भुगर्भातले रहस्य. भाग -२

Submitted by केशव तुलसी on 5 March, 2014 - 12:24

चालेल ,तुमी आलात तर आपल्या सगळ्यांचा एक मस्त ट्रेकही होईल आणि माझे
कामही होइल ,गुड सजेशन.
पपा, पण ही नवीन गेजेस नक्की कशासाठी आली आहेत ?
चेतन, नजीकच्या सुंदरनगर पर्वतरांगामध्ये
बरेचदा गूढ भूगर्भीय घटना घडत असतात. मागच्याच वर्षी एका आंतरराष्ट्रीय
चमूला तिथे गुरुत्व बलाचे प्राबल्य कमी होत असल्याचे आढळले होते, आपल्या
सरकारने याचे गूढ उकलण्यासाठी एक कमिटी नेमली आहे, त्याचा मी हेड आहे. हे
सगळे कॉन्फीडेन्शियल आहे. गुरुत्वबलाच्या या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठीच
ही उपकरणे आहेत, एकदा ही गेजेस चेक करुन झाली कि मग तिथे मोस्ट सस्पेक्टेड साईट
शोधली जाईल ,तिथे नंतर डीप ड्रीलिंगकरुन हे पझल क्रॅक करण्याचा आमचा
प्रयत्न राहील..
दॅट्स व्हेरी एक्सायटींग ,अमितची उत्सुकता ताणली गेली.
पपा
हे सगळं एखाद्या हॉलीवूड सायन्स फिक्शन सारखं वाटतेय ,पपा आयेम व्हेरी एक्सायटेड..
अरे चेतन
यासाठीच तर मी हे क्षेत्र निवडले ,अगदी स्वप्नवत
ठरलं तर मग, राणीला रजा
मिळणे अवघड आहे. तू मी अमित आणि अंजू आपण मंडेला निघतोय..
डन पापा" अमित चेतन
दोघांनी पुस्ती जोडली.

.. अमितऽऽ तू ड्राईव्ह करणार का?" राजेशने विचारले.
आज
सोमवार होता, ऐसयुव्हीमध्ये गेजेस व इतर सामान भरताना
राजेश यांच्या मनामध्ये अनेक विचारतरंग उमटत होते. अशा गुप्त प्रक्ल्पावर
कुटुंब घेऊन जाणे कितीपत योग्य आहे? नाही म्हण्टलेतरी यात थोडी रिस्क आहेच..
चेतनने गाडीची टेस्ट घेण्यासाठी गाडी चालू केली तसे राजेश भानावर आले.
पपा, मी गाडीची टेस्ट घेऊन
येतो व फ्युअल भरुन यतो..
ओके बट कम बॅक क्वीकली, ऑलरेडी इथेच एक वाजला आहे व
रस्ता बराच खराब आहे
येस पापा
सायंकाळ होत होती.. हमरस्तासोडून गाडी
आता कच्च्या रस्त्यावर धावत होती.. ते आता घाटरस्त्यावरुन अधिक उंचीवर जात
होते .थंड हवेचे प्राबल्य उंचीबरोबर वाढत होते. अंधार पडत चालला होता ..बराच
वेळ गाडीत प्रवास केल्याने आता थकवा सर्वांना जाणवत होता. चेतनने हेड लाईट
सुरु केले, दिवस मावळण्यामुळे गाडीचा वेग जरा मंदावला होता .
चेतन, बी
केअरफुल.. तू दमला असशील तर मी चालवतो..
त्याची गरज नाही पपा आय एम ऑलराईट आणि तसेही थोडेच अंतर राहीले आहे
बंगल्यावर पोचायला. राईट ना?
राइट चेतन
अन्जू ,बेटा थकलीस काय ?"राजेशने विचारले.
"हम्म.. रस्ता फारच खराब आहे पपा, कंटाळा येतोय खूप".
"खेरवाडी येईलच इतक्यात बेटा,त्यापूढे पाच मैलांवर अशोकचा बंगला आहे"
अन्जुचा या सर्व प्रकाराला विरोध होता .पण अमितचे मन राखण्यासाठी तीने होकार दिला होता.ती राणीसारखी मितभाषी, हळवी होती तर चेतन प्रा.राजेश यांच्यासारखा करारी हुशार आणि भावनेच्या आहारी न जाणारा..
रस्ता आता फारच खराब होत चालला होता,संपुर्ण अंधार दाटून आला होता.. कधी एकदा खेरवाडी येतेय असे सर्वांना झाले होते.. राजेश सोडून..ते सकाळी होते तसेच ताजेतवाने होते
प्रा.राजेश लॅपटॉपवर त्याभागाचा भौगौलिक नकाशा पहात होते. त्या भागात बरीच उंच सखलता होती.एकंदर खेरवाडी फार दुर्गम भागात वसले होते.
"पपा, ते बघा खेरवाडी"
चेतनच्या बोलण्याने राजेश यांची तंद्री भंगली. दूर क्षितीजावर खेरवाडीतले दिवे दिसत होते. दरमजल करत गाडी एकदाची खेरवाडीत पोचली. तिथुन पुढे पाच मैलांवर अशोक यांचा बंगला होता.
वॉव, पपा अशोककाकाचा बंगला म्हंजे एकदम क्लासिकच आहे..
हम्म.. अन्जू त्याला मनशांतीसाठी अशीच दुर्गम जागा हवी होती. हे पुर्वीचे डाकघर होते ,तिथे अशोकने थोडे बदल करुन हा बंगला बांधलाय.

बंगल्यात आल्यानंतर चेतन व अमित अन्जुने किचन बेडरुम वगैरेची साफसफाई करायचे काम हाती घेतले, बर्याच दिवसांमुळे तिथे धुळ साठली होती.प्रा. राजेश गाडीतून त्यांची गेजेस,उपकरणे काळजीपुर्वक बाहेर काढून बंगल्यात ठेवत होते,गेजेस हलकी होती, अतिशय हॅन्डी आणि वापरायला सोपी अशी गेजेस राजेश पहील्यांदाच वापरत होते.
थोडावेळ आराम केल्यानंतर राजेश यांना आता भूक लागली होती, चेतन बंगल्याच्या परीसरात फिरत होता .त्याला अशोककाकाचे फारच कौतुक वाटयचे.. अन्जु अमित टेरेसवर गप्पा मारत होते..
"चला अन्जू ,चेतन, अमित जेवणाची वेळ झाली, जेऊन घेऊयात."राजेश यांनी आवाज दिला.

.. पपा आपण ममाला आणायला हवे होते" खरंय तुझं चेतन पण ती यात जास्त इंटरेस्ट घेत नाही,का कुणास ठाऊक पण तिला दौरे वगैरे जास्त आवडत नाहीत.
अरे, अमित तु मघापासुन इतका गप्प का आहेस?"इति राजेश.
पपा मला हे सगळं गूढ, एक्सायटींग वाटतय, मी ते फक्त अनुभवतोय
सर्वांचीच एकवार नजरानजर झाली.. चेतन आणि अन्जुला आपल्या वडीलांचा अभिमान वाटत होता.
राजेश यांच्या तेजस्वी चेहर्यावर हास्य विलसत होते, त्यांच्यातला वैज्ञानिक आता जागा होत होता..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त