्रिप्ट लिहिली आहे.
त्यातुन मी टेराडेटाला लॉगिन करुन एका टेबलचा डेटा एका टेक्स्ट फाईलमध्ये घेतेय.
टेबलमध्ये ७ कॉलम्स आहेत.
जेंव्हा मी .set WIDTH 500 ही कमांड वापरतेय तेंव्हा तीनच कॉलमचा डेटा मला दिसतोय.
आणि जेंव्हा विड्थ १००० ला सेट करतेय तेंव्हा मला टेबल नीट फॉर्मॅट मध्ये दिसत नाहीये.
काय करावं लागेल?

महत्वाची सुचना :
ही माहीती गूगलवर मिळत असताना इथे विचारायचं कारण असं की मला युनिक्स फारसं येत नाही. गूगल केलं तर बेसिक पासुन शिकावं लागतंय. शिकायला सुरुवात केलीये पण हा कोड मला आजच्या आज द्यायचाय आणि तेवढा वेळ नाहीये. म्हणून इथे कोणाला माहीत असेल तर मदत होईल इतकाच भाव मनी Wink
तेंव्हा प्लिज हे असं का केलं त्याबद्दल फार काथ्याकुट न करता मदत करा ही विनंती!
काम झाल्यावर धागा काढुन टाकायची विनंती करेन!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या स्पेसिफिच प्रॉब्लेमसाठी सर्च केल्यास बर्‍याच लिंक्स आहेत गूगलवर. सगळं युनिक्स बेसिकपासून शिकायची गरज नाही.

SET LINESIZE आणि set pagesize ट्राय कर म्हणजे टेबल नीट फॉर्मॅट मध्ये दिसेल.
मला बिटेक script माहित नाही पण हे sql madhye नेहमी वापरतो.

सेट विड्थ ५०० हे तीनदा करून कट पेस्ट करता येइल का? तर तीन तीन आणि एक असे कॉलम दिसतील मग ते कट पेस्ट करून एक शीट बनेल. विनो दी वाटले तर सोडून द्या.

रिये, पुलाखालून बरच पाणी वाह्यलयं, पण प्रयत्न करते. गूगल शोधाशोधीत कायकाय सापडलं:

1) Try using set foldline to set report lines to multiples. But then you might need to export data & manually format this.

2) Check version of teradata, older version to v2r6 limit bteq width to 254. In higher ones 1000 can work better.

जर तुला फक्त डेटा एक्स्पोर्ट करून फाईलमध्ये हवा असेल तर सरळ एक्सेल मध्ये TD ODBC वापरून इम्पोर्ट कर. जे हवे ते कॉलम्स निवडता येतील अशानं. नंतर हीच फाईल तुला .csv म्हणून स्टोअर करता येइल.

चिन्नू,
Check version of teradata, older version to v2r6 limit bteq width to 254. In higher ones 1000 can work better.
>>
हा दुसरा ऑप्शन ट्राय करण्याचा प्रयत्न केला. काम झालं नाही
आता सध्या मनासारखा रिझल्ट मिळाला नाही पण काम चलाऊ झालाय Sad
तरिही जोपर्यंत मला माझं काम परफेक्ट होत नाही तोपर्यंत चैन पडत नाही तेंव्हा निरळनिरळे ऑप्शन्स ट्राय करुन बघेनच.
मॅन्युअली फॉर्मॅटींग ऑप्शन लास्ट ठेवला होता कारण इट्स बीट टाईम कंझ्युमिंग. काही झालं नाही तर हेच Happy

चिन्नू, अमा, धन्स Happy