लेख पाचवा - निगेटीव पेंटींग , ग्लेझींग, स्प्लॅटर , स्क्रेपींग इ. तंत्र

Submitted by पाटील on 8 March, 2014 - 09:22

या लेखात आपण अजुन काही तंत्र थोडक्यात पाहु आणि त्यांचा वापर करुन काही सोप्पई चित्र करुया.

पहीले तंत्र - निगेटीव्ह पेंटीग - यात आधि येक रंग मारुन तो सुकू द्यावा ,नंतर त्या भोवती दुसरा किंवा पहिल्या रंगा पेक्षा डार्क शेड वापरुन आपण आपल्याला हव तो आकार मिळवायचा. आपल्याला ह्वा तो आकार न रंगवता त्या भोवती रंगवाचे म्हणजे आकारा बाहेरचा निगेटिव्ह शेप रंगवायच्जा म्ह॑णुन निगेटिव्ह पेंटींग.
इथे मी येक झाडाच्या आकार मिलवायचा प्रयत्न केला आहे
negative.jpg

दुसरे तंत्र - ग्लेझिंग - आधि येक रंग मारुन तो सुकु द्यायचा , त्यावर खालचा रंग दिसेल असा दुसर्‍या रंगाचा पातळ थर द्यायचा , यामुळे आपल्याला व दोन्ही रंगाच्या मिश्रणाने मिळते त्या तिसर्‍या शेडचा इफेक्ट मिळेल.
इथे मीऑ पहिल्यांदा पिवळ्या रंगाचा वॉश दिला . तो सुकल्यावर लाल रंगाचा पातळ हात दिला . त्यातुन थोडा ऑरेंज शेडचा इफेक्ट मिळाला.
galzing.jpg

स्प्लॅटर - टुथ ब्रश किंवा पेंट ब्रश रंगात बूडउन ब्रिसल्स मधुन बोट फिरुऊन किंवा ब्रश बोटावर आपटुन रंगाचे शिंतोडे पेपरवर उडवायचे. काही टेक्स्चर मिळवायला , किंवा चित्र थोडे स्टायलाईज करायला हे तंत्र वापरता येते.
splatter.jpg
स्क्रेपींग - रेंग ओला असतानाच ब्रशचे मागचे टोक किंवा येखादा कडक प्लस्टिक चा तुअकडा इत्यादिने त्यावर रेषा ओढायच्या , झाडाच्या फांद्या ईं दाखवायला हे तंत्र वापरता येते मात्र यात पेपर फाटणार
नाही याची काळजी घ्या.

scrpng.jpg

आता या तंत्रांचा वापर करुन दोन चित्र करुया.
पहिल्यांदा कागदावर चित्र रेखाटुन घेतले
L1.jpg
त्यानंतर वॉटर लिलिज रंगवुन सुकु दिल्या.
त्यानंतर पिवळ्या+ निळ्या रंगाचा वॉश वॉटर लिलीज सोडुन पुर्ण कागदभर लावला. यात मधे मधे नीळा, पिवळा रंग कमी जास्त करीत थोडे वेऋएसहन /पाण्याचा इफेक्ट आणला.
l2.jpgl3.jpg
आता चित्र पुर्ण सुकु दिले.
त्यानंतर या हिरव्या रंगात बर्न्ट सिएना+ कोवाल्ट ब्लू अ‍ॅड करुन डार्क हिरवा रंग तयार केला आणि तो लिलीज ची पाने सोडुन त्याभोवती नीगेटीव्ह तंत्राने रंगवला. हे चित्र सुकताना लिली मधे अजुन कही डीटेल्स टाकुन चित्र संपवले.
l4.jpgl5.jpg

आता दुसरे चित्र
चित्र रेखाटुन , काही बॅगराऊंड वेट इन वेट पद्धतीने ब्लॉक करुन घेतले
fh1.jpg
ते सुकल्यावर घराचा भाग ब्लॉक करुन घेतला.
fh2.jpg
हे स्रव करताना रेलिंगचा भाग /पुढिल तुळ्शी वृंदावनाचा भाग पांढराच राहिल याची काळजी घेतली.
त्या नंतर चित्र सुकल्यावर थोडया दार्क किरब्या शेडने झाडांचा आकार लुल्जली /बोल्ड ब्रश स्त्रोक्स्ने केला तर माग्ची काही झाडे /पालवी निळसर हिरव्या रंगात केली. हे सर्व सुकु देउन पिवळ्या भिंतीवर निळ्या+ लाल अशा जांभुळक्या रंगाच्या पातळ थराने ग्लेझिंग तंत्राने घरावर पडलेली सावली बोल्ड ब्रशस्ट्रोकस्नी रंगवली. पिवळा व जांभळा हे विरुद्ध रंग (हे आपण कलर्व थिअरिच्या वेळेला डिस्कस करु) अस्ल्याने सावलीचा रंग छान ग्लेझींग ने हा इफेक्ट छान आला.
FH3.jpg

त्यानंतर निळा+लाल+ बर्न्ट सियेना असा डार्क रंग घेउन निगेटिव्ह पेंटिंग तंत्राने रेलींग आणि खांब यांचे आकार मिळवले , फोरग्राऊंड्च्।ई हीरवी झूडपे ही सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने उटुन दिअसतील हे बघीतले.
fh4.jpg
त्यानंतर थोडा हिरवा रंग स्प्लॅटर केला आणि चित्र संपवले
fh5.jpg
PS: माझा पीसी खराब झाल्याने OS रीईन्स्टॉल करावी लागली आणि फोटो एडीटर चालत नाहीये, त्यामुळे काही ठीकाणी रंग मुळ चित्राबरोबर मॅछ होत नसतील तसेच दोन स्टेप्स मधे सुद्धा रंगात फरक दिसत असेल त्याबदाल क्षमस्व.
या लेखा बरोबर आपण आवश्यक त्या सर्व तंत्रांवर बोललो आहोत. अजुन बरीच छोटो मोठी तंत्र असली तरी त्यावाचुन सध्या आपले काही अडणार नाही Happy यापुढील लेखात आपण बेसिक कलर थिअरी आणि चित्र चांगले होण्यासाठी कसा वापर करायचा हे पाहु.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहभागी सभासद जो पर्यंत स्वतः काम करुन इथे पोस्ट करीत नाहीत तो पर्यंत त्यावर प्रतिक्रीया देणे, काही सुधारणा सुचवणे होणार नाही आणि या उपक्रमाचा हेतु साध्य होणार नाही . त्यामुळे चित्र येउद्या.
तसेच प्रसिध्ह चित्रकारांची जलरंगातली कामं अभ्यासायची सवय ठेवा, त्यानी वॉशेस कसे प्लॅन केलेत, कोणते रंग , कोणते तंत्र वापरलेत याचा अंदाज घ्या. त्यातुन खुप शिकायला मिळते.

मी करतेय प्रयत्न,पण कितपत जमतंय शंका वाटतेय ,म्हणुन खरंतर पोस्ट करत नव्हते,पण आता धाडस करते.कृपया सुधारणा सांगा.IMG_0646.JPG

आता एक पूर्ण फसलेला प्रयत्न..IMG_0648.JPG
अजय्,ह्या मधे मला मागची निळ्या रंगातली झाडं नेमकी कधी रंगवायची ते कळलं नाही ,घाई झाली,आणि आधिच रंगवली गेली जरा बहुतेक.जरा सांगू शकाल का प्लीज्?म्हणजे मग मी परत प्रयत्न करते.

अंतरा छान!

वृषाली, किती सुंदर आहेत चित्रं! फसलेला बघायचा असेल तर मी चंद्रकोरीचे चित्र टाकते. घ्या हसून.. तुमचे चित्र फसलेले नाही. Happy

धन्यवाद सगळ्यांना.........
वृषाली खूपच सुंदर... मला माझे चित्र बाळ्बोध वाटते आहे. अजून सराव लागेल.

गजानन - take care
अंतरा - प्रयत्न चांगला आहे , काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर अजुन चांगले होइल उदा. झाडाच्या फांद्या त्या हिरव्या पानात खरं तर अजुन डार्क हव्यात त्या पांढुरक्या दिसताहेत. तसेच पायर्‍या आणी छप्पर याच्याबाजुला/वर फॉलिएज करताना तुम्ही थोडा गॅप सोडलाय तो टाळता येईल
वृषाली - रंग छान तजेलदार दिसत आहेत
दोन्ही चित्रात छपराना काही ठीकाणी आउट्लाईन केलीय ती न करता चित्र पुरे करायचा प्रयत्न करा. काही ठिकाणी edge darkening झाले आहे ( आपण जो ड्राय वॉश वर /पेपर वर नंतर ओला वॉश देतो तो पेपर ज्या दिशेने तिरका असतो त्या दिशेने जमा होतो आणी तेव्हढी कडा पिगमेंट्स जमा झाल्याने थोड्या डार्क होतात) , मुद्दाम हा इफेक्ट मिळवला असेल तर ठिक नाहीतर अशा कडा ब्रश ने टीपुन घ्यायची सवर ठेवावी. नीळ्या रंगाची मागची झाड पेपर सुकत आल्यावर पण अगदी पुर्ण सुकायच्या आत रंगवा. म्हणजे खुप शार्प होणार नाहीत तसेच रंग खुप पसरणार्ही नाही. पेपर सुकला असेल तर ब्रशने पानांचा भाग थोडा ओला करुन नंतर रंग मारा.

अंतरा, छान चाललाय सराव.

वॉव वॄषाली, मस्त. मला खूप आवडली तुमची चित्रं.

माझे रंग नव्या घरात, लॅपटॉप -नेट जुन्या घरात. रोज जुन्या घरातून सामान नविन घरी लावणं यात बिझी आहे. अजून ४-५ दिवसांची सुट द्या मला. नंतर मात्र परत सुरु करेन रंगवायला.

नमस्कार अजय. कमळाचे चित्र कढले. करताना खुप मजा आली. अजुन एकदा करायची इच्छा आहे. बघु जमतेय का. खुप चुका आहेत. तुम्ही सांगा.
VKG-Painting9.JPG

फोटोमधे गड्बड आहे. खुप पिवळे दिसतेय चित्र. उद्या दिवसा फोटो काढून पहावे लागेल.

उद्या ते घराचे चित्र करेन.

हा माझा प्रयत्न -

फुले आणि पाने कोरी सोडण्याच्या नादात अनेकदा त्या वॉशच्या आजूबाजूच्या ओल्या बाऊंडरीज सुकू न देताना भंबेरी उडते.

गजा, सुंदर. पण तुझ्या पानांच्या, पाकळ्यांच्या आणि देठांच्या कडा एवढ्या कोरीव कश्या आल्या?

अंतरा- रंग निट आलेल नाहित , पानांचा भाग पांढरा दिसतोय तसेच लिली च्या भोवताली ही पांढरा रंग दिसतोय. अगदी घाबरत थोडा थोडा रंग मारण्या पेक्षा बिन्धास्त मॉथाले भाग कव्हर करायचे त्याने पॅचेस आलयासारखे दिसतात ते टाळता येतील.
गजानन पाण्याचा इफेक्ट चांगला जमलाय. पान सगळी सुटी दिसताहेत ती काही ठिकाणी ओव्हरलॅप व्हायला हवी होती तसेच सग्ळ्या कडा कचकचीत (हार्ड) आल्यात, रंग ओला असताना सुक्या ब्रशने काही ठीकाणी कडा टीपुन घ्या. बाकी छान.
आज जम्लयास आणी येखादे चित्र टाकतो

धन्यवाद सर.
मी हेच चित्र पुन्हा रंगवण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी चुकते आहे. कळत नाही ......:अओ:

अजय, धन्यवाद.

शैलजा, अश्विनी, धन्यवाद. पाने, फुले यांच्या कडा ४ नंबरच्या ब्रशने थोड्या काळजीपूर्वक रंगवल्या. चित्र सुकल्यावर तोच ब्रश फक्त पाण्यात बुडवून देठांच्या जागचा रंग लिफ्ट केला.

हा दुसर्‍या चित्राचा प्रयत्न -

Gajanan- sundar , railing chhan sodaley . Glazing karatana khaalchaa rang disel itpat transperancy raakhaayalaa havi. Tyaamaanane jaambhaLaa rang thodaa dark jhaalaay , baaki chhaan

टूथब्रश वापरुन स्प्लॅटरिंग करायचे राहिले. पण बकिचे करयचा प्रयत्न केला. ग्लेझिंग करताना मस्त वाटले.
VKG-Painting10.jpg

अजय, चुका सांगा.

वृषाली, गजानन, अश्विनी के, तुमची चित्रे खुपच सुरेख आली आहेत.

Pages