मी एक जीवन प्रवासी, मला सुख दुःखाचा पहारा
माझ्या मूक वाचानेला फुटे आवाज , जेव्हा देईल मला कोणी मदिरा
मनात माझ्या प्रश्नांचा कलह
आप्त माझ्याशीच करती काटशह
प्रश्नांची सार्या मिळती उत्तरे, जेव्हा देईल किणी मला मदिरा
दुःखात मला कसे फुटे हसू
सुखात हि नयन का ढळती अश्रू
सुख दुःखाचे कोडे सुटेल मला, जेव्हा देईल मला कोणी मदिरा
अन्याय मी माझ्या मनातच दाबला
मनात आग माझ्या पेटवू लागला
या अन्यायाला फुटेल वाचा, जेव्हा देईल मला कोणी मदिरा
तहानलेल्या डोळ्यातले अश्रू सुकले
भरलेल्या घरात पाण्याचे पाट वाहले
समाजातील हि दरी हि बुजेल जेव्हा देईल मला कोणी मदिरा
ज्याने प्रेम दिल त्यानेच मनं दुखावली
आयुष्याच्या बाजारात सुखाची झोळी जेमतेम भरलेली
या बाजारच कल कळेल मला,जेव्हा देईल मला कोणी मदिरा
भरलं पोट रिकाम्या पोटाला हिणावत
बेकार मनाला गुन्हेगारी विश्व खुणावत
या समाजात हि बदल घडेल,जेव्हा देईल मला कोणी मदिरा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/27498