पाहिले चालून त्याच्या सोबतीने

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2014 - 03:41

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

हे दोन सर्वात छान वाटले. त्यातही "काळही देशील ना तो फुरसतीने" हे खासच.

.

व्वा !
सर्वच शेर सुंदर आहेत...

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने << एकदम खास >>

छान गाणं होईल ह्या गझलेचं ..बघाच कुणी गायला-वाजवायला तयार झालं तर ....
बाकी , मला अख्खी गझल आवडली
धन्यवाद !

मतल्यावरून माझा एक शेर आठवला ...

ही शर्यत काळा'सोबत' चालायाची
पोचेल शेवटी त्याचा पहिला नंबर

धन्यवाद

बेफ़िकीर जी , तूम्ही अशक्य आहात ,काय काय येत राव तूम्हाला गज़ल ,कथा,कादम्बरी, मनापासून मनापर्यत पोहचता तूम्ही आणि इतकच नाही तर तलागालातल्या गरिब ,अनाथ आणि गरजुन्पर्यन्त आम्हाला घेवुन जाता, ग्रेट आहात तुम्ही,आणि असेच रहा नेहमी. ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' "कूठून कूठून वेचून आणले तुज़्यासाठी अक्शरलेणे, तुज़्याच सुखासाठी दिले थोडे नक्शत्रान्चे देणे'''''''

खूप छान!
<< भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने >> क्या बात है!

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

सुरेख…

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

क्या बात…

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

हा ही मस्तच

सुंदर गझल.
शुभेच्छा.

सुंदर गजल !!

काळही देशील ना तो फुरसतीने .... लाजवाब