स्पर्धेच्या युगात सरकारी कंपन्यांना प्रगती कशी साधता येईल ?

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 March, 2014 - 07:41

बीएसएनएल ची वाढ सुधारण्यासाठी काय करावे लागेल.
{गीते मध्ये कृष्णा ने सांगितले आहे कि, तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी जर तुम्ही लढला नाहीत तर तुम्ही गमावलेल्या गोष्टीसाठी तुम्हाला शोक करण्याचा अधिकार सुद्धा नाही.}
पूर्वी आमचा अनुभव असा होता कि टेलिफोन खात्यातील लोकांशी जवळीक साधायची स्पर्धा होती.आम्ही कोठेहि गेलो तरी (दुर्दैवाने स्मशानात एखाद्याला पोहचवायला तरी सुद्धा )लोक दबक्या आवाजात का होईना पण टेलिफोन शिवाय बोलू देत नसत.आज हि बोलतात पण भाषेचा सूर बदललेला आहे.तुमचे बिल फार येते /न बोलता येते /सेवा बरोबर नाही / दोन मोबाईल शेजारी असून सुद्धा कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असे खोटेच सांगितले जाते .वगैरे अनेक व्यथा मांडून आमची अवस्था दयनीय केली जाते.यालाचकाळाचा महिमा म्हणतात.किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास एकुलता एक मुलगा असेल तर त्याचे लाडच जास्त होतात आंधळ्या प्रेमा मुळे अवगुणांकडे दुर्लक्ष केले जाते.त्याच प्रकारे जेव्हा आम्ही एकटे होतो त्यावेळी लोकांना पर्याय नव्हता म्हणून आपल्या दोषांबाबत कोणी फारसे गंभीर नव्हते.पण आज अनेक कंपन्या सोबत आपल्याला आपले अस्तित्व सक्षमतेने टिकवावयाचे असल्यास आपल्या वाढीत सुधारणा करावयाची असेल तर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.म्हणूनच बी.एस.एन.एल.ची प्रगती होणे क्रमप्राप्त ठरते.या साठी पूर्वीचाच धागा पकडून लोकांनी जरी आम्हाला बोलते केले नाही तरी आम्हालाच त्यांच्याशी या विषयावर हमेशा बोलत राहावे लागणार आहे. त्यामुळेच जाहिरात करताना प्रथम आपल्या घरात काय आहे?कोठे आहे?कसे आहे?याचा सखोल आभ्यास करूनच सुरुवात करावी लागेल.सध्या लोकांचा कल बी.एस.एन.एल कडे एक नावडती वस्तू म्हणून बघण्याचा वाढत आहे.कारण लोकात इतर कंपन्यांचे आकर्षण वाढत आहे त्याचे आकर्षण असणे साहजिक परंतु जुने ते सोने हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर सर्वांवर येऊन ठेपली आहे.चला तर मग आपण कार्य सिद्धी ला सुरुवात करू या.
प्रथम आपण हे ठरवले पाहिजे कि बी.एस.एन.एल.ला खरेच प्रगती पथावर न्यायचेच आहे तर साधी गोष्ट हि आहे कि आपले दोष निघाले कि आपण सर्वोत्तमच आहोत.दोष निघाल्यावर कोणी चांगले जरी नाही म्हणाले तरी वाईट तर नक्कीच म्हणणार नाहीत.दुसरे म्हणजे जेथे विचार एक असतात तेथेच प्रगती शक्य असते तेव्हा आपले विचार एक होऊन दोष निघणे आवशक आहे तेव्हा दोष निघण्यासाठी आवशक आहे ते आत्म चिंतन. आत्म चिंतनात जे दोष सापडतात ते काढणेच हितावह आहे.इथे कोणावर टीका नाही.तसेच इथे सुधारणा होण्यासाठी अनेक मत प्रवाह असू शकतात.आपला विभागच मुळी अवाढव्य आहे त्याचा आपल्याला अभिमान व गर्व देखील आहे पण त्या दहा आंधळ्या लोकांनी जसे आपापल्या अनुभवाने हत्ती चे वर्णन केले तसे प्रत्येकाचे अनेक विचार असतील. सर्वच चांगले असतीलच असे नाही काही कालमानानुसार कालबाह्य हि असतील पण तो धागा महत्वाचा असू शकतो.सर्वात महत्वाचे म्हणजे कडू पचवायला सर्वच प्रकारे मोठी ताकद लागते त्यामुळे आपले दोष माहित करून घेणे ते काढून टाकण्यासाठी सर्व स्तरावर प्रामाणिक प्रयत्न झाले तरच आपण खऱ्या अर्थाने बी.एस.एन.एल. ला नंबर १ वर ठेवण्यात यशस्वी होऊ अन्यथा पोकळ गप्पा मारून काहीच साधणार नाही कृतीवरच भर दिला तरच हे होईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. व सर्वांचाच उद्देश जर खरोखरच मनापासून एकच असेल तर मात्र अवघड काहीच नाही.
आत्मचिंतनात सर्वात महत्वाचे आहे ते नियोजन :-
आत्मचिंतनाची भूमिका हि असावी कि आम्ही मागे का आहोत? तर आम्ही कधी ठरवलेलेच नसते कि आम्हाला पुढेच जायचे आहे.त्या अनुशंघाने नियोजन असावे.
नियोजन पहिले:- हे कि, आपल्याकडे पडून असलेले अनावशक व कालबाह्य झालेली सामुग्री ची विल्लेवाट लावणे.ज्या योगे पैसा तर मिळेलच,व त्या सामग्रीने व्यापलेली जागा हि आवशक त्या प्रगतीच्या कामासाठी वापरता येईल.अथवा किरायाने असेल तर तो पैसा वाचेल. आपल्याकडे हे काम चालू आहे पण फक्त (Formality) औपचारिकता म्हणून.कारण अजून हि बरेच काम बाकी असून संबंधित लोकात या विषयी चे महत्व पटवून जागरूकता ठेवूनच हे काम व्हायला हवे.तसेच आवशक उपकरणे जी धूळ खात पडून आहेत ति गरजूंना उपलब्ध करून देणे हि तितकेच महत्वाचे आहे.
दुसरे नियोजन आहे ते कर्मचारी व अधिकाऱ्यांचे :- आज अशी परस्थिती आहे कि काही ठिकाणी अनावशक स्टाफ आहे तर काही ठिकाणी प्रचंड कमतरता आहे याला कारण प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ व दबाव, त्यात संघटनेचा हस्तक्षेप, अकार्यक्षमता, कामाची आवड नसणे पर्यायाने बी.एस.एन.एल. कडे फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी या दृष्टीने बघणे हे आपण सर्वजणच अनुभवत आहोत पण ठोस निर्णय होत नाही याला आपण सर्वच जबाबदार आहोत.सर्वत्र समानता आपण आणलीच पाहिजे. अन्यायकारक बदली साठीच भांडले पाहिजे बी.एस.एन.एल. च्या हिताच्या आड कोणी येउ नये हि भावना वाढणे आवशक आहे.तसेच काम करण्याची इच्छा नसनारयाने इतरांची कुचंबना करू नये व काम करणारयावरच सर्व भार असू नये.
तिसरे नियोजन आहे ते खर्चाचे :- यात प्रामुख्याने उर्जेची बचत या बाबतीत विभागाने वारंवार नियमावली काढून हि वर सांगितल्या प्रमाणे फक्त औपचारीकतेला च महत्व दिले जात आहे.(काही ठिकाणी नसेल पण तसे सर्वच ठिकाणी व्हावे म्हणून) कित्येक कार्यालयात सूचना लावून सुद्धा वेळी अवेळी अनावशक विद्युत उपकरणे चालूच असतात.कोणी काही बोलले कि तेवढ्या पुरते पाळले जाते किंवा बोलणाऱ्याला च वेड्यात काढले जाते.आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या चालूच असते हे ठीक नाही. कित्येक एक्स्चेंज मध्ये हि आवशक त्या क्षमते नुसार उपकरणे चालू नाहीत.अनावशक उपकरणे अनावशक खर्चात पडतात हे त्रिकालबाधित सत्य असून कधी कधी ती हटवण्याचे प्रस्ताव मंजूर होत नाहीत किंवा पर्यायी व्यवस्था नसल्याने संबधित हालचाली होत नाहीत. गरजे नुसार प्रत्येक ठिकाणी उपकरणे कमी जास्त तात्काळ करता यावी यासाठी पुरेपूर क्षमतेचा वापर व अनावशक गोष्टी टाळण्यासाठी सर्वांचेच बारीक लक्ष असणे अत्यावशक आहे.
या नंतर महत्वाचे आहे ते इमारतींचा पुरेपूर उपयोग:- काही ठिकाणी सुसज्ज इमारती आहेत तर कृत्रिम गैरसोयीने व्यापलेल्या आहेत तर काही ठिकाणी इमारती रिकाम्याच आहेत .रिकाम्या इमारती काही नियमावली बनवून भाडे तत्वावर देण्याबाबत काही सर्वेक्षण झालेले नाही. बर्याच ठिकाणी किरायाने असलेल्या इमारतीत सुद्धा अनावश्क भाडे दिले जात आहे. पूर्वी गरज असेल पण सद्य परस्थिती नुसार जागरूकता दिसत नसल्याने येथे हि फक्त औपचारिकताच दिसते. हे बदलायला हवे यात सर्वांचेच लक्ष असणे आवशक आहे.
बचतीच्या नावाचा गैर वापर :- बचत करणे सर्वांनाच मान्य आहे. पण बचतीच्या नावाखाली दर्जा घसरत आहे या कडे कोणीच का लक्ष देत नाही ? जसे खर्च नको म्हणून जेवण टाळता येत नाही, तसे कंत्राट पद्धतीने कामे देताना फक्त चुकीचे निकष लावून, कमी दराला महत्व देऊन, कंत्राट दाराला कमी जबाबदारी देऊन कामे देऊन आपल्याया खरे तर फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.यात लॅन्ड लाईन व ब्रॉडबॅड चे कनेक्शन देणे अथवा निगा राखणे, केबल ची निगा राखण्यासाठीचे साहित्य निकृष्ठ दर्जाचे असणे,किंवा सामग्रीच उपलब्ध नसणे. आवशक तेथे वाहन उपलब्ध नसणे,असल्यास कि.मी.चे बंधन नियोजन बद्ध नसणे.मागणी असलेली सामग्री वेळेवर उपलब्ध नसणे,आवशक ती उपकरणे खरेदी न करता येणे अथवा वेळेत दुरुस्त करता न येणे.आवशक गोष्टीनाच फाटा देणे जसे कि वैद्यकीय भत्ता बंद करून देयके मागवणे व अनावशक काम वाढवून ठेवणे.आरोग्याच्या बाबतीत सर्व समावेशक पर्याय हवा.पोकळ जाहिरातीवर होणारा खर्च बंद व्हायला हवा.जाहिरात सुटसुटीत सर्व सामान्यांना चटकन समजेल अशी असावी.तसेच आवशक तेवढ्याच प्रती उपलब्ध न होता बर्याच ठिकाणी धूळ खात पडलेल्या दिसतात.कालबाह्य जाहिराती काढून टाकल्या जात नाहीत. हे सर्व प्रगतीचे लक्षण निश्चितच नाही.तेव्हा जाहिराती साठी योग्य व कमी खर्चाचे माध्यम निवडणे व त्याची नियोजन बद्धता हि आपल्या सर्वांचीच गरज आहे.
आर्थिक गळती थांबवणे:- (१)विविध प्रकारची देयके वेळेत भरली नाहीत तर नियमानुसार दंड भरला जातो त्याला जबाबदार कोण? नुसते जबाबदारी ढकलल्याने मूळ उद्देश बाजूस रहातो.दक्ष राहिल्यास हे नक्कीच जमेल.
(२)सेवा खंडीत झाल्याने बिलात सुट दिली जाते त्याला कोणी जबाबदार आहे का नाही ? कि नुसती सुट देण्यातच आपण स्वतला जर धन्यता मानत गेलो तर आपल्याला कोणी सवलत देणार नाही.याचे प्रमाण आपण निश्चित पणे कमी करू शकतो.
(३) केबल चोरीस जाने (पोलिसात तक्रार करून काहीही साधत नाही)जुना फॉल्ट काढण्यास व नवीन केबल टाकण्यासाठी येणाऱ्या कारपोरेशनच्या आडचणी (परवानगी साठी भरमसाठ रकमेचे कोटेशन देणे आथवा अडवणूक करणे) /विविध एजन्सी कडून त्यांच्या कामात केबल तुटणे यावर सर्वकश विचार होऊन बसले आहे (बी.एस.एन.एल ची केबल तोडण्यास कोणालाही काहीच भीती वाटत नाही तर मग भरपाई चे लांबच राहिले या बाबतीत बिएसएनएल चे भरपाईचे नियम कोठेही पाळले जात नसावेत)ह्या कामी मेडिया चे साह्य निश्चित आपल्या फायद्याचे राहील कारण सत्य परिस्थिती जनते समोर आल्याशिवाय जनतेच्या मनात आल्याशिवाय जनतेच्या मनात आपल्या विषयी आपुलकी निर्माण होणारच नाही
(४) टेलिग्राफ कालबाह्य विभाग ठरवला व बंद केला तसे बारकाईने अभ्यास करून अजून सुध्दा काही विभाग,उपविभाग सुद्धा कालबाह्य ठरवता येण्या सारखे आहेत का ते त्वरित पहाणे व तातडीने अंमलबजावणी करणे.
चौथे नियोजन आहे ते स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी अभ्यासू व अमलबजावणी विभाग उघडण्याची:-
या साठी मार्केटिंग विभागालाच नवे रूप देण्याची गरज आहे .प्रत्यक्षात बी.एस.एन.एल. ज्या २१ प्रकारच्या विविध सेवा पुरवते त्या सर्व सेवांसाठीच स्वतंत्र असा या प्रकारचा विभाग असावा. कारण आज च्या परस्थितीत नुसते कातडी बचाव असे दृश्य सर्व विभागात दिसते. म्हणजेच एक प्रकारची मरगळ आलेली आहे. ती बदलून सर्वात वास्तविक चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे.होतकरू व इच्छुक वर्ग यात समाविष्ठ असावा व त्यांना वरचेवर प्रशिक्षण देण्यात यावे त्यांच्या अडचणींना प्राधान्य देण्यात यावे.येथे विशेष लक्ष असावे.
(५)प्रत्येक कर्मचारी/अधिकारी/वरिष्ठ अधिकारी यांनी इतर विभागातील लोकांशी वैयक्तिक संबंध/ओळख असल्यास त्याचा बी.एस.एन.एल.साठी वापर करता आला व हे संबंध वापरून आपल्या सेवा घेण्यास भाग पाडून आपले उत्पन्न हि वाढवू शकतो. तसेच कधी काळी जी काही भरपाई/कर/दंड इ.गरजेनुसार आपल्याला भरावे लागते त्यासाठी
हेच संबंध वापरून आपली रक्कम कमी करता आली तरीही बरेच काही साधू शकते
आत्मचिंतनाची दुसरी बाजू आहे कालमानानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे
म्हणून खालील बदल व्हावेत ते गरजेचे आहेत :-
(अ) महत्वाचे अत्यावशक बदल
(१)सक्षमतेने चालवण्यासाठी कर्मचारी अधिकारी यांचे स्वास्थ्य टिकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी खेळ /योग वर्ग याचा प्रत्येक कार्यालयात अंतर्भाव असावा, व तेथे हजेरी सक्तीची असावी. (२) सुविचाराने प्रत्येकात परिवर्तन होते तेव्हा प्रत्येक कार्यालयात रोज सुविचार लिहण्याची सोय असावी. तेथे आवशक त्या जाहिराती विषयी सुद्धा लिहले जावे. जे कि आमुचे बहुमुल्य ग्राहक सुद्धा वाचून बी.एस.एन.एल. विषयी सुविचार ठेवतील.
(३) कर्मचारी/अधिकारी यांचे सुवर्तनच फार मोठा बदल घडवून आणू शकतो.म्हणून सुविचार असतील तरच सुवर्तन घडेल. त्यासाठी रोज प्रार्थना सक्तीची करावी.आपसातील हेवे दावे त्यामुळे ग्राहक दुरावणे,कार्यालयीन नियमावली न पाळणे हे सुवर्तन नव्हे- तर सतसत विवेक बुद्धीला स्मरून आपले कर्तव्य आपल्या हद्दीत परिपूर्ण करून ग्राहकाचे समाधान,बी.एस.एन.एल.ची बचत व बी.एस.एन.एल.च्या उत्पन्नात वाढ साधने हेच सुवर्तन आहे.
(४) सध्याचे युग हे विज्ञान युग आहे.तेव्हा विज्ञानाच्या अत्याधुनिक सोयींचा प्रत्येकाला जास्तीतजास्त उपयोग ग्राहकाच्या सेवेसाठी करता यावा या बद्दल विभागाने व कर्मचारी/अधिकारी यांनी दक्ष असावे.
(ब) महत्वाचे इतर बदल:-
(१)ग्राहक सेवा केंद्र हे मोठे दालन
येथे परिपूर्ण ज्ञान,सुविधा,सुसूत्रता,उपलब्धता, असावी व त्यांच्या अडचणीना प्राधान्य असावे.
बँके प्रमाणे सुविधा देण्याचा कालावधी जाहीर रित्या सी.एस.सी.त लावला.कर्मचारी/अधिकार्यांनी आपल्या कार्य क्षेत्रा बाहेरील काम ग्राहकाला समजणाऱ्या सोप्या व नम्र भाषेत तसेच त्याला कमीतकमी त्रास होईल असा सल्ला देणे आवश्यक आहे.आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाचे काम प्रत्येकाने जर ग्राहकाला आपल्या समोरच बसवून संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याशी स्वतः संपर्क करून ग्राहकाला कोठे हि न पाठवता करण्याचे निश्चित केले तरच प्रत्येक ग्राहक समाधानाने फक्त बीएसएनएल चाच विचार मनात ठेऊन घरी जाईल.विनामूल्य व मुल्यांकित सेवा स्पष्ट पणे सांगणे कामास लागणारा वेळ व काम होऊ शकत नसल्यास अडचणी प्रामाणिक पणे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
(२)अत्याधुनिक उपकरणाचा अभावामुळे सेवेचा दर्जा घसरत आहे.प्रत्येक विभागात अत्यावश्यक असे एक संच तरी असणे अत्यावश्यक आहे परंतु खरेदी चे प्रपोजल कधी मंजूर होत नाही.त्यामुळे बीएसएनएल चे खच्चीकरण होत आहे.यात इतर कंपन्याचा हात असल्याची शंका मनात आल्यावाचून राहत नाही. उच्च प्रतीची सामुग्री जरी महागडी असेल तरी त्यामुळे देखभाली चा खर्च आपोआप कमी होईल व आपले रीव्हेन्यू चे लक्ष हि साधले हि काळ्या दगडावरची रेघ आहे.हे सर्वांना मान्यच करावे लागेल म्हणूनच सर्वच विभागामध्ये काम करणार्याने उच्च प्रतीची सामग्री च वापरण्या बाबत दक्ष असावे.
(३) नवीन मोबाईल बी.टी.एस.बसवणे,त्यांची निगा राखणे यात सुसूत्रता आली पाहिजे आज हि अनेक ठिकाणी मागणी असून आपण मागे आहोत. याचा गांभीर्याने विचार होऊन अमलबजावणी व्हावी.
(४) मार्केटिंग विभागाने ग्राहकांच्या हितासाठी ठराविक कालावधी नंतर वारंवार चर्चा सत्र घेऊन त्यात येणाऱ्या सूचना अंमलबजावणी व आडचणी दूर होण्या बाबत कार्यक्रम ठरवावा.
(५) लेख विभागाच्या हि अनेक त्रुटी पैकी महत्वाची त्रुटी म्हणजे वेळेत थकबाकी दारांना सूचना न पाठवणे व वेळेत कोर्टात केसेस दाखल न करणे व्हेव ऑफ चे टारगेट या परिस्थितीत हास्यास्पद वाटते.वसुलीसाठी अजीबातच प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाहीत मात्र औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दबाव आणला जातो व मंजुरी मिळण्यासाठी जो आटापिटा केला जातो तोच वसुली साठी प्रामाणिक पणे सर्वानीच जर केला तर असे वातावरण तयार होईल कि या खात्याचे थकीत दार राहणे एवढे सोपे नाही व सर्वात मोठे रीव्हेन्यू लिकेज संपुष्टात येईल.ग्राहकाला हमखास बिल पोहोचण्याची यंत्रणा उभारावी/किंवा फोन सुविधा अशी असावी कि जर ग्राहकाने एका विशिष्ठ क्रमांकावर फोन केला तर त्याला घरी जाऊन बिलाची रक्कम घेऊन पावती जागेवरच देण्यात यावी.(ग्राहक देवो भव) .
सर्विस कनेक्शन चे बिल पाठवण्यात जो खर्च होतो त्या कडे का बरे काना डोळा केला जातो ?.तो खर्च आपण वाचवू शकतच नाही का ? पण लक्ष द्यायचे कोणी हा प्रश्न आहे . याच प्रमाणे जे टेलिफोन कनेक्शन्स आपल्या कर्मचारी/अधिकाऱ्यांकडे चालतात त्यांच्या बिलाबाबत हि आपण सोईस्कर नियोजन करून खर्च वाचवू शकत नाही काय?
(६)या आता सर्वात महत्वाचे लक्ष (टार्गेट) रिव्हेन्यू हेच आहे ते साधण्याबाबत बाह्य विभागाचे (एक्सटरनल चे फार महत्वाची भूमिका आहे पण ल्यांडलाइन वाढवणे/टिकवणे हि फक्त बाह्य विभागाचीच जिम्मेदारी आहे अस नाही.विभागाची प्रतिमा/प्रवेशद्वार व उत्पन्नांचा बराच हिस्सा हा एक्सटरनल प्लांट वरच आवलंबून आहे पण एक्सटरनल कडे सावत्र लेकरा प्रमाणे सर्वांचा दृष्टीकोन आतातरी बदलायला हवा कारण आर एम/टीम पासून वरिष्ठान पर्यंत ज्याला त्याला शिक्षा द्यावायची आहे.त्याला एक्सटरनल मध्ये पाठवले जाते अशी बऱ्याच ठिकाणी परंपरा आहे.त्यामुळे जास्तीत जास्त व्हिजिलन्स केसेस ह्या एक्सटरनल स्टाफ वर होणे हि पारंपारिक ओळख झाली आहे.ती आता तरी बदलायला हवी.ग्राहक नाराज झाला तर दोष सरळ सरळ एक्सटरनल वरच येतो.खरी आभियांत्रिकी (इंजिनिअरिन्ग) जर या विभागात आणली नाही तर ब्रॉडबॅड /आय पी टीव्ही/ व्हीएएस व्यवस्थित चालणार नाहीत त्यामुळे ग्राहकाला नाविलाजास्तव बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.त्यामुळे एक्सटरनल मधे कुशल स्टाफ असने आज सर्वात निगडीची गरज आहे.ह्या सर्व स्टाफ ला standard लाईन प्यारामिटर माहित असणे गरजेचे आहे.त्या शिवाय landline ची मार्केटिंग अशक्य आहे.कारण आधुनिक सुविधा साठी आवश्यक गोष्टी माहित नसतील तर सुविधा देऊन कटकटीच वाढतील.साधारपणे खालील गोष्टी जरूर तपासाव्यात.
parametr.png
(७)शहराच्या नवीन /विस्तारित भागामध्ये जेथे नव्याने वस्ती/ मल्ट्टी स्टोरी बिल्डींग /सोसायटी होत आहेत व तेथेच प्रचंड मागणी असताना हे सर्व क्षेत्र मात्र नॉट फिजिबल या गोंडस सदरात मोडते त्याला ठोस पर्याय शोधण्यात आलाच पाहिजे.
(८) ग्राहकाला कुठल्याही सेवेचे स्वतःचेच उपकरण वापरणे आवश्यक करावे म्हणजे मोठी डोके दुखी दूर होऊन उपकरण दुरुस्ती वर होणारा अनावश्यक खर्च कमी होईल कारण दुरुस्त केलेले उपकरण सुद्धा फारसे समाधान कर्क नसतात.याने बी.एस.एन.एल. विषयीची ग्राहकाची नकारात्मकता निश्चित कमी होईल.फ्री call बंद करून मासिक भाडे कमी करावे
(९) अनेक योजना नुसत्या कागदावरच राहतात.फक्त औपचारिक ते वरच भर असतो. उदा, (अ )पी.जी.सेल... कोणाची काय तक्रार आहे?कोणाशी संबंधित आहे? याचे सुद्धा तारतम्य पहिले जात नाही .कागदाला कागद लावला कि झाले. (ब)मान्सून सेल...नुसती आकडेवारी घेऊन पुढे काय?अडचणी बाबत ठोस उपाय नाहीत. यामुळे ग्राहक दुरावला जातो या कडे गांभीर्याने पहिले जात नाहीच. प्रत्येक कामाची जबाबदारी कागदी घोडे नाचवून संपत नसते, ग्राहकाचे समाधान हि जबाबदारी आहे हे प्रत्येकाच्या मनात ठसलेच पाहिजे.
(1०)बी.एस.एन.एल ची ओळख च एक्सचेंज मुळे आहे.ह्या एक्सचेंज वरच मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.व हे एक्सचेंज landline चे च जास्त प्रमाणात आहेत.तेंव्हा landline टिकली तर तरच एक्सचेंज राहतील.सध्या एक्सचेंज बंद करण्याचे लक्ष दिले जात आहे ते landline कमी होत असल्यामुळेच ना?landline नाही तर एक्सचेंज नाही व एक्सचेंज नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नौकरया हि राहणार नाहीत म्हणून पूर्वी लोकांना landline चे आकर्षण होते तेच आजही landline वर चालणाऱ्या broadband विषयी जरूर आहे.हाच मुद्दा पक्का पकडून landline बळकट करण्यासाठी असे काम केले पाहिजे कि,ग्राहक स्वतः खुश होऊन तो स्वतःच landline ची जाहिरात करेल तेंव्हाच आपण landline च्या मार्केटिंग ची जबाबदारी यशस्वी रित्या पार पडू व हे गोड ओझे ग्राहक स्वतः स्वीकारेल यात शंका नाही.शेवटी काहीही झाले तरी संकटे येतच राहणार landline बंद होणे हे जरी आजचे संकट असले तरी आज गरज आहे ती आपल्या सर्वांच्या संयमाची.व चिकाटीने काम करण्याची.पर्यायाने ग्राहकाचे पूर्ण समाधान होईल अशी सेवा पुरविण्याची. कारण आज प्रत्येकाला वेळ नाही व अनेक पर्याय हि उपलब्ध आहे.दिवसाचे काम लोकांना सेकंदात हवे असते म्हणून आपल्याला अमूलाग्र बदलावे लागेल तरच आपली landline बंद होण्याची काळजी मिटेल.ज्या दिवशी ग्राहक स्वतः landline ची जाहिरात करेल तो दिवस लवकर गाठण्याचे उद्दिष्ठ ठेऊन आपण सर्व जन एक होऊन त्वरित कामाला सुरुवात करण्याचा निर्धार खालील घोष वाक्याने करू या
Use of land Line is very fine
Requirs minimum one coin
Then why Late?...........Let us Join
(११)सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मच्यार्याच्या/किंवा खालच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले पाहिजे त्यात स्वार्थापोटी दर्जा दुर्लक्षित होता कामा नये.तसेच येथे केवळ औपचारिकता न बाळगता कामच झाले पाहिजे हि वृत्ती असावी.कारण कासव सुद्धा शर्यत जिंकू शकते गरज आहे ती फक्त शर्यतीत उतरण्याची व ती हि अशी कि प्रतिस्पर्ध्याचे नामोनिशान सुद्धा राहता कामा नये. हे सुद्धा होऊ शकते त्यासाठी एकत्र येणे हि सुरवात,एकत्र रहाणे हि प्रगती तर एकत्र काम करणे हेच आपले यश होऊ शकते.
(१२) ग्राहक हाच केंद्र बिंदू व त्याच्या सेवा हेच मुख्य लक्ष ठेवून वेळ प्रसंगी नियमात शिथिलता आणावी लागेल त्या साठीच अडून बसने/कर्मचारी/अधिकारी यांना वैयक्तिक कारणासाठी त्रास देण्यासाठी कायद्याचा किस पडण्याची वृत्ती घातक ठरू शकेल.या सर्व प्रकारात कोणाचे काही साधत नाही मात्र ग्राहक भरडला जाता काम नये या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावे लागतील.
(१३)आपल्या सर्वांनाच सेवा देताना,कर्तव्य बजावताना ज्या आडचणी येतात,अनुभव येतात व ग्राहकाचे होणारे हाल हताश पणे बघावे लागतात तो नाविलाजाने बीएसएनएल ला सोडून जात आहे,आपल्याला शापून जात आहे कारण त्याला दुसर्यांच्या सेवा म्हणजे निव्वळ लुट आहे हा अनुभव तोच सांगतो व त्याची योग्य दाखल घेतली न गेल्याने तो दिन पणे म्हणा किंवा नाविलाजाने निश्चितच शाप देत आहे.आजही बरेच ग्राहक सेवा सुरु झाल्या नंतर प्रत्यक्ष येऊन धन्यवाद देणे कर्तव्य मानतात केवढा हा त्यांचा मोठेपणा आहे .त्याची योग्य दाखल आपण घेतलीच पाहिजे अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही.आशीर्वाद मिळण्यास लायक नसलो तरी शाप घेण्या इतपत नालायक निश्चितच आपण नाहीत हि भावना जागृत व्हावी व संघटीत प्रयत्नातूनच यश मिळते हे सिद्ध करण्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.प्रत्येकाने आपला अनुभव/योजना निश्चितच चांगल्या असतील तर त्या सर्वांना जरूर सांगाव्यात.हे सर्व साधण्यासाठी कठोरतेने काही निर्णय घ्यावे लागतील. इमारत पक्की होण्यासाठी पाया, प्रत्येक विट,कॉलम,बीम,मजबूतच लागते त्या प्रमाणेच सर्वच घटक पक्के तपासून घ्यावे लागतील.दोषींवर कडक कारवाई तर अनावशक् तेचे नियोजन करावेच लागेल.आणि या सर्व गोष्टींचा विचार फक्त बी.एस.एन.एल.च्या वर्धापन दिना निमित्तच केला जाऊ नये.कुठला हि दिन हि एक मर्यादित प्रेमाचे लक्षण आहे त्यानेच माणूस दीन होतो.म्हणून तर ते आपल्या रक्तातच भिनले पाहिजे.भ्रष्टाचार हा नेहमी वरूनच खाली येतो तेव्हा हे थोपवणे महत्वाचे असल्याने प्रत्येकाने स्व:त पासून आजच सुरवात केली पाहिजे.कारण रोज नवे नवे तंत्र भ्रष्टाचार या क्षेत्रात येत असल्याने ते एक मोठे आव्हान सर्वांपुढेच आहे.
आता फक्त एक आशा आहे कि या निबंधाच्या माध्यमातून जे काही सर्वांचेच चांगले विचार या मंचावर आले ते नुसते जाणून न घेता त्याची त्वरित अमलबजावणी होईल अशा स्पर्धात्मक वातावरणातून च विचार मंथन होईल व खरेच बी.एस.एन.एल प्रगती पथावर हमेशा राहील. धन्यवाद.................
आम्ही सर्व जण एक आहोत ,एक राहणारच आहोत हा आमचा एकमुखी निर्धार आहे
जय बी.एस.एन.एल.| जय बी.एस.एन.एल.|| जय बी.एस.एन.एल.|||

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
दि.०१/१०/२०१३/ रोजी बी.एस.एस.एन.एल. च्या १३ व्या वर्धापन दिना निमित्त पुणे बी.एस.एस.एन.एल.ने निबंध स्पर्धा आयोजित केली होती ज्या मध्ये आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने/शुभेच्छेनेच माझ्या याच निबंधाला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला तो आपल्या सर्वांचाच आहे म्हणूनच येथे टाकला आहे .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
cert-1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्कीसाहेब बी एस एन एल अथवा इतर सरकारी कंपन्या प्रगतीपथावर (=प्रॉफिटेबल ?)होऊ शकणार का ?कशा होतील हे प्रश्न फारच गौण आहेत .त्या तशा व्हाव्या अशी इच्छाही नाही .त्या पाणपोया आहेत .

पत्कीसाहेब, अंतर्गत कार्यपद्धतिबद्दल काय बदल करावे, याबाबत आपणच योग्य दिशा दाखवूं शकाल. ग्राहक म्हणून मला आवश्यक वाटतो तो बदल अधिकारी/कर्मचार्‍यांच्या वृत्तीबद्दल आहे; आपल्याकडे आतां मक्तेदारी नाही व आपण तीव्र स्पर्धेमधे आहोत, ही जाणीव बहुतेक कर्मचार्‍यांत [ बरेच चांगले अपवादही आहेत] अजून मुरलेली नाही व ती तशी मुरणं ही आत्यंतिक गरज आहे, असं मला वाटतं. असं कां वाटतं, याची सोदाहरण कारणं-
१] एका छोट्या शहरातून अचानक मला पुण्याला कित्येक महिन्यांकरतां जावं लागलं व बिल न भरल्याने माझी लँडलाईन डिस्कनेक्ट करण्यात आली. मी दिलगिरी व्यक्त करून मला सांगण्यात आलेले सर्व पैसे भरले. पण, 'ज्यावेळीं लाईन उपलब्ध होईल, तेंव्हाच तुमचं रिकनेक्शन होईल; केंव्हा तें सांगता येणार नाही' असं त्यावेळीं मला सांगण्यात आलं. ' मला हें कसं कळणार ?' या प्रश्नावर माझ्या मोबाईलवर तें कळवण्यात येईल असं सांगण्यात आलं. वर्ष होवून गेलं तरिही माझी लँडलाईन जोडली गेली नव्हती. पुन्हा चौकशी करून, मीं ज्येष्ठ नागरिक असून शक्यतो माझा पूर्वीचाच फोन नंबर मिळावा अशी मीं विनंति केल्यावर, लवकरच माझा फोन जोडला गेला व मला पूर्वीचाच नंबरही मिळाला. म्हणजेच, 'डिसकनेक्ट' केल्यापासून ती लाईन [व नंबर] तशीच उपलब्ध होती व मीं पैसे भरतांच त्याक्षणींच ती मला सहज मिळूं शकली असती. लाईनमन कडूनही माझा हा अंदाज बरोबर असल्याचं कळालं. मला झालेल्या गैरसोईपेक्षाही वर्षाहून अधिक काळ एक लाईन अकारण तशीच ठेवून त्यापासून मिळणारं उत्पन्न बुडवणं, याचं कांहींही न वाटणं/ याची दखल घेतली न जाणं, या वॄत्तीत बदल व्हायला हवा.
२] याच शहरात टेलिफोनच्या मशीनबद्दल अगणित तक्रारी आहेत. कुणीही तक्रार केली की त्याला अशा मशीन्सचा तिथं पडलेला ढीग दाखवला जातो; 'हवं तर तुम्ही तुमचं मशीन घेवून या व ठेवून जा; दुरुस्त झालं कीं/तर घेवून जा', असंही सांगितलं जातं. " 'रेंटल' म्हणून जी रक्कम दर बिलांत दाखवली जाते , त्यांत मशीनच्या वापराचाही भाग असतोच ना ?", अशा प्रश्नाची उत्तरंही दिलीं जात नाहीत !
३] याच शहरात टेलीफोन एक्स्चेंजची मोठी इमारत बांधण्यात आली आहे. लँडलाईनसंदर्भातल्या कामासाठी एकमेव अधिकारी दुसर्‍या मजल्यावर बसतात ,जो मजला साधारण इमारतींच्या चौथ्या मजल्याएवढा उंच आहे.
एके दिवशीं मीं गिर्यारोहण केल्यासारखा त्या मजल्यावर गेलों तर तिथें सर्व कुलूपबंद व चौकशी करायलाही कुणी नाही. खालीं येताना वर कुणीच नसल्याचं इतराना सांगण्याचं काम मलाच करावं लागलं. खालीं येवून विचारलं तर निर्विकारपणे 'आज त्या मॅडम येणार नाहीयेत' असं उत्तर दिलं गेलं. ग्राहकाभिमुख वृत्ती असती तर एक साधी नोटीस खालींच जिन्याच्या सुरवातीला लावून कित्येक जणांचा हा त्रास सहज वाचवतां आला असता. मीं तशी सूचनाही केली पण ती अंमलात आणली गेली असेलच असं वाटत नाही.
पत्कीजी, कृपया मीं उगीचच तक्रारीचा सूर लावतोय असं समजूं नका. [ मी कुठेही याबाबत तक्रार नोंदवली नाही ].पूर्वीं कांहीं वर्षं मीं महाराष्ट्र सर्कलच्या 'टेलीफोन अ‍ॅडव्हायजरी कमिटीचा' सभासदही होतो व महाराष्ट्रात टेलिकॉमचं झालेलं कौतुकास्पद काम मीं जवळून पाहिलं आहे. पण पारंपारिक मक्तेदारीमुळे निर्माण झालेल्या अ‍ॅटीट्यूडची गोची हा बीएसएनएलसाठी स्पर्धेला तोंड देण्यातला मोठा अडसर आहे, एवढंच मला अधोरेखित करायचं आहे.

पत्की साहेब,

सर्वप्रथम पारितोषिकाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

आपण बीएसेनेल मधे मोठ्या पदावर आहात असे वाटते. अन माबोमुळे जवळीक वाटते, म्हणून, अंदरकी बात असं एक निरिक्षण नोंदवू का?

प्रत्येक मोबाईल टावरवर सगळ्या कपन्यांचे मोबाईल जोडले जात असतात. त्याच्या वापरानुसार प्रत्येक कंपनी पैसे भरत असते, अशी माझी समजूत आहे. प्रत्येक कंपनीचे सेप्रेट टावर भारतभर पसरलेले आहेत, अशी परिस्थिती नाहीये.

बरोबर??

मग,

फक्त, आणि फक्त मोठ्या शहरात, उदा. पुणे-मुंबईमधे, बीएसेनेलला रेंज येत नाही. त्याचवेळी त्याच हँडसेटमधलं दुसरं टिनपॉट सिम जोरात रेंज पकडतं. हे असं का होतं?

मी ऐकलं ते असं, की बीएसेनेलचे अधिकारी लोक पैसे खाऊन हे मुद्दाम करवतात. अन यात तथ्य असावेच. कारण खेड्यापाड्यात, दुर्गम भागात बीसेनेल ची जी कनेक्टिविटी मिळते ती कुणीच देऊ शकत नाही. म्हणजे दुर्गम खेड्यापाड्यात कनेक्टिविटी देण्याची औकात अन ऐपत असलेली बीएसेनेल मेट्रोजमधे मार खाईल असे तर वाटत नाही!

या प्रॉब्लेमला सोल्युशन काय? याबद्दल काही सांगऊ शकाल काय?

Srd,भाऊ नमसकर,इब्लिस जी ,
सप्रेम नमस्कार ,
सर्वांच्याच प्रतिक्रियांचे मनपूर्वक स्वागत.
मा. Srd जी आपल्या प्रश्नाचे उत्तर मी होय असेच देईल कारण आमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या मते आपल्या देशात आजही प्रचंड मागणी व प्राधान्य हे सरकारी यंत्रणेलाच आहे किंवा बहुतांश लोक सरकारी योजनेवरच विश्वास ठेवणारे त्यामुळे सरकारी कंपन्या प्रगती पथावर निश्चित राहू शकतात फक्त लेखात समाविष्ठ केल्याप्रमाणे एकाच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ................... आत्म चिंतन
हे कंपनीतील प्रत्येकानेच करावे लागणार आहे .“आत्मचिंतनाची भूमिका हि असावी कि आम्ही मागे का आहोत? तर आम्ही कधी ठरवलेलेच नसते कि आम्हाला पुढेच जायचे आहे.त्या अनुशंघाने नियोजन असावे.” नियोजनाची व केलेल्या नियोजनाची अमलबजावणी बाबत असलेली उदासीनता यानेच प्रगती खुंटत आहे.
भाऊ नमसकर,
सर्वप्रथम तुम्हाला झालेल्या त्रास बद्दल मी दिलगिरी सह तुमची क्षमा पण मागतो कारण तुमच्या अपेक्षा रास्तच आहेत.
परंतु कधी कधी काय होते कि बंद झालेल्या नंबरचा केबल पेअर आम्ही गरजेनुसार वापरून सेवा देत असतो व आपण बिल भरल्यानंतर तेथे योग्य असा केबल पेअर नसेल तेव्हा तो केबल चा दोष निराकरण करण्यासाठी हल्ली सामग्री ची सुद्धा अडचण असू शकते.आपला नंबर व केबल पेअर ह्यादोन वेगवेगळ्या बाबी आहेत .जुना नंबर सहसा दुसर्याला दिला जात नाही किंवा ग्राहकच जुना नंबर नाकारत असतात (काही विशिष्ठ नंबर करता मात्र आग्रह असेल तर तो भाग वेगळा) तरीही संबंधित अधिकाऱ्यांची हि जबाबदारी आहे कि आपल्या अडचणीची ग्राहकांना स्पष्ट कल्पना पणे कळवाव्यात.
दुसरे तुम्ही जे मशीन म्हणता त्यावरून मला असे वाटते कि तुम्हाला टेलिफोन चे उपकरण बदलून हवे आहे तर त्या साठी विभागाने ते दुरुस्तीचे कंत्राट दिलेले असते व तुम्हाला खराब झालेल्या उपकरणाच्या बदल्यात दुरुस्त असलेले उपकरण दिले जाते .हल्ली आलेल्या आदेशानुसार ६०० रु भरून तुम्हाला नवीन उपकरण मिळू शकते परंतु काही ग्राहक बाजारात त्या पेक्षा कमी किमतीत मिळणारे उपकरण वापरणे पसंद करतात .व रेंट जो असतो तो संपूर्ण एका नंबरचा असतो त्यात एक्स्चेंज पासून ते आपल्या घरापर्यंतच्या सर्वच बाबी येतात फक्त उपकरण नव्हे .
प्रत्येक कार्यालयात सहसा काळजी वाहक नियुक्त केलेला असतोच व त्याची हि जबाबदारी आहे कि कार्यालयात ज्याला भेटायचे आहे ती व्यक्ती आहे किंवा नाही याची माहिती देणे ,ग्राहकांना अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सर्वतोपरी साह्य करणे हे त्याचे कर्तव्य असते व आपण याची तक्रार करू शकता .
पारंपारिक मक्तेदारीमुळे निर्माण झालेल्या अ‍ॅटीट्यूडची गोची हा बीएसएनएलसाठी स्पर्धेला तोंड देण्यातला मोठा अडसर आहे, हे आपले म्हणणे रास्त आहे त्या साठी विभागाने सर्वच स्तरावर प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे .आम्ही सुधारले पाहिजेच.
इब्लिस,
धन्यवाद.
हल्ली infrastructure म्हणजे बॅटरी ,त्याला चार्ज करणारी यंत्रणा ,जनरेटर ,ए..सी.हे सर्व एखाद्या अधिकृत कंत्राटदारा मार्फत उपलब्ध केले जाते व मोबाईल च्या विविध कंपन्या ते शेअरिंग तत्वावर घेतात त्यात बरीच बचत होत असते .आपल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर असे आहे कि मोबाईल सेंटर वरून विशिष्ठ प्रमाणातच पावर हवेत सोडायची असते (याचे प्रमाण अंतरराष्ट्रीय पातळीवर ठरलेले असते ) अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात हे सर्वांनाच माहित आहे जसे कि पक्षांची दिवसेंदिवस घटणारी संख्या हा त्याचा पुरावा आहे .मग हे बंधन मला वाटते कि फक्त बी.एस.एन.एल च पाळते (कारण भारत सरकारचे आहे ना ?) म्हणून आमची रेंज कमकुवत वाटत असली तरी हानिकारक नक्कीच नाही कारण ती सरकारी आहे आणि एकाच ठिकाणाहून जेव्हा विविध कंपन्या पावर ट्रान्समीट करतात तेव्हा interference होतो व निसर्ग नियमाप्रमाणे कमकुवत आधी बळी पडतात ..
शेवटी आम्हालाही सर्वांसाठी खूप काही करावे वाटते परंतु सरकारी यंत्रणेत प्रत्येकाच्या मर्यादेचा प्रश्न महत्वाचा आहेच.

पत्कीजी, तत्परतेने सौजन्यपूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पत्कीसाहेब आपले मनःपुर्वक अभिनंदन.
१. Top Management चा पुर्ण सपोर्ट आणि कमिटमेंट हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बदल होणे कठीण आहे.

२.आपल्या सारखे कंपनीला आपले मानणारे आणि (पाट्या न टाकता) मनापासुन काम करणारे लोक जितके जास्त असतील तेवढे आपल्याला अभिप्रेत असलेले बदल आपल्याला दिसतील.

१ आणि २ हे दोन्ही महत्वाचे आहेत आणि दोन्ही लागतील..केवळ एकाने काम भागणार नाही.

शुभेच्छा..

तुम्ही इतका विचार करता, हे महत्वाचे. नाहितर होपच नाहि म्हणत बुडवायला मदत करणारे कमी नाहीत. पण तुमच्यासारख्या लोकांमुळेच या कंपन्या टिकल्या तरी आहेत.

पत्की साहेब,
आपले उत्तर पटण्यासारखे आहे. मूळ लेखात आपण लिहिलेल्या बाबी देखिल प्रामाणिक व दक्ष कर्मचार्‍यास शोभेश्या आहेत.
सिग्नल स्ट्रेंग्थचे उदाहरण समजले, पण मला हे समजले नाही, की मेट्रो सिटीच्या बाहेर येताबरोब्बर बीएसेनेल चा सिग्नल इतरांपेक्षा उजवा का ठरू लागतो?
मी स्वतः बीएसेनेलच वापरतो. मोबाईल व लँडलाईन दोन्ही. इंटरनेटसाठीही बीएसेनेल सारखी उत्तम, विश्वासार्ह, स्वस्त व मस्त सेवा दुसरी नाही, हे माझे मत मी मायबोलीवरच अनेकदा लिहिलेले आहे. पण पुण्या मुंबईत नेटवर्क / डेटा नेटवर्क मिळायला जो त्रास होतो, त्यामुळे जेन्युइनली विचारत आहे.
कारण यामुळे गिर्‍हाइकं तुटून इतर नेटवर्क कंपन्यांकडे जातात. तिथे लुटालूट केली गेली तरी कनेक्टिविटी तर आहे ना, म्हणून काम धकवून घेतात. याने बीएसेनेलचा तोटाच होतो.

इब्लिस जी,
सर्व प्रथम मी तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो कि तुम्ही बी.एस.एन.एल च्याच सेवेचे उपभोक्ते आहात .

इब्लिस जी,
बी.एस.एन.एल चे कार्ड रस्त्यावर ,अथवा पान टपरीवर अशा ठिकाणी कधीच मिळत नाहीत,त्या साठी अधिकृत विक्रेते नियुक्त केलेले असतात किंवा आमच्या ग्राहक केंद्रावरच मिळतात . म्हणजे बी.एस.एन.एल चे कार्ड घेण्याची नियमावली विशेषत: तरुणांना अतिशय जाचक वाटत असते त्यामुळे बी.एस.एन.एल चे कार्ड मोठ्या शहरात विशेषत: मेट्रो सिटीत जरी कमी दिसत असले तरी मेट्रो शहरात देशातून रोजच येणाऱ्यांची संख्या काही कमी नसते.आज पर्यंत गुन्हेगारांकडे बी.एस.एन.एल चे कार्ड फारच क्वचित प्रमाणात सापडले याची तुम्ही पोलिसांकडून खात्री करू शकता. आपणच सांगितले आहे कि मेट्रो सिटी वगळता बी.एस.एन.एल .ची व्यापकता इतरत्र मोठीच आहे.तर आम्ही म्हणतो कि काही ग्रामीण भागात इतरांचे नामोनिशान सुद्धा नाही .वास्तविकत: सर्वच कंपन्यांना ग्रामीण भागात सेवा देणे हा लायसन च्या नियमावलीचा भाग आहे मात्र फक्त राष्ट्रीय महामार्गावरच्या गावात सेवा देऊन दंड भरणे ते पसंद करतात तर बी.एस.एन.एल. दंड न भरता सेवा देणे पसंद करते .त्यानुसार मेट्रो सिटी वगळता इतरत्र आमच्या कार्ड ची विक्री मोठीच आहे .त्या मध्ये कृषी -१ ,कृषी-२ ,व आता वाटप चालू असलेली कृषी-३ या योजनेने आशिया खंडातील सर्व विक्रम मोडीत काढलेले आहेत ,सुरवातीला आलेली विद्यार्थ्यांसाठीची योजना खुपच चालली व अद्याप हि वापरत आहेत .हे सर्व कार्ड जेव्हा मेट्रो सिटीत येतात तेव्हा येथील यंत्रणेवर निश्चितच ताण पडतो जसे कि एखाद्या विहरीत एकाच वेळी अनेकांनी पाणी काढण्यासाठी जर बादल्या सोडण्याचा प्रयत्न केला तर कोणाच्या हाती कितपत पाणी लागेल तसे च हे आहे म्हणजे मोबाईल च्या यंत्रणेची एक विशिष्ठ कार्ड संख्या हताळण्याची क्षमता असते पण त्या क्षेत्रात जर कार्ड ची संख्या वाढली तर हा प्रश्न येणारच.तसेच मी यापूर्वी दिलेल्या स्पष्टीकारणां च्याच अनुशंघाने मला येथे हेही मान्यच केले पाहिजे कि मेट्रो सिटीत मोबाईल च्या मशनरीची संख्या आवशकते पेक्षा कमीच आहे याला कारण कि आवशक तेथे आम्हाला जागा मिळत नाही .तुम्ही म्हणाल इतरांना कशी मिळते तर सोपे आहे त्यांचा एक हाती कारभार असतो एकाला जबाबदारी दिलेली असते कि हे काम झालेच पाहिजे तो साम दाम दंड वापरू शकतो तर सरकारी यंत्रणेत विविध समित्या असतात त्या समिती मार्फत मंजुरी घेऊन जागेचा करार केला जातो व त्याचे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्स च्या बाहेर जाऊन आम्ही जागा घेऊ शकत नाही म्हणूनच या मोक्याच्या जागी लोकांच्या दृष्टीने जरी आम्ही मागे असलोत तरी एकूण उत्पनाच्या दृष्टीने आम्ही सामाधानी आहोत. बहुतांश लोकांना बी.एस.एन.एल च्या एकूण २१ विविध सेवा आहेत ज्या कि इतर कोणीही देऊ शकत नाहीत हेच माहित नाही .बहुतांश कंपन्यांनी आमचे चानल भाड्याने घेतले असल्याने ते आमच्या पेक्षा स्वस्त सेवा देऊ शकत नाही हे सिद्ध करणे नको .मध्यंतरी आमचे भाडे भरले नाही म्हणून जेव्हा त्यांच्या सेवा आम्ही खंडीत केल्या तेव्हा लोकांना कळले कि बी.एस.एन.एल च्या हातात काय आहे. आमच्या विविध २१ सेवा .मी नंतर आपल्या सर्वांसाठी जरूर लिहणार आहेच. आमच्या लीज लाईनला मोठ्या कंपन्याची प्रथम पसंती असते . 3G डेटा कार्ड ची सेवा 2G च्या तुलनेत निश्चितच चांगली आहे त्यामुळे लोकांनी 2G ऐवजी 3G वापरावे . 3G डेटा कार्ड हे मोबाईल केंद्रा पासून ५०० मिटर परिघाच्या क्षेत्रात खूप प्रभावी काम करते .त्यामुळे नवीन मोबाईल केंद्र वाढवणे हे आमचे लक्ष जरूर आहे व तसे काम चालू सुद्धा आहे .आमच्या ग्राहकांसाठी आम्ही बिलाच्या मागे आमच्या सर्व योजना लिहीतच असतो पण गंमत अशी कि लोक बिल पहातात फारच थोडे लोक जाहिरात पहातात व कमी पैशात जास्त फायद्याच्या योजनेपासून वंचित राहतात . धन्यवाद .