भुगर्भातले रहस्य. भाग- ३

Submitted by केशव तुलसी on 7 March, 2014 - 00:59

दुसर्या दिवशी सकाळी प्रा राजेश लवकर उठले, फ्रेश होऊन त्यांनी आजच्या दिवसाची आखणी मनामध्ये करायला सुरवात केली..
"काल ठरल्याप्रमाणे आधी खेरवाडीत जाऊ व एखादा वाटाड्या घेऊ ,आपल्याला या भागाची अजिबात माहीती नाही ,असा विचार ते करत होते. त्यांनी या भागाचा चुंबकीय नकाशा मिळवला होता. लॅपटॉपवर त्यांनी तो नकाशा ओपन केला. त्यानकाशात ते मागच्या वर्षी इथे आलेल्या आंतरराष्ट्रीय टीमला सापडलेला भुभाग, त्याचे अक्षांश रेखांश चेक करत होते. मॅपमध्ये त्यांना तीस मैल नॉर्थला एक असा स्पॉट सापडला कि जिथे गुरुत्व बल आणि चुंबकीय बलाचे अजब व्यवहार दिसत होते.. तिथे गुरुत्व बलाचे डीप्रेशन दिसत होते, एखाद्या नदीमध्ये जसा खोल डोह असतो तसा हा गुरुत्व बलाचा डोह दिसत होता..
" समथिंग इज देअर,येस आय गॉट इट" हाच तो साधारणतः तीस चौरस मैलांचा भुभाग साधारणतः गोलाकार कि जिथे आपल्याला जायचे आहे..आता आपल्याला अनेक ठीकाणचे रीडींग घेण्यापेक्षा इथेच रिडींग्ज घ्यावी लागतील हे चाणाक्ष राजेश यांच्या लक्षात आले.
थोड्या वेळाने त्यांना बाहेरच्या खोल्यांमध्ये लगबग जाणवली, चेतन अन्जु व अमित उठले आहेत, या विचारांनी ते भानावर आले. त्यांनी आधी गेजेस गाडीत नेऊन ठेवली..

किचनमध्ये बसून सर्वजण चहाचा आस्वाद घेत होते..
" चेतन माझा असा विचार आहे की आपण खेरवाडीतून एक वाटाड्या घेऊ"

ठिक आहे पपा

"पण असा वाटाड्या मिळणार काय "अमित

मिळेल!, मी शर्माला काल फोन लावला होता"....
खेरवाडीत पोचल्यानंतर एका टपरीवजा हॉटेलात सर्वांनी अल्पोहार केला .प्रा.राजेश तिथे रावी मोहिते या तरुणीचा पत्ता विचारत होते.. रावी ही तीच तरुणी होती जिने मागच्याच वर्षी एका अभ्याषगटाला व्हॉलेंटीअर म्हणुन मदत केली होती. ती सायन्सची पदवीधर होती.. स्थानिक असल्याने अशा प्रोजेक्टमध्ये ती व्हॉलेंटीअर म्हणून मदत करायची ,कधी प्राण्यांच्या मोजणीत, तर कधी दुर्मिळ झाडांच्या गणनेत, तर कधी जिओलॉजिकल सर्व्हेत..
थोड्याच वेळात गाडी मोहीतेंच्या घराबाहेर होती, रावीनेच दार उघडले, रावी एक उमद्या व्यक्तीमत्वाची तरुणी होती. उंच, सावळी तरीही लाघवी वाटणारी.
'प्रा शर्मांनी मला तुमच्या येण्याची कल्पना आधीच देऊन ठेवली होती'रावी.

मग कधी निघायचं यंग लेडी?

"आय एम ऑलवेज रेडी फॉर सच ए बिग डील"रावी उत्तरली.

सर्वजण हास्यात बुडाले..

खेरवाडीच्या उत्तरेकडे गाडी अंतर कापत होती .दुपारचे बारा वाजत आले होते .उंचचउंच डोंगर, अजस्त्र दर्या ,दाट झाडी ,कधी रुक्ष पठारं असा त्या भागाचा तोंडवळा होता.रावी अमितला गाईड करत होती,तो आता यात इन्व्हॉल्व झाला होता .प्रा.राजेश गाडीत ग्रॅव्हीबीट्स नावाचे गेज चेक करत होते. गुरुत्व बलाचे रिडींग नॉर्मलपेक्षा थोडे कमी होत होते ...इतरही गेजेस चेक करुन प्रत्येक रीडींग राजेश आपल्या लॅपटॉपवर नोंदवत होते. अशी अब्नॉर्मल रिडींग्ज ते पहिल्यांदाच बघत होते.. ते थोडे गंभिर झाले ..
पपा तुमी इतके कॉन्शस का झालात?

आय एम सर्प्राईज्ड चेतन!
पण का?
कळेलच...
चेतन प्रवासात रावीशी गप्पा मारण्यात मग्न होता ,त्याला रावीचे व्यक्तीमत्व आवडले होते.. एक उमदा तरुण व तशीच एक डॅशिंग तरुणी गप्पांत व्यग्र होते. राजेश यांच्या तीक्ष्ण नजरेतुन ही गोष्ट सुटलेली नव्हती. त्यांनी एकवार पाठीमागे बसलेल्या चेतन रावीकडे पाहीले, अन्जु व अमित पपांकडे बघुन मिश्कील हसत होते...

आधीच प्रीसेट केलेला जीपीस डीवाईसचा बीप चालू झाला....,
"अमितब, गाडी थांबव."राजेश.
ते आता सुंदरगिरि पर्वतरांगाच्या मधोमध उभे होते. कलिंगा पाँईट..

"गाईज, आपल्याला थोडे चालावे लागणार आहे, प्रत्येकाने आपले सामान सॅकमध्ये घ्या व गेजेस कॅरी करा, इथुन पाच मैल खाली उतरत जायचे आहे .तिथे एक मोठे विवर असल्याचा माझा अंदाज आहे. तिथेच आपले गेजेस चेक करायचे आहेत व रीडींग्जहि घ्यायची आहेत"राजेश
" सर, आपण दोन टीम केल्या तर, खाली उतरत असताना वेगवेगळ्या ठीकाणची रीडींग्जे घेतली जातील, त्यातुन आपल्याला या भागाची संपुर्ण इंप्रेशन मिळेल"
गुड सजेशन रावी!
चेतन रावी तुम्ही घळीच्या मार्गाने विवराकडे उतरा मी अमित व अन्जु दुसर्यामार्गाने खाली उतरतो, रावी घळीचा मार्ग योग्य आहे ना? येस सर!
दोन्ही टीमने आपल्या मार्गाने उतरायला सुरवात केली.चेतन व रावी रीडींग्ज घेत खाली उतरत होते,अनेकदा तिथे घसरायला होत होते रावी मात्र सराईतपणे उतरत होती सवय नसल्याने अनेकदा चेतनला तिचा हात धरावा लागत होता, एके ठीकाणी ते पाणी पिण्यासाठी थांबले..
रावी, तुझा पुढे काय विचार आहे? चेतनने विचारले.
मला फिजिक्समध्ये मास्टर्स करायचे आहे.

ग्रेट, पण कुठुन?

ते अजुन फायनल व्हायचे आहे.
तु एखादा चांगल्या अमेरीकन विद्यापीठाचा विचार करु शकतेस!

चेष्टा करतोस चेतन तु माझी..

कमॉन रावी, मी चेष्टा करत नाहीए तु बघतेस ना माझ्या पपांकडे.. त्यांनी युएसमध्ये शिक्षण घेऊन आपल्या देशाच्या ज्ञानात भरच घातली आहे .तुला हवे तर मी आणी पपा तुला मदत करु शकतो .
अरे पण आपली ओळख इतक्यातच झालीए..
आपल्या सरकारच्या गुप्त पोजेक्टवर काम करणारे आपण दोघे मित्र आहोत ,देशमित्र". चेतन रावीशी नजर भीडवत म्हणाला .
..रावीचे गहिरे डोळे चेतनच्या व्यक्तीमत्वाला स्कॅन करत होते.. रावीची धीट नजर आपल्याला आरपार पहात असल्याची जाणीव चेतनला झाली,क्षणार्धात त्याजाणिवेने तो शहारला .निसर्ग त्याचे काम करत होता...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसाला एक भाग , आम्ही यातच भरून पावलो .
वेग असाच ठेवावा हीच प्रभु चरणी प्रार्थना Happy

'सीते'सारख भू गर्भात गायब होउ नये , हीच अपेक्शा Happy

दिवसाला एक भाग , आम्ही यातच भरून पावलो .
वेग असाच ठेवावा हीच प्रभु चरणी प्रार्थना स्मित

'सीते'सारख भू गर्भात गायब होउ नये , हीच अपेक्शा स्मित >>>> +१
छान झाला भाग......उत्कन्टा वाढत आहे..

दिवसाला एक भाग , आम्ही यातच भरून पावलो .
वेग असाच ठेवावा हीच प्रभु चरणी प्रार्थना स्मित

'सीते'सारख भू गर्भात गायब होउ नये , हीच अपेक्शा स्मित>>>>

फार लवकर बोलले ना मी Sad

या सिरीज चे पुढचे भाग भूगर्भात गडप झाले कि बाहेर आलेच नाही.
पुढे कुठे वाचायला मिळतील.