पुणे ते व्हिलेज कुंभवली कसं जायचं

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 March, 2014 - 06:02

माझ्या मुलाच्या परीक्षेसाठी त्याला हे कॉलेज सेंटर म्हणून मिळालंय ज्याबद्दल मला काहीच माहिती नाही.

Mahindra United World College of India,
Village Khumbavali,
Taluka Mulshi
Pune - 412108

हे कॉलेज कुठे आहे ते कुणाला माहिती आहे का ?
परीक्षा सकाळी ७ वाजता आहे. आणि मी हडपसर ला राहणार आहे.
गुगल वर बघितलं. नकाशा दिसतो आहे. पण कोणाला जर ह्याबद्दल अधिक माहिती असेल तर बरं होईल.

१. पुण्यापासून किती वेळ लागेल ?
२. कुठली टॅक्सी सर्व्हिस आहे का ?
३. आदल्या दिवशी तिकडे जाऊन राहता येईल का ?
४. जवळपास कुठली हॉटेल्स आहेत का ?
५. साधारण जाण्यायेण्याचा खर्च किती येईल ?

कुणाला जर माहिती असेल तर प्लीज इथे सांगू शकाल का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयश्री,

हे कॉलेज पौड येथे आहे असे दिसत आहे (गूगलनुसार).

तेथे राहण्याचे ठेवूच नका. अर्थात हडपसरपासून फार लांब आहे म्हणा!

हडपसरहून निघून तेथे सकाळी सात वाजता पोचायचे असल्यास वाहन कोणते आहे? (म्हणजे स्वतःचे की रेंटेड) साधारण (इतक्या सकाळी) पस्तीस ते पन्नास मिनिटे लागावीत. सेफ साईड म्हणून पावणे सहा ते सहाच्या दरम्यान निघालेले बरे!

हेही वाचा

मी दोन दिवसांनी आठ दिवसांसाठी चक्क अंदमानला जाणार आहे. नाहीतर तुम्हाला दोघांना माझ्याकडे बोलावले असते. मी कोथरुडला राहतो आणि हडपसरे ते कोथरुड हे अठरा किलोमीटर अंतर वाचवायला तुम्हालाही आवडले असते. Happy

हडपसर फार लाम्ब पडेल जयावि ( तुमची पुण्यात सोय होऊ शकणार नाही का?) मुळशीकडे जाणारा रोड हा बावधन ( चान्दणी चौक, पिरन्गुट वरुन ) वरुन जातो. साधारण २ तास लागतात पुण्याबाहेर मुळशीकडे जायला. ( ट्रॅफिक धरुन)

तुम्हाला हडपसर पेक्षा कोथरुड जास्त जवळ पडेल किन्वा कात्रज बायपासने पुढे पिरन्गुटकडे.

http://www.uwcmahindracollege.org/where ही लिन्क बघा जरा.

हडपसर फार लांब होइल जयावी.
कोथरुड, चांदणी चौक जवळ राहशील तर थोडं जवळ होइल.
अर्थात तिथुनही ते दुर आहे आणि २०-२५ मिनिटे लागु शकतात.

बेफिकीर, रश्मी, झकास......धन्यु Happy

हो हडपसर दूर होणार ह्याची कल्पना आहे. कोथरुडला जमलं तर प्रयत्न करेनच.
शक्यतोवर टॅक्सीनेच जायचा विचार आहे म्हणजे शोधाशोध करायला सोपं जाईल. परीक्षेच्या आधी एक दिवस जाऊन बघून येईन म्हणतेय. म्हणजे अंदाज येईल.

पण कोणाला जर हे ठिकाण माहित असेल तर जास्त चांगली माहिती मिळेल.

पुण्यात अशा टॅक्सी सर्व्हिस असतील ना ज्या पुण्याबाहेर घेऊन जातील ? त्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का ?

पुण्याची मला अजिबातच माहिती नाहीये Sad

रश्मी, कविन......... लिंक बद्दल खूप खूप आभार Happy
मी विचारते त्यांना मेल पाठवून Happy

जयवी, (जर आधी विचारलं नसेल तर) तिथेच कॉलेजच्या गेस्ट हाऊस मधे सोय होतेय का ते विचारुन बघ. झाली सोय तर उत्तमच होईल सगळाच प्रवासाचा त्रास वाचेल.

हो हो....तोच विचार करतेय. तिथेच सोय झाली तर आदल्या दिवशीच पोचता येईल आणि सगळंच सोपं होईल Happy

१. पुण्यापासून किती वेळ लागेल ?>>> हडपसरहून टॅक्सी / कार काहिही केलत तरी परिक्षेच्या दिवशी कंटाळवाणा प्रवास असेल. दिड-दोन तास सहज लागतील.
२. कुठली टॅक्सी सर्व्हिस आहे का ?>>> http://www.wingsradiocabs.com/ ही चांगली टॅक्सी सर्विस आहे. मी हडपसरहून निगडीला (पिंपरी-चिंचवड मनपा) गेले होते. अर्ध्या तासांत अर्जंट टॅक्सी आली होती.
३. आदल्या दिवशी तिकडे जाऊन राहता येईल का ?
४. जवळपास कुठली हॉटेल्स आहेत का ?>>> >>> घोटावडे फाट्याजवळ एखादे चांगले हॉटेल आहे का ते बघा, स्थानिकांच्या अथवा ट्रीपअ‍ॅडव्हायसर रिव्हूज वाचून.
५. साधारण जाण्यायेण्याचा खर्च किती येईल ?>>> वरील टॅक्सी सर्विस मला बर्‍यापैकी महाग वाटली होती. पण रिलाएबल पण होती.

जयावि, महिन्द्रा कॉलेजच्या समोर (जवळ) गोल्डन बीवर्स नावाचे रिसॉर्ट आहे.. मस्त आहे नदिच्या काठी. तुम्ही तिथे काही वेळ घालवू शकता. रात्री सुरक्षित आहे की नाही माहित नाही.
कॉलेज पर्यन्त जायचा पौड नन्तरचा रस्ता खराब आहे. त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर कदाचित कटकट करेल. अर्थात मी गेल्या वर्षभरात तिथे गेलो नाहिये त्यामुळे रस्ता छान झाला असल्यास कल्पना नाही.

राजसी , अवनी, देवा....... धन्यवाद Happy

मी त्या कॉलेजच्याच गेस्ट हाऊस मधे राहण्याची सोय होते का बघते आधी.
राजसी.....टॅक्सीसाठी तुझी लिंक नक्की उपयोगी पडेल.
देवा......... तू त्या कॉलेजला जाऊन आला आहेस ना...... किती वेळ लागतो रे ? मी तर पहिल्यांदाच ऐकतेय नाव.

बाय द वे, पुण्यात कोठेही कॅब हवी असल्यासः

०२० - ६७२८ ६७२८ (पहिले किलोमीटर काहीतरी वीस रुपये व नंतर सतरा असे काहीतरी भाव आहेत)

०२० - ६४० १०० १०० (साधारण वरीलप्रमाणेच भाव आहेत)

२४ तास सेवा उपलब्ध आहे.

Happy

जयावी
बाकी काही नाही पण आत्ताच पुण्यात ३ महिने राहीले होते आणि आठवड्याला किमान २ वेळा अशी taxi service वापरली.
Radio wings, Travel time, Joyride cabs अगदी सगळ्या वापरल्या. कुठलीही सर्व्हिस अर्ध्याहून अधिक वेळा वेळेवर येत नाही. अर्थात याला पुण्याची रहदारी काही अंशी कारणीभूत आहे.
न सांगता वेळेवर बुकींग रद्द करणे, त्याबद्दल न कळवणे असेही होते. तेव्हा वेळेत जायचे असेल तर प्रायव्हेट गाडी करून जाणे उत्तम.

पुण्यात मागच्याच आठवड्यात सुरु झालेली GENIE Cab Service (Contact No. 33993399) वापरता येईल. मुंबई मधल्या 'मेरू कॅब' वाल्यांनि पुण्यामधे सुरु केलेलि कॅब सर्विस आहे...
Happy

अरे वा, मेरु पुण्यात यायची फार वाट पाहत होते. धन्यवाद विवेक देसाई Happy

विंग रेडियोचा मध्ये दोनदा वाईट अनुभव आला. एकदा शंभर रुपये जास्त लावले ( नंतर तक्रार केली, पाठपुरावा केला. त्यांचा ड्रायव्हर धुसफुसत घरी येऊन पैसे देऊन गेला ), एकदा आदल्या दिवशी व्यवस्थित टॅक्सी बुक केलेली असूनही आयत्यावेळी त्यांनीच कॅन्सल केली.

श्री कॅब चा अनुभव चांगला आहे. गाडीही आरामशीर इटिऑस लिवा होती. ०२०६७९९९९९९

रुनी, मुंबईच्या तुलनेत पुण्यातला ट्रॅफिक खूप सुसह्य आहे !
मला वाटते कॅब्जचे अपुरे नेटवर्क ह्याला कारणीभूत आहे.
विषयांतराबद्दल क्षमस्व Happy

जयावि, मी त्या कॉलेजला नाही पण गोल्डन बीवर्सला जाऊन आलोय. पौडच्या पुढे साधारण अर्धा पाऊण तास लागेल ते ही रस्ता खराब असल्याने. ७-८ किलो मीटर पौडपासून. पौड चौकात उजव्या हाताला वळलं की डाव्या हाताला बघत रहायचं तिथे गिरीवन, महिंद्रा कॉलेजच्या मार्ग दाखवणार्‍या पाट्या दिसतील. खरंतर लगेच डावीकडे रस्ता जातो कॉलेजला. तो घ्यायचा. त्या रस्त्याने पुढे जात राहिलं की उजव्या हाताला कॉलेजचं गेट दिसेल. तिथून आत.
पौड नंतर मॅप्स चालू ठेवल्यास उत्तम. Wink

GENIE Cab Service (Contact No. 33993399) हा उत्तम ऑप्शन दिसतो आहे.

धन्यवाद दोस्तांनो Happy

काल मी त्या कॉलेजला फोन करुन बोलले. आदल्या दिवशी गेस्ट हाऊस बुक करता येईल असं कळलं. पण सध्या त्यांच्या सुट्ट्या सुरु आहेत म्हणून पुढल्या आठवड्यात फोन करायला सांगितलाय. जर गेस्ट हाऊस बुक करता आलं तर उत्तम.

गाडी स्वतःचीच किंवा प्रायव्हेट गाडी करुनच जावं असं ठरतंय तुमच्या सगळ्यांच्या अनुभवावरुन Happy

गाडी स्वतःचीच किंवा प्रायव्हेट गाडी करुनच जावं असं ठरतंय तुमच्या सगळ्यांच्या अनुभवावरुन >>>>> हे केंव्हाही सोईस्कर ठरेल. फक्त हडपसर ऐवजी कोथरुड किंवा atleast डेक्कन ला राहण्याचा विचार करा. कोथरुड मध्ये हॉटेल्स चे ऑप्शन्स कमी आहेत डेक्कन पेक्षा.

अगो...... अगं हो आम्हाला चेंबूरहून एअरपोर्ट वर जायचं होतं. सकाळी ४ वाजता. पण तो मेरुवाला नाही पोचू शकला. त्याने १५ मिनिटं आधी फोन करुन पोचू शकत नाही हा फोन केला. इतक्या भल्या पहाटे आम्हाला टॅक्सी शोधून एअरपोर्ट गाठावं लागलं Sad

अरुण अरे हडपसर मधे माझा भाऊ राहतो >>>> ओह. ठीक आहे मग. सकाळची वेळ असल्याने २५-३० मिनिटं थोडं आधी निघावं लागेल हडपसरहून.

तसंच, आजकाल, बर्‍याच वेळा सकाळी लवकर टॅक्सी बोलावली असल्यास, ते ड्रायव्हर्स, आदल्या दिवशी रात्रीच आपल्याकडे येऊन गाडी पार्क करून गाडीतच झोपतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला त्यांची वाट बघावी लागत नाही. गाडी बूक करताना त्यांना आधीच हे सांगून ठेवा.

मी नेहमी Easy Ride Cab Service ला बोलावतो. ८६०००२४५४५ हा नंबर आहे त्यांचा.

Pages