सुरु होतील आता वादळे माझ्या विचारांची (तरही)

Submitted by इस्रो on 11 March, 2014 - 10:12

उसळली केवढी ही लाट कोणाच्या विचारांची
सुरु होतील आता वादळे माझ्या विचारांची

कुणालाही जमत नाही लिहायाला गझल गाणी
असावी लागते ह्दयी ह्वा ताज्या विचारांची

तुझे माझे दिवस गेले जमाना हा नवा आला
गरज नाही अता येथे तुझ्या माझ्या विचारांची

जगा ही अन जगू द्या ही, कुठेही अन कुणालाही
निकड आहे इथे ऐशा सरळ साध्या विचारांची

शहाणा एक 'नाहिद' एकटा बाजूस पडतो अन
इथे होते पहा गर्दी कशी काळ्या विचारांची

- नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छानच नाहीदभाई पण पहिली आणि शेवटची ओळ ..जास्त आवडल्या असे म्हणीन ..कारण ह्या तरहीतले वेगळे आणि नवे काफिये म्हणून !

तरहीतील सहभागासाठी धन्यवाद