माझा मुलगा दोन-अडीच वर्षाचा असताना एकदा त्याच्यासोबत एक nursery rhymes ची CD बघत होते. त्यातील काही गाण्याना 'ONCE MORE' असा फलक येई व ती गाणी पुन्हा दाखवली जात. लेकाने 'ONCE MORE' चा अर्थ विचारला. मी शक्य तितक्या सोप्या शब्दात त्याला सान्गितले की एखादी आवडलेली गोष्ट/क्रुती पुन्हा अनुभवता यावी असे वाटत असल्यास 'ONCE MORE' ची मागणी करतात. या चिमुरड्याने हजरजबाबीपणे यावर टिप्पणी केली " मी बाप्पाला सान्गतो की 'SUNDAY...ONCE MORE' म्हणजे आई तु अजुन एक दिवस घरी असशील".
हे ऐकले मात्र डोळ्यात पाणी तरळले. दुसरे काहीही न मागता फक्त आई तू अजुन एक दिवस घरी रहावीस ही ईच्छा, पण तीही आपण पूर्ण नाही करु शकत... नोकरीमुळे
क्षणात त्याला पहिल्यान्दा सोडुन office ला गेले तो दिवस आठवला. पाच महिन्यान्चा होता तो तेव्हा. स्टेशनवर मला सोडायला आला होता, त्याला साम्भाळणार्या बाईसोबत. बाहेरची गम्मत, झुकझुक गाडी दिसल्याचा आनन्द यात साहेब गर्क होते. पणा आईच्या कडेवरुन मला या मावशीनी घेतलय अन आई निघुन जातेय कुठेतरी हे पाहुन मात्र ते निष्पाप डोळे बघता बघता पाण्याने डबडबले.
त्याला कधीच पाळणाघरात वा तत्सम ठिकाणी ठेवावे लागले नाही कारण आमच्या आई त्याला साम्भाळतात, बाईच्या मदतीने. स्वतःच्या घरात, खाण्या-पिण्याचे सगळे लाड पुरे होत असतानाही त्याच्या नकळतच तयार होउन बाहेर पडावे लागायचे हे ही तितकेच खरे.
हा आणि असाच अनुभव बर्याच जणीन्चा असेल आणि त्यानन्तर मन ग्रासुन टाकणारी अपराधीपणाची भावना...
हा 'SUNDAY... ONCE MORE' कायमचा मनात घर करुन राहिला. बदलता काळ, वाढती महागाई,
second income ची गरज, career या सगळ्या बाबी मान्य. पण तरीही या छोट्याची 'SUNDAY ONCE MORE' ची मागणीही अवाजवी नक्कीच नाही कारण मी लहान असतानासुद्धा बाप्पाकडे असच काहीस मागत आले होते. शब्द वेगळे असतील पण भावना त्याच 'SUNDAY... ONCE MORE'
गामांची मुक्ताफळं नेहमीसारखीच
गामांची मुक्ताफळं नेहमीसारखीच मेंटल्मार्गाला जाताना बघून आश्चर्य नाहीच वाटलं. हे असले मेंटल विचार अस्तित्वात असून सुद्धा दररोज अधिकाधिक बायका स्वतःचा कॉमन सेन्स वापरुन नोकरी/व्यवसायाकरता घराबाहेर पडत आहेत ही गोष्ट असल्या बिन्डोक विचारांच्या थुत्त्रीत सण्सणीत चपराकच आहे.
>>>>>>>>>>>
याबद्दल खूप वाईट वाटले. मलाही त्यांचे काही विचार नाही पटले म्हणून झाले मतभेद आणि त्यातून चर्चा. पण इथे प्रत्येकाचे आपापले मत असते आणि ते त्यांच्या स्वताच्या अनुभवातून आणि आजूबाजूला पहिलेल्या समाजातून आलेले असतात जे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. जेव्हा आपण एखाद्याच्या विचारांवर हसत असतो तेव्हा बरेचदा आपण आपल्याच समाजावर हसत असतो.
एक सहज डायलॉग - जेव्हा आपण एखाद्याच्या विचारांचा त्रागा करून घेतो तेव्हा आपण स्वताचीच मनःशांती घालवत असतो.
<<<इथे प्रत्येकाचे आपापले मत
<<<इथे प्रत्येकाचे आपापले मत असते आणि ते त्यांच्या स्वताच्या अनुभवातून आणि आजूबाजूला पहिलेल्या समाजातून आलेले असतात जे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. >>>
मतां(विचारां)चा पाया स्वानुभव आणि निरीक्षण हेच असू शकतात असे नाही असे माझे निरीक्षण आहे. याव्यतिरिक्त अन्य काही गोष्टींना आधार मानूनही काही लोक आपली मते ठरवत असतात.
गापै, अनुमोदन ! तुम्ही योग्य
गापै, अनुमोदन !
तुम्ही योग्य ते लिहिले आहे, त्यामुळे आम्ही फार काही वेगळे लिहिण्याची गरज नाही यावर,
खरेतर तुमच्या मदतीला यायची इच्छा होती,
पण वादविवाद करत बसण्याएवढा वेळ नाही आहे सद्ध्या
याव्यतिरिक्त अन्य काही
याव्यतिरिक्त अन्य काही गोष्टींना आधार मानूनही काही लोक आपली मते ठरवत असतात.
>>>>
शक्य आहे भरत, पण जर त्या अन्य काही गोष्टी म्हणजे काय हे समजले तर त्यावर भाष्य करता येईल.
अरे हो, एक प्रकार देखील बरेच ठिकाणी चालतो, आधीचे मत कोणाचे आहे हे बघून आपले मत ठरवणे. पण अश्या केसेस ओळखून आपल्यापरीने चर्चा तिथेच थांबवणे उत्तम.
अनेक बायकांना
अनेक बायकांना नोकरी-पोटापाण्याच्या उद्योगासाठी घराबाहेर पडण्याखेरीज अन्य पर्याय नसतो. नवरा किंवा बाप दारुडा, व्यसनी, जुगारी किंवा निष्क्रिय असेल, आजारी असेल, घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर अगदी कोवळ्या वयापासून मुली चार कामं करून पैसे मिळवतात, घर सांभाळतात, चार पैसे साठवतात, स्वतःचे आयुष्य व पर्यायाने आपल्या कुटुंबाचे आयुष्य सावरायचा प्रयत्न करतात. तिथे त्या लीलया घराचा आर्थिक भार उचलतात. लग्न, मुलं, वय, तब्येत इत्यादी गोष्टींना आपल्या कामाआड येऊ देणे त्यांना परवडत नाही.
आणि हे अगदी आजच्या काळातले नव्हे तर बर्याच आधीपासूनचे चित्र आहे. अगदी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या पणजीच्या काळापासूनचे. त्याअगोदरही नक्कीच असेल. माझी पणजी तिचे पती, म्हणजे माझे पणजोबा निवर्तल्यावर रोज स्वतः शेतावर जाऊन शेतीकामे व सावकारी करणे, बाजारात धान्य विक्रीला नेणे, गुराढोरांची देखभाल इत्यादी कामे करायची. तेव्हा माझी आजी व तिची इतर भावंडे बरीच लहान होती. (इ.स. १९२० दरम्यानचा काळ असेल तो!) पण माझ्या आजीच्या सांगण्यानुसार माझ्या पणजीला ही कामे करायला आवडायचे व नंतर तर स्वतंत्र निर्णय घेण्याची सवय झाल्यावर ती अगदी शेवटपर्यंत स्वतःचे व घरासंबंधीचे आर्थिक निर्णय स्वतःच घेत राहिली.
त्यामुळे लेकुरवाळ्या बायांना अर्थार्जनासाठी घराबाहेर पडण्याची गरज ही अगोदरपासून होती व आजही आहे. तेव्हा त्यांनी त्यात कमीपणा मानला नाही. [कदाचित समाजाने मानला असेल.] कष्ट करून पैसे कमावणे हे तेव्हा गरजेपायी होत असले तरी आर्थिक व अन्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य एकदा अनुभवल्यावर स्त्रिया मागे कशा फिरतील? आता फक्त हा निर्णय सुशिक्षित किंवा अर्धशिक्षित स्त्रिया 'बाय चॉईस' घेताना दिसतात. त्यात काहीच गैर नाही.
स्त्रीयांनी बाहेर नोकरी करणे
स्त्रीयांनी बाहेर नोकरी करणे = पोराबाळांची आबाळ हे समिकरण अगदी पक्कं बसलेलं दिसतं लोकांमध्ये. त्याला कारणं (भुतकाळातली) ही आहेत पण सध्याच्या सामाजिक परिस्थिती बघता ही समिकरणं परत पडताळून पाहून बदलण्याची अत्यंत गरज आहे.
फारसा पगार मिळत नसेल तर बाहेर पडायची गरज काय आहे हा एक वरकरणी साधा, प्रॅक्टिकल विचार वाटला तरी नीट बघता हा एक प्रचंड दिशाभूल करणारा आणि अत्यंत धोकादायक विचार आहे.
वर बर्याच जणांनी लिहिलय तसं कितीही कमी पैसे आले तरी त्याचा घराला हातभार लागतो हा मुद्दा तर आहेच पण त्याही पलिकडे बघता बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभं न राहणं ह्याचा थेट संबंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी आहे हे विसरून चालणार नाही.
किती घरी राहणार्या स्त्रीया पुढे जर दुर्दैवाने काही कारणास्तव त्यांना त्यांच्या मुलांना घेऊन एकटं राहायची वेळ आली तर मुलांचे संगोपन, त्यांच्या आणि स्वतःच्या आर्थिक गरजा भागवणे ही सगळी कामं अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतील? घरात राहून महत्वाच्या गोष्टींची माहिती असणे किंवा माहिती शिकणे आणि बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभे राहाणे ह्यात खुप मोठा फरक आहे. बर्याच स्त्रीयांना तर आपल्या घराशी निगडीत आर्थिक व्यवहारांविषयी काहीच माहिती सुद्धा नसते. हा झाला उद्या दुर्दैवाने काही झाले तर काय हा मुद्दा, कित्येक स्त्रीयांना तर कधीही घराबाहेर न पडल्यामुळे स्वतःच्या मुलभूत हक्कांविषयी सुद्धा माहिती नसते (ह्याला अपवाद नक्कीच असतील पण किती हा एक वेगळा विषय आहे).
इथे ह्या स्त्रीयांना दोष देण्याचा हेतू आजिबातच नाहीये पण कमीत कमी वर मेधानी उल्लेख केलाय तसं पुढच्या पिढीला आपण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे ह्या दृष्टिने ह्या विचारांच्या पगड्याखाली न राहता इतर लोकं काय म्हणतायत, काय करतायत त्यांना त्याचा काय फायदा होतोय हे डोळसपणे बघायला नको का?
नीधपनी लिहिलय तसं सतत स्त्री = मुलं/घर संभाळणे हे कंडिशनिंग केलेलं असल्यामुळे पुरुष तर पुरुष पण स्वतः स्त्रीया सुद्धा हाच कित्ता गिरवताना दिसतात. आपल्याला स्वतःला ह्या कंडिशनिंगचे तोटे जर नाही कळले तर आपण हे चक्र (vicious cycle) कसे मोडणार?
मुलगी झाली की तिच्या शिक्षणावर लक्ष देऊन पुढे स्वतःच्या पायावर कोणाच्याही मदतीशिवाय उभं राहायला शिकवणे, स्वत:चा जोडीदार शोधताना जो संसाराच्या सगळ्याच जवाबदार्या (फक्त आर्थिक नाही तर मुलांचे संगोपन, घरातली कामं हे सगळं) जोडीनी करायला तयार असेल असा शोधणे आणि वेळ आली तर स्वतः एकट्याने ह्या जवाबदार्या न घाबरता धडाडीनी पार पाडणे असं कंडिशनिंग आई-बाप जेव्हा करायला सुरवात करतील तेव्हाच खरं हे चक्र मोडू शकतं.
या लेखाचा उद्देश मलाही नाही
या लेखाचा उद्देश मलाही नाही कळलाय. तुम्हाला कोणी डोक्याला बंदूक लावून नोकरी करायला सांगत नाहीये. तुम्ही नोकरी स्वतःसाठी करताय, समाजासाठी नाही. आणि मूलही स्वतःसाठीच- स्वतःला हवं म्हणून जन्माला घातलंय- समाजासाठी नाही. त्यामुळे जर त्रास होत असेल नोकरीचा तर सोडून दया ना. गरजा कमी केल्या तर एकाच्या पगारात भागेल. करीयरही नाही केलं तर चालू शकेलच. शेवटी तुमचा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे.
नोकरीमुळे येणारं बांधलेपण ही काही केवळ आयांची समस्या नाहीये.
माझ्या एका अविवाहित सहकाऱ्याने वृध्द, आजारी वडिलांना सांभाळण्यासाठी चांगली नोकरी सोडून पार्ट टाईम जॉब घेतला. या जॉबमध्ये पगार अत्यंत कमी आहे व करीयरच्या दृष्टीनेही त्यात काहीच फायदा नाहीये- डेड एन्ड जॉब आहे. पण त्याला मुलगा म्हणून त्याचं कर्तव्य जास्त महत्वाचं वाटलं पैसा आणि करीयरपेक्षा.
माझ्या एका मैत्रिणीला एका अपघातानंतर पाठदुखीचा त्रास सुरु झाला. ती विवाहित आहे पण अजून मूल नाहीये. घरी ती व नवरा दोघंच. सगळं काम करायला नोकर-चाकर. तरीही तिला चांगली नोकरी सोडावी लागली कारण पाठीचा त्रास नोकरीत दिवसभर कंप्युटरसमोर बसणं आणि रोज कम्युट करणं यामुळे फारच वाढला होता.
माझ्या अजून एका मैत्रिणीकडे अनेक वर्षं असलेला कुत्रा आजारी पडला व त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तो कुत्रा तिच्यासाठी फॅमिली मेम्बरच होता व तिच्यासाठी अतिशय महत्वाचा होता. तरीही ऑफिसचं काम असल्यामुळे तिला त्याच वेळी परदेशात जावं लागलं. परदेशात काम करत लवकरात लवकर भारतात परतण्याचा प्रयत्न करत राहणं, एकीकडे कुटुंबियांशी बोलून कुत्र्याच्या अपडेट्स घेत राहणं- याचा तिला अतिशय भावनिक त्रास झाला.
थोडक्यात काय- नोकरीमुळे येणारं बांधलेपण हे कोणासाठीही आणि कधीही त्रासदायक ठरु शकतं - फक्त ’आई’ असलेल्यांसाठीच हा स्पेशल प्रॉब्लेम आहे असं समजून इतरांचे प्रॉब्लेम belittle करु नये इतकीच अपेक्षा. मूल असो वा नसो- प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा equally त्रासदायक असतो.
वर्क लाइफ बॅलन्स हा खरेतर
वर्क लाइफ बॅलन्स हा खरेतर मुद्दा असला पाहिजे. सिंगल पेरेंट सिच्युएशन मध्ये तर दोन्ही बाजूंवर लढावे लागते. मग इथे तर मुलाला सांभालणारी आजी आहे, बाबा आहेत. रिसोर्स रिच आहे मूल ही मोठे आहे तसे
परवाच मी ठाण्यात तीन महिन्यापासून मुले ठेवून घेतो अशी पाळणा घराची जाहिरात वाचली. कसे तरीच झाले पण असेल कुणाची सिच्यएशन तर आपण जज करू शकत नाही.
खरे तर घरी बसणारी ग्रूहिणी ही आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या वर्गा मधलीच सिच्युएशन आहे. शेतीवर लेबर करणार्या, विड्या वळणार्या, बांधकाम क्षेत्रात काम कर्णार्या आणी इतर कश्टकरी समाजात महिलांचेच का
पुरुषांचे ही हातावरच पोट असते मुले घरी एकटीच नाही तर आईबरोबर. आईला दिवसाची मजूरी मिळाली की खरेदी करून मग स्वयंपाक करून मुलांना जेवण मिळते. अश्या परिस्थितीत मध्यमवर्गीय गृहिते जरा लंगडी वाटू लागतात.
अर्थार्जन नाही; तर करीअर असणे ही स्त्रीची मानसिक गरज अस्ते ह्या सत्याला न स्वीकारणे किती घातक आहे. तिला आपल्या कह्यात ठेवणे तिला आर्थिक स्वातंत्र्य न देणे, ह्यातून परावलंबी डिप्रेस्ड स्त्रीया बनत जातात. हे निरोगी नाही. काम करून आल्यावर मुलांशी डोळाभेट होणे, हे आई व बाबा दोघांनाही तितकेच सुखद व आश्वासक असते . अनुभव असेलच. मूल वाढवण्यातील बाबांचा सहभाग अतिशय मोलाचा असतो. जबाब्दारी घेणारे ही बाबालोक्स असतातच तेही आवडीने. ही फक्त आईची जबाबदारी अशी मानसिकता बदलते आहे. बायकांना नोकरी व करीअर करून पुढे जाता यावे ह्यासाठी सिस्टिम व पॉलिसीज सुधारण्याची गरज आहे एस बी आय कॅप्स मध्ये बायकांना तीन वे ळा मोठे ब्रेक्स मिळ तात असे वाचले होते. डिलिवरी साठी, मुलांच्या दहावी/ बारावी परीक्षे साठी व एखाद्या मोठ्या महत्त्वाच्या कारणासाठी. पॅटर्निटी लीव्ह वगैरे प्रकारही आता भारतात रुजत आहेत. त्यामुळे बा बा लोक्स मूल आजारी पडले व आई बिझी असली तर घरी थांबू शकतात. घर संसार चालवण्यासाठी महिन्याची महिन्याला बिले भरावी लागतात ही बाब अगदीच लिंग निरपेक्ष आहे.
पेट थेरपी , अनुमोदन १०० +
पेट थेरपी , अनुमोदन १०० +
वर्क लाइफ बॅलन्स हेच फार महत्वाचे आहे.
बाकी गापै चे सगळे प्रतिसाद हास्यास्पद आणि सारासार विचाराचा अभाव असलेलेच आहेत. विशेषकरून खालील वाक्य वाचून गापै ची मुक्ताफळे असा नविन एक धागा सुरू करावा काय असे वाटले. एकदम मास्टरपीस आहे
अगदी जिव्हाळ्याचा विषय! लेकुरवाळ्या बाईला घराबाहेर काढून आपण नक्की काय मिळवत आहोत? >>
हे वाचून डोळ्यासमोर असे चित्र उभे राहिले की नुकतीच बाळंतीण झालेली आणि पदरी अजून २-४ पोरे असलेल्या बाईला नवरा आणि सासारची मंडळी घरातून हाकलून लावत आहेत.

असे प्रत्यक्ष चित्र (सासरचे लोक लेकूरवाळया बाईला बेघर करताना ) या गापै प्रिय भारतीय संस्कृतीत प्रत्येकाला कधी ना कधी पहायला मिळतेच. पण ते चित्र बघून गापै कळवळत नाहीत.
तर बाई पैसा मिळवते तो ही पोराला सोडून , अरेरे .... काय ही आमच्या संस्कृतीची वाताहात
बायकांनी खूप जास्त पैसा मिळवण्याची महत्वाकांक्षा ठेवणे महापाप आहे. त्यांनी आपली पोरे संभाळावी आणि मुले मोठी झाली की किडूक मिडूक काम करून थोडेफार पैसे घरासाठी मिळवावेत नाही का
हुशार व कर्तबगार महिलांसाठी 'मूल होऊ न देणे' हा एक पर्याय उपलब्ध आहेच. दत्तकनिधान हाही पर्याय आहे. >>
अरे वा!! म्हणजे हाय प्रोफाईल जॉब करणार्यांनी मुले होऊ देऊ नयेत किन्वा दत्तक घ्यावीत . अजब आहे !!
आणि दत्तक तरी कसे काय चालेल बुवा ?? दत्तक आणलेल्या पोराला सोडून नोकरीला गेले तर काही फरक पडणार नाही का ? त्याला आई नसली तरी चालते का ? का दत्तक पोराविषयी पोटच्या पोराएव्हढे प्रेम नसतेच हे गृहितक आहे या विचारामागे ?
रच्याकने , मी बाई आहे आणि मला लहान मुलगी आहे. मला स्वतःला पैसे मिळवायला आणि हाय प्रोफाईल जॉब करायला खूपच आवडते. इथे अमेरिकेत मुलीला डे केअर मधे ठेवून मी मस्त कमवतेय गेली काही वर्षे. मला कोणतेही गिल्ट नाही. मुलीचेही फारच छान चाललेय. आणि बरं का, इथे मला घरून काम देखिल करता येते त्यामुळे मला आरामदेखिल करता येतो
माझ्या कामामुळे , मी, मुलगी किन्वा नवरा कोणीच बिच्चारे वगैरे झाले नाहीये. आमचे कोणाचेच काही हाल होत नाहीयेत.
उद्या जर मला गापै सारख्या कोणी जबरदस्ती घरात बसायला लावले तर मात्र काही काळाने माझी मनस्थिती बिघडून त्याचा मुलीला , नवर्याला त्रास होईल हे नक्की.
डेलिया, १. >> हे वाचून
डेलिया,
१.
>> हे वाचून डोळ्यासमोर असे चित्र उभे राहिले की नुकतीच बाळंतीण झालेली आणि पदरी अजून २-४ पोरे असलेल्या
>> बाईला नवरा आणि सासारची मंडळी घरातून हाकलून लावत आहेत.
फार छान. अशीच कल्पनाशक्ती लढवत रहा. आमचीही करमणूक होईल.
२.
>> असे प्रत्यक्ष चित्र (सासरचे लोक लेकूरवाळया बाईला बेघर करताना ) या गापै प्रिय भारतीय संस्कृतीत प्रत्येकाला
>> कधी ना कधी पहायला मिळतेच. पण ते चित्र बघून गापै कळवळत नाहीत.
भारतीय संस्कृतीचा संबंध काय इथे?
३.
>> बायकांनी खूप जास्त पैसा मिळवण्याची महत्वाकांक्षा ठेवणे महापाप आहे. त्यांनी आपली पोरे संभाळावी
>> आणि मुले मोठी झाली की किडूक मिडूक काम करून थोडेफार पैसे घरासाठी मिळवावेत नाही का
प्रस्तुत धागा पैसेवाल्या वा पैसे कमवतांना तडजोडी करणाऱ्या बायकांसाठी नाहीये. पैसे नसल्याने झक मारत नोकरी करायला लागणाऱ्या बायकांसाठी आहे. मुलं एकटी टाकून जाववत नाही आणि घरी पैसे कमी पडतात, अशी ती समस्या आहे.
बायकांनी खूप जास्त पैसा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणे पाप नाही. किंमत मोजायची तयारी असली म्हणजे झालं.
आणि ते किडूक मिडूक काम कशाला? चांगला व्यवसाय करावा की स्वत:चा! 'indian businesswoman' असं गुगलून बघा. नंतर 'japanese businesswoman' असं गुगलून पहा. बघा काहीतरी भलतंच येतं. भारतात स्त्रियांना व्यवसायास जपानपेक्षा अधिक वाव आहे.
४.
>> अरे वा!! म्हणजे हाय प्रोफाईल जॉब करणार्यांनी मुले होऊ देऊ नयेत किन्वा दत्तक घ्यावीत . अजब आहे !!
यात अजब काय? पर्याय या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीवरील एका आदरणीय सदस्येने दत्तकपुत्राचा मार्ग स्वीकारला आहे (चूभूदेघे).
५.
>> आणि दत्तक तरी कसे काय चालेल बुवा ?? दत्तक आणलेल्या पोराला सोडून नोकरीला गेले तर काही फरक
>> पडणार नाही का ? त्याला आई नसली तरी चालते का ? का दत्तक पोराविषयी पोटच्या पोराएव्हढे प्रेम नसतेच हे
>> गृहितक आहे या विचारामागे ?
ज्या बायकांसाठी कारकीर्द महत्त्वाची आहे त्यांना त्यात्या प्राधान्यानुसार दत्तक मूल घेणे शक्य होत असावे. उदा. : पाळणाघरी सोडून जायचे असेल तर किमान वय अमुकअमुक, इत्यादि. मी या विषयातील तत्ज्ञ नाही. जाणकार लोक अधिक माहिती देऊ शकतील.
६.
>> माझ्या कामामुळे , मी, मुलगी किन्वा नवरा कोणीच बिच्चारे वगैरे झाले नाहीये. आमचे कोणाचेच काही हाल
>> होत नाहीयेत.
बरं मग? या धाग्यात जी व्यथा मांडली आहे ती तुमच्यासाठी लागू नाही. एव्हढं साधं तुम्हाला कळंत नाही! नवल आहे.
७.
>> उद्या जर मला गापै सारख्या कोणी जबरदस्ती घरात बसायला लावले तर मात्र काही काळाने माझी मनस्थिती
>> बिघडून त्याचा मुलीला , नवर्याला त्रास होईल हे नक्की.
यासाठी गापै कशाला पाहिजे? तुमच्या तुम्हीच बसलात तरी त्रास होईल!
आ.न.,
-गा.पै.
वैद्यबुवा, तुमचा इथला
वैद्यबुवा,
तुमचा इथला प्रतिसाद आवडला. अचानक दुर्दैवाने घराबाहेरचे व्यवहार बघावे लागले तर नोकरी करणारी स्त्री अधिक कौशल्याने मार्ग काढू शकते हे निरीक्षण विशेषत्वाने पटलं.
मात्र एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं :
>> आपल्याला स्वतःला ह्या कंडिशनिंगचे तोटे जर नाही कळले तर आपण हे चक्र (vicious cycle) कसे मोडणार?
ज्याला तुम्ही कंडिशनिंग म्हणताहात त्यास नैसर्गिक कल असंही म्हणता येऊ शकेल. अर्थात, काही पुरूषांचा संगोपनाकडे नैसर्गिक कल असू शकतो.
हे कंडिशनिंग नक्की कोण करतो? कारकत्व कोणाकडे द्यायचं?
आ.न.,
-गा.पै.
ज्या बायकांसाठी कारकीर्द
ज्या बायकांसाठी कारकीर्द महत्त्वाची आहे त्यांना त्यात्या प्राधान्यानुसार दत्तक मूल घेणे शक्य होत असावे. उदा. : पाळणाघरी सोडून जायचे असेल तर किमान वय अमुकअमुक, इत्यादि.
>>>> सिक मेन्टॅलिटी!! तुम्ही काहीतरी लेम एक्सप्लेनेशन दिलेय पण डेलिया म्हणते तसाच आर्थ निघत आहे!
दत्तक मुलाला आई ची गरज तेवढी नसावी तुमच्या मते!! अनबिलिव्हेबल विचार !!!
>>हुशार व कर्तबगार महिलांसाठी
>>हुशार व कर्तबगार महिलांसाठी 'मूल होऊ न देणे' हा एक पर्याय उपलब्ध आहेच. दत्तकनिधान हाही पर्याय आहे. मला वाटतं माबोवर एक सदस्येने हा पर्याय वापरला आहे.>> हे उदाहरण दोनदा दिलंत. दत्तक पर्याय स्विकारणार्या ज्या मायबोली सदस्येबद्दल बोलताय तिने करियर करायचं म्हणून हा पर्याय स्विकारलाय का? चुकीची उदाहरणं देऊन कृपया लिहू नका.
दत्तक पर्याय स्विकारणार्या
दत्तक पर्याय स्विकारणार्या ज्या मायबोली सदस्येबद्दल बोलताय तिने करियर करायचं म्हणून हा पर्याय स्विकारलाय का? चुकीची उदाहरणं देऊन कृपया लिहू नका. >>>> +१
मुलांना पाळणाघरातच सोडायचं असेल तर दत्तक मूल घ्यावं हे अतिशय हीन विचार आहेत.
हा लेख एका स्त्रीने तिच्या
हा लेख एका स्त्रीने तिच्या तत्कालिक .... इथे काय संबंध येतोय?
अत्यंत उत्तम विधान!
प्रत्येक गोष्टीची चिरफाड करून कुणाचे बरोबर कुणाचे चूक अशी चर्चा केलीच पाहिजे का?
आता आम्ही अमेरिकेत असलो तरी तुमच्या आधीच्या पिढीतले. आमची गोष्टच वेगळी. मी नोकरी केली. बायको घरीच बसून तिने मुलांना उत्तम प्रकारे वाढवले.
ज्याला इतर काही जमत नाही त्याने प्रोग्रामिंग करावे, म्हणून मित्रांच्या बर्याच बायका प्रोग्रामिंग शिकल्या नि त्यांनी नोकरी करून बक्कळ पैसा जमवला. पण आमच्या घरी तसे झाले नाही. यात काहीहि विचार चर्चा वगैरे झाले नाही. कुणालाहि काहीही गैर वाटले नाही.
शेवटी मुलगी ११ वर्षाची झाल्यावर तिला वाटू लागले की सगळ्या मैत्रिणींच्या आया नोकरी करतात आपली आई मात्र घरीच असते. त्या वयात तिला यात काहीतरी गैर वाटले. म्हणून मारुन मुटकून सौ. ने नोकरी धरली!! अमेरिकेत काय, कुणालाहि नोकरी, पैका! मज्जाच मग.
एकूण काय, ज्याने त्याने वाट्टेल ते करावे.. इतर लोक उग्गाच काहीतरी बोलतात! लेखिकेला कुणालाहि कसलेहि स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
अश्विनीमामी (पेट थेरपी),
अश्विनीमामी (पेट थेरपी), चांगली पोस्ट.
ज्याला तुम्ही कंडिशनिंग म्हणताहात त्यास नैसर्गिक कल असंही म्हणता येऊ शकेल. अर्थात, काही पुरूषांचा संगोपनाकडे नैसर्गिक कल असू शकतो.>>>>>> नैसर्गिक म्हणता येइल आणि काही उदाहरणांमध्ये तसं असेलही पण एखाद्या व्यक्तीचा कल हा दर वेळेस नैसर्गिक असेल असं नाही (तसा अगदी वाटत असला तरी). एखाद्या व्यक्तीला जर लहानपणापासून काही लिमिटेड ऑप्शन्स दिली गेली तर अर्थातच खुप जास्त शक्यता आहे की त्या दिलेल्या लिमिटेड ऑप्शन्स मधूनच ती व्यक्ती एक ऑप्शन निवडेल. स्त्रीयांच्या बाबतीत म्हणायचं तर अगदी लहानपणा पासून विशिष्ट खेळण्यांशी खेळायचे, विशिष्ट पद्धतीचे कपडे घालायचे, कुठल्या रंगाचे कपडे घालायचे (हे अमेरिकेत जास्त आहे, मुली= पिंक, मुलं = निळे) आणि थोडं मोठं झाल्यावर "एकदा शिक्षण झालं की चांगल्या घरी लग्न करुन देऊ, पुढे तू नीट घर संभाळ, मुलांना संभाळ" असे लिमिटेड ऑप्श्न जर उपस्थित केले जात असतील तर सहाजिक आहे बहुतांश स्त्रीया हेच निवडतील (हेच निवडत आहेत).
जवळ जवळ सगळ्याच पुरुषांचं असतं तसं एक स्वतःचे करियर, स्वतःची ओळख, स्वतःचे/कुटूंबाचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य, ह्या सगळ्यातून मिळणार्या आनंदाला त्या पारख्या होतात किंवा मी तर म्हणेन ह्यात काय आनंद असतो हे त्यांना माहितच नसतं.
Its like the society is selling them cheap dreams!
पुरुषांच्या कलाबद्दल म्हणाल तर तिथेही साधारण तेच लॉजिक लावता येइल. सतत तू पुढे मोठा होऊन नोकरी/व्यसाय करणार आणि
घर संभाळणे, मुलांचे संगोपन ह्याच्याशी तुझा काडीचा संबंध नसेल हेच ऐकत मुलं मोठी होतात.
ह्यात फरक असा आहे की दोन्ही उदाहरणांमध्ये स्त्रीयांचे नुकसान जास्त आहे कारण बाहेर जाऊन नोकरी/व्यसाय करुन पैसे घरात आणताना पुरुष मागे पडले नाहीत पण घरात राहुन बायका मात्र मागे पडल्या.
ज्याला इतर काही जमत नाही त्याने प्रोग्रामिंग करावे, म्हणून मित्रांच्या बर्याच बायका प्रोग्रामिंग शिकल्या नि त्यांनी नोकरी करून बक्कळ पैसा जमवला. >>>>>>>
झक्की, आता तुमचा आणि माझा कोपच्यात दारुचा व्यवहार चालतो म्हणून ठीक आहे नाहीतर मी HOPLIS pronounced as Hopeless (Husbands of Programmer Ladies In States of America) चा मेंबर असल्यामुळे त्यांच्या वतिनी तुमच्या घरावर मोर्चा काढू शकतो, तस्मात येत्या भारत-पाकिस्तान मॅच असलेल्या शुक्रवारी करोना चे २ सिक्स पॅक कृपया घरच्या पत्यावर पोचते करावे अशी नम्र विनंती करतो.
<ज्याला तुम्ही कंडिशनिंग
<ज्याला तुम्ही कंडिशनिंग म्हणताहात त्यास नैसर्गिक कल असंही म्हणता येऊ शकेल> बेसिक में लोचा की सोयिस्कर युक्तिवाद? बहुसंख्य स्त्रियांचा नैसर्गिक कल घरकाम, बालसंगोपन याकडेच असतो असे म्हटले की पुढचे सगळे सोपे होते. पुन्हा कंडिशनिंग असेल तर तेही स्त्रियाच करतात, त्यामुळे त्याचाही दोष स्त्रियांकडेच जातो.
अन्य एका विषयाच्या संदर्भाने मात्र काही विशिष्ट नैसर्गिक कल मान्य करायला बरीच खळखळ झालेली दिसली. तिथे ते नेमके कंडिशनिंगच होते. की नैसर्गिक कल याचा अर्थ बहुसंख्यांना जे योग्य वाटते ते असा होतो?
अन्य एका विषयाच्या संदर्भाने
अन्य एका विषयाच्या संदर्भाने मात्र काही विशिष्ट नैसर्गिक कल मान्य करायला मात्र बरीच खळखळ झालेली दिसली. तिथे ते नेमके कंडिशनिंङच होते. की नैसर्गिक कल याचा अर्थ बहुसंख्यांना जे योग्य वाटते ते असा होतो?>>>>>>>
परफेक्ट मयेकर! माझ्या डोक्यात हाच विचार मगाशी चमकून गेला पण बाफंशी संबंधित नसल्यामुळे लिहायचं टाळलं.
Great posts. Buva aani
Great posts. Buva aani Ashwini Mami.
>>अन्य एका विषयाच्या
>>अन्य एका विषयाच्या संदर्भाने मात्र काही विशिष्ट नैसर्गिक कल मान्य करायला मात्र बरीच खळखळ झालेली दिसली. तिथे ते नेमके कंडिशनिंङच होते. की नैसर्गिक कल याचा अर्थ बहुसंख्यांना जे योग्य वाटते ते असा होतो?
ये क्या रे "नैसर्गिक कल", "कंडिशनिंग" "नैसर्गिक कल", "कंडिशनिंग" !
या तो "नैसर्गिक कल" बोल या तो "कंडिशनिंग" बोल. गा !
वरच्या वाक्यात शेवटी "पै"
वरच्या वाक्यात शेवटी "पै" लिहायचे विसरलो की काय ?
बुवा, यु मेड माय डे! तुमची
बुवा, यु मेड माय डे!
तुमची ह्या बाबतीतली वैचारिक क्षमता (निदान) ह्या बाफ्ला भेट देणार्यांवर तरी स्प्रिंकल व्हावी आणि ती वापरण्याची बुद्धीही त्यांना व्हावी!
हुशार व कर्तबगार महिलांसाठी
हुशार व कर्तबगार महिलांसाठी 'मूल होऊ न देणे' हा एक पर्याय उपलब्ध आहेच. दत्तकनिधान हाही पर्याय आहे>>>
अत्यंत चीप विचार! नेहमीप्रमाणेच सडकी विचारसरणी आणि तत्ववेत्त्याचा आव आणल्याचा प्रयत्न!
<<<प्रस्तुत धागा पैसेवाल्या वा पैसे कमवतांना तडजोडी करणाऱ्या बायकांसाठी नाहीये. पैसे नसल्याने झक मारत नोकरी करायला लागणाऱ्या बायकांसाठी आहे. मुलं एकटी टाकून जाववत नाही आणि घरी पैसे कमी पडतात, अशी ती समस्या आहे.<<<
हो का? कुणी सांगितलं? जरा परत वाचा, आधी लिहिणारीने फक्त तिचा एक अनुभव लिहलाय, पैसे नाहियेत म्हणेन झक वगैरे तुमचेच शब्द आहेत.. असाच सेम लेख एखादा हळवा बापही लिहू शकेल, की माझ्या चिमुरड्याला सोडुन कामावर जाताना जीव तिळतिळ तुटतो!
Its like the society is
Its like the society is selling them cheap dreams! <<
परफेक्ट!
बायका, नोकरी - बेसिक ड्राईव
बायका, नोकरी - बेसिक ड्राईव वगैरे बद्दल
The first is women working, moving into the workforce. I’ve looked at 130 societies through the demographic yearbooks of the United Nations and everywhere in the world. 129 out of 130 of them, women are not only moving into the job market – some places, sometimes, very, very slowly – but, they are moving into the job market and they are very slowly closing that gap between men and women in terms of economic power, health and education. It’s very slow. For every trend in – on this planet, there’s a counter trend. We all know of them, but nevertheless.
The old Arab saying- the Arabs say, “the dogs may bark, but the caravan moves on.” And indeed that caravan is moving on. Women are moving back into the job market. And I say ‘back into the job market,’ because this is not new. For millions of years, on the grasslands of Africa, women commuted to work to gather their vegetables. They came home wit 60-80% of the evening meal. The double income family was the standard. And women were regarded as just as economically, socially and sexually powerful as men. In short, we’re really moving forward to the past.
Then, women’s worst invention was the plow. With the beginning of plow, agriculture, men’s roles became extremely powerful. Women lost their ancient jobs as collectors, but then with the industrial revolution & the post industrial revolution they’re moving back into the job market. In short, they are acquiring the status that they had a million years ago, 10,000 years ago, 100,000 years ago. We are seeing now one of the one of the most remarkable traditions in the history of the human animal. And it’s going to have an impact.
~ साभार हेलन फिशर, टेड्टॉक्स
बुवा.. चांगली पोस्ट. अन्य एका
बुवा.. चांगली पोस्ट.
अन्य एका विषयाच्या संदर्भाने मात्र काही विशिष्ट नैसर्गिक कल मान्य करायला बरीच खळखळ झालेली दिसली. तिथे ते नेमके कंडिशनिंगच होते. की नैसर्गिक कल याचा अर्थ बहुसंख्यांना जे योग्य वाटते ते असा होतो? >> अगदी.
बाकी.. मुक्ताफळांच्या बाफवर दुसर्यांची मुक्ताफळं चिकटवणारे काही आयडी दुसरीकडे स्वतःही मुक्ताफळेच उधळत असतात
सनातन वाचण्याचे परिणाम या
सनातन वाचण्याचे परिणाम या धाग्यावर दिसुन येत आहे
मयेकर, तोडलतं
मयेकर, तोडलतं
भरत मयेकर, >> अन्य एका
भरत मयेकर,
>> अन्य एका विषयाच्या संदर्भाने मात्र काही विशिष्ट नैसर्गिक कल मान्य करायला बरीच खळखळ झालेली दिसली.
तो धागा 'वेगळेपण' सामावताना... हाच ना? मग थेट बोला की. असं पडदानशीन राहून प्रेम काय व्यक्त करताय!
आपण तिथे बहुसंख्यांकांच्या नैसर्गिक कलाबद्दल बोलत होतो, नाहीका? (अवांतर : नैसर्गिक आणि अनैसर्गिक यांविषयी एक भाष्य इथे आहे (माझी रिक्षा).
आ.न.,
-गा.पै.
<< प्रश्न गृहिणीपदास
<< प्रश्न गृहिणीपदास प्रतिष्ठा का मिळत नाही हा आहे. >> कारण गृहिणीपद निवडणार्या स्त्रीला ते तिचे करियर आहे असे आपणच म्हणत नाही आपण त्या स्त्रीलाही प्रतिष्ठा देत नाही की त्या स्त्रीच्या कर्तुत्त्वाला.
बाकी स्त्री किम्वा पुरुष दोन्हीपैकी कोणालाही सोशल कंडिशनिंगमुळे निर्णय घ्यायला लागू नयेत. एखाद्या पुरुषाला रडायचे असेल तर पुरुष रडतात का असे विचारून त्याला रडे दाबण्यास बळजबरी करू नये तसेच स्त्रीवर अनेक गोष्टींची बळजबरी होऊ नये जसे मुलांना जन्माला घालायची त्यांना सांभाळायची, घर साम्भाळायची इत्यादी.
आशिका - तुमचा अनुभव आणि तगमग खूप छान व्यक्त केली आहे. मी ह्या गोष्तीचा विचार करते तेव्हा माझीही तगमग होते. नाही कोणाला सांगता येत नाही त्यासाठी काही करता येत.
सीमा - << अपराधी भावना, मुलांकडे कमी अधिक लक्ष,त्यांचे यशापश यामुळ प्रत्येक स्त्री किंवा पुरुष पालकाच्या मनात द्वंद्व चालूच असते. कुठलाच पालक असे म्हणणार नाही कि मी अगदी पर्फेक्टली मुलांना वाढवतोय. पण त्याचा अर्थ स्त्रीयांनी घरात रहावे आणि पुरुषांनी बाहेर रोजगार मिळवायस जावे म्हणजे द्वंद्व थांबेल असा नाही.
मुलांची आबाळ आई घरी राहून सुद्धा होवू शकते. आणि एकटा पुरुष नोकरी करूनही आईशिवाय बाळाला सुरेख वाढवू शकतो. हे प्रत्येकाच्या पॅरेंटीग स्किलवर अवलंबून आहे. लिंगाधारीत नाही. नसावे. >> ह्याला देता येतील तेवढे मोदक.
Pages