निरोप २

Submitted by सन्केत राजा on 14 March, 2014 - 04:54

"आज खुप वाईट वाटतंय कारण उद्यापासुन आम्ही या शाळेत नसणार आहोत. ज्या शाळेनं ५वी पासुन आम्हाला घडवण्याचं काम केलं ती शाळा आम्हाला यापुढे परकी होणार. हे जे शिक्षक इथे बसलेयत ते उद्यापासुन आम्हाला नाही शिकवणार. नाही आम्हाला ते शिक्षा करणार. पहिल्यांदा ५वी त आलो होतो तेव्हा हे जे माझ्या समोर बसले आहेत आज मान खाली घालुन ते सगळे माझे वर्गमित्र त्यावेळी एकमेकांना ओळखत ही नव्हते. हळुहळु सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि बघता बघता चांगले मित्रही बनले एकमेकांचे. एकत्र अभ्यास केला, खेळलो, डबे खाल्ले, मजा केली यांच्याबरोबर आणि आता तेच मित्र दुर जाणार एकमेकांपासुन. प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असणार. कोण शहरात जातील, कोण इथे राहातील पण दिसणार नाहीत कदचित. कधी दिसले तर दोन शब्द बोलतील, मागच्या आठवणी काढतील अन निघुन जातील. शेवटी राहतील त्या आठवणीच. का हे असं. का ठेवली ही १०वी ची परीक्षा अशी? जिवाभावाच्या मित्रांची ताटातुट करायला? १०वी त आलो तेव्हाच जाणीव झाली होती आता आप्ण हळुहळु दुर जाणार आहोत आणि हे समजल्यापासुन तर आमच्यातली मैत्री अजुनच घट्ट झाली. आत्ता यांच्यातले काही जण अगदी निर्विकार आहेत, त्यांना कसलंच दु;ख नाही मित्र न भेटण्याचं; प्ण मी खात्रीनं सांगतो की जेव्हा इथुन निघाल ना तुम्ही तेव्हा दिसेनासे होईपर्यंत मागे वळुन पाहाल एकमेकांकडे आणि किमान दोन तरी अश्रु येतील तुमच्या डोळ्यांतुन मित्रांसाठी. तेच तुमच्या मैत्रीचं प्रतिक असणार आहे रे."
अत्यंत भावूक होऊन १०वी चा वर्गप्रमुख असणारा, आपल्या चांगल्या वागणूकीसाठी पुर्ण शाळेत प्रसिद्ध असणारा मुलांमधील सगळ्यात हुशार मलगा संकेत सावंत बोलत होता. डोळे भरुन आले होते त्याचे आणि इतर सगळ्यांचेच. मुलांमध्ये त्याच्याइतका प्रभावी बोलणारा दुसरा कुणीच नव्हता. आणि तोच आज आपले मनोगत सर्वांच्या समोर व्यक्त करत होता. पाटी सरांच्या आवाहनानंतर कुणीच उठायच्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या बघुन जड अंत:करणाने तो उठला होता. तसही वर्गाचा प्रमुख म्हणुन त्याच्याकडे एक खास कामगिरी सोपवण्यात आली होती ती तो करणार होताच पण पुढे गेल्यावर स्वत:ला रोखु न शकल्याने त्याने आपले दु:ख लगेच मांडले होते. अजुनही तो बोलतच होता.
"हे जे सगळे शिक्षक माझ्या मागे बसलेयत त्यातल्या प्रत्येकाने आम्हाला शिकवलं आहे आपली मुलं समजुन. परब सर, पाटील सर, चव्हाण सर, तावडे सर, नाईक बाई, पाटकर बाई, या सगळ्यांनी आम्हाला अमुल्य असं ज्ञान दिलं आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना आमच्या वर्गातर्फ़े छोटीशी भेटवस्तु देऊन कृतज्ञता व्यक्त करणार आहोत." असे म्हणून त्याने आपल्या वर्गातील सगळ्यात हुशार मुलगी, आशंका लाड कडे बघितले तेव्हा १०वी चा वर्ग सोडुन इतर सर्व जणांना उत्सुकता लागली होती की ही मुलं काय देणार आहेत? कारण________________________________________________________________________________________________
आज शाळेच्या इतिहासात प्रथमच असं काहीतरी होत होतं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत भावूक होऊन १०वी चा वर्गप्रमुख असणारा, आपल्या चांगल्या वागणूकीसाठी पुर्ण शाळेत प्रसिद्ध असणारा मुलांमधील सगळ्यात हुशार मलगा संकेत सावंत बोलत होता. डोळे भरुन आले होते त्याचे आणि इतर सगळ्यांचेच. मुलांमध्ये त्याच्याइतका प्रभावी बोलणारा दुसरा कुणीच नव्हता.
>>> आता स्वतः बद्दल एव्हढे मार्केटिंग करणे थांबवा की राव...