आई म्हणोनी..
पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ?
किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले . पाहिलं म्हणजे सहनशक्ती … हो खूप सहनशक्ती पाहिजे पालक व्हायला . त्यांना जन्म दिल्यापासून आपलाच आई म्हणू जन्म झालेला असतो ,आणि आई म्हणून आपणही त्यांच्या सोबत वाढत असतो . आपणही आई म्हणून सुरवातीला चुकतो , नवीन नवीन गोष्टी शिकत ,शिकवत राहतो . हा सर्वच काळ कसोटीचा असलातरी निखळ आनंदाचा पण असतो . बाळांनी मारलेली पहिली हाक , त्यांचे पहिले पाऊल , त्यांचा तो आपल्याच कडे येण्याचा हट्ट खूप सुखाऊन जातो. त्यांचा शाळेचा पहिला दिवस आपल्यासाठीही खूप तणावाचा आसतो. नंतर त्यांच्या शाळेतल्या achievements आपल्याच achievements असतात . त्यांची ती शाळेतून आल्यानंतरची बडबड , शाळेतली भांडण, त्यांचे रुसवे फुगवे खूप हवे हवे से असतात . त्यांनी शिकलेली शाळेतली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असते . त्यांची घट्ट मारलेली मिठी , आणि दिलेला गोड पापा म्हणजे जगातली सगळ्यात सुखकारक गोष्ट आहे .
पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा .
अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या लेकीनी शिकवली ती म्हणजे कृतज्ञता (gratefulness )
कुठलीही छोटी गोष्ट जरी केली तरी ती म्हणायची thank so much mamma . ड्रेस घालून दिला कि thank you . जेवण दिलं कि thank you . आणि ते हि खूप मनापासून . काही बनवलेलं आवडलं कि खूप कौतुक करायची . खूप टेस्टी आहे , yummy आहे . एव्हडीशी पिल्लू माझी , माझे प्रयत्न खूप appreciate करते कि माझा ऊर भरून येतो.
छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले. त्यांच्याबरोबर मीही पोहायला शिकले . त्यांचे क्लासेस , त्यांच्या आत्मसात केलेल्या नवीन गोष्टी मलाही खूप आनंद देऊ लागल्या . मोठीचे violin ऐकून मीही सप्त सुरात न्हाहू लागले , त्यांचासोबत त्यांची गोष्टीची पुस्तकं वाचताना मलाही खूप आनंद मिळू लागला . पहिल्यांदा जेंव्हा त्यांनी त्यांची पुस्तकं स्वतंत्रपणे वाचली ,काय आनंद झाला तेंव्हा म्हणून सांगू ? मग त्यांच्या सोबत वाचनालयात जाऊन पुस्तकं आणणे आणि वाचणे एक आनंदाची पर्वणीच झाली .
अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
मनापासून लिहिले आहेस. आईची
मनापासून लिहिले आहेस. आईची भावना एक आईच समजू शकते
मुलांसाठी काहीही छोटमोठं करायला जी मजा येते जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणं कठीण!
अगदी....मी ही अनुभवतेय
अगदी....मी ही अनुभवतेय हे...
पाहिलं म्हणजे सहनशक्ती>> मी खुप इम्पेशंट आहे पण लेकीसाठी बद्लतेय, ...खरच मुलांसाठी काहीपण करायची तयारी असते पालकांची...
पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा >>> +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० नजरच बदलते पाल़कांकडे बघायची..:)
धन्यवाद अभिश्रुती आणि शोनु
धन्यवाद अभिश्रुती आणि शोनु कुकु
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
धन्यवाद mansmi१८..
धन्यवाद mansmi१८..