भाषांतराचा व्यवसाय

Submitted by रेव्यु on 27 February, 2014 - 01:15

सेवानिवृत्तीनंतर मी इतर कामे ( प्राध्यापकगिरी, सल्लेगार ) व त्याबरोबरच भाषांतराचे ( मुख्य मराठी- इंग्रजी, मराठी- हिंदी व तस्त्सम ) काम सुरू केले.
आज पावेतो ९ पुस्तके व इतर व्यावसायिक काम ( फार्मास्युटिकल कंपन्यांचे तांत्रिक लिटरेचर , क्वा मॅन्युअल्स, सरकारी परिक्षांच्या प्रश्नपत्रिका ) केले.
या कामात व्याप्ती खूप आहे.
इतर क्षेत्रे म्हणजे सब टाय्टल देणे, मौखिक इंटर व्यूचे छापील दस्तावएजात रूपाम्तर, वेज अ‍ॅग्रीमेंट्स इ.

यात आवश्यक पात्रता. टेक्निकल टर्म्स वर व कंप्युटर वर प्रभुत्व. वेगवेगळ्या फाँट्स ची माहिती व रोज ३ ते ४ तास + भाषे वर प्रभुत्व.
घरबसल्या हा एक छंद व व्यवसाय होवू शकतो.
पैसा फार उत्तम नाही पण आपण गुंतले राहतो व वाचन उत्तम व सविस्तर होते. सुरुवातीस प्रकाशकांच्या तसेच कंपन्यांच्या मागे लागावे लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1. मराठी भाषांतरकारांसाठी काय कोर्सेस आज महाराष्ट्रात आहेत? (परकीय भाषांसाठी बरेच आहेत)
2. मराठी भाषांतरकार असे कुठे प्रशस्तीपत्रक (सर्टिफिकेट) मिळते का?
3. मराठी भाषांतर संबंधी ऑनलाईन (शब्दकोश सोडुन) काय साधने सापडतात?

रोज दर्जा व्यवस्थित ठेवून ७ ते ८ पानांहून पूर्ण करणे मला कठीण जाते.
इंजिनेयरिंग, एच आर , मॅनेज्मेंट इ चे भाषांतर करतो.
महिना १० हजारां हून कमावणे जवळ जवळ अशक्य आहे
असा सर्टिफिकेहन कोर्स ऐकिवात नाही

मुंबई विश्वविद्यालयाचे वेगवेगळ्या भाषंचे ६ महिने ते १ वर्षाचे डिप्लोमा आहेत पण भाषांतराचा कोर्स फक्त जपानी व जर्मनचा आहे.

मुंबई विश्वविद्यालयाचे वेगवेगळ्या भाषंचे ६ महिने ते १ वर्षाचे डिप्लोमा आहेत पण भाषांतराचा कोर्स फक्त जपानी व जर्मनचा आहे>>>> मी तेच म्हणतेय मराठी भाषेतून किंवा मराठी भाषेत भाषांतराचे कुठलेही कोर्सेस नाहीत.

इतर संकेतस्थळांवर मराठीचे जे काही 'जॉब्स' येतात ते इतर भाषांच्या तुलनेत नगण्य असतात. म्हणूनही आपल्या ज्येष्ठ अनुवादकाना स्पर्धेची तीव्र भिती वाटत असावी.

अनुवादकांना खरो़खर तीव्र भिती वगैरे( माझ्यापुरते हे विधान सीमित आहे~!) नाही. यात फारसा पैसा नाही- विदेशा प्रमाणे मानही नाही.
कोणतीही माहिती मला व्यक्तीशः विचारा मी मनःपूर्वक उत्तर देईन.
इंग्रजी ते मराठी हे मूळ फील्ड आहे . ते ही बेस्ट सेलर्सशी संलग्न !!!!
बाकी आपापल्या क्षेत्रातील अनुभवांवर आहे.
उदा- मेन्टेन न्स शी संबंधित,, क्वालिटी शी,, वेतन करारांशी संलग्न दस्तावेज इ.

>> काम कसे मिळवायचे, कामाचे पैसे कसे मिळतात, एखादी कंपनी कशी आहे, असे प्रश्न विचारले की भारतातील अनुभवी अनुवादक (विशेषत: मराठी भाषिक ) चर्चा त्यांच्यापुरती बंदच करतात.

त्यांना एकतर नवोदित अनुवादकांशी स्पर्धेची काळजी वाटत असावी किंवा उत्तरे देण्यात रस नसावा. बाहेरील देशातील अनुवादक खुल्या मनाने चर्चा करताना आढळतात. >>
>>मलाही असे प्रश्न आहेत पण अजूनपर्यंत खास ओळखीतला किंवा खात्रीलायक असा कुणी भेटला नाही की ज्याला ह्यासंबंधी व्यवस्थित माहिती आहे आणि त्याचा अनुभवही चांगला आहे.
पण एकूणात हे क्षेत्र खूपच फसवं आहे त्यामुळे एखाद्याची फसगत झाली तर तो ती इतरांना सांगत नसावा...स्वतःची फजिती सांगणं इतकं सोपं नसतं.
दुसरं कारण विनिता म्हणते ते बरोबर वाटतंय..एखाद्याला त्यात यश आलं असेल,चांगला अनुभव आला असेल तर तो इतरांना ते अनुभव खुलेपणाने सांगत नाही कारण स्पर्धेची भिती हेच असावं.
ह्यावर उपाय एकच...स्वतःच अनुभव घ्यावा आणि इतरांना त्याबद्दल मोकळेपणाने सांगावे>>

मी आपणहून माहिती द्यायला तयार आहे . प्रश्न तरी विचारा-- Happy

Happy सन्नाटा तर होतोच ना.

मी प्रश्न वरही विचारले आहेत.
यात फारसा पैसा नाही- >>> तुम्ही म्हणता फारसा पैसा या कामात नाही, पण आज जागतिक स्तरावर प्रचंड मोठ्या संस्था, एजन्सीज भाषांतराचे काम करताना दिसतात, जर्मन, फ्रेंच जपानी व इतर भाषांतील कामे प्रोज किंवा इतर संकेतस्थळांवर जास्त प्रमाणात असतात मग मराठीत अशी कामे का होत नाहीत?
भाषांतरकार जास्त व काम कमी अशी स्थिती का आहे?

आपण परिस्थिती बदलण्यासाठी सगळे एकत्र येऊन काय काय करू शकतो?

मराठी भाषांतराची कामे मिळतील अशा कुठल्या संस्था आहेत?

१.॓वेगवेगळ्या प्रकाशन संस्था ( उदा. मेहता, अमेय, साकेत इ.) . यात अमेय व मेहता यांच्याकडे फॉर्मल पात्रता चाचणी पध्दत आहे.
२. वेगवेगळ्या फॅक्टर्या - त्यांच्या कडील अनेक दस्तावएज मराठीत लागतात ( त्यांच्या कामगारांसाठी).
३. वकील : ज्या केसेस सुप्रिम कोर्टात पाठवाय च्या असतात, त्यांचे भाषांतर.
४ या शिवाय खालील संस्थ
globalcreations.com
cosmicglobal limited
globalcreations.com
proz.com (this is an international portal)
५. सब टायटल ,ट्रान्स स्क्रिप्शन करून मागणार्या संस्था
६. आपल्या कंझुमर सर्व्हे च्या मूळ इंग्रजी प्रतींचे भाषांतर मागणार्या संस्था
उदा. ग्लॅक्सो , स्टार बक्स, कोस्टा कॉफी, नोवार्टिस
आपल्या नेटवर्किंग वर बरेच अवलंबून असते.

>> जर्मन, फ्रेंच जपानी व इतर भाषांतील कामे प्रोज किंवा इतर संकेतस्थळांवर जास्त प्रमाणात असतात मग मराठीत अशी कामे का होत नाहीत? >>>
उत्तम प्रश्न : मराठीतील सर्व भाषांतर अथ्वा बहुतेक भाषांतर फिक्शन या स्वरूपात आहे.
इतर ठिकाणी जे काम हो ते त्याला क्वालीटी हा क्रायटेरिया नाहीच.
या शिवाय बहुतेक काम मूळ इंग्रजीत चालते.
मराठीच काय इतर भारतीय भाषांची हीच परिस्थिती आहे.

>>मराठीच काय इतर भारतीय भाषांची हीच परिस्थिती आहे.

हो.

हाच प्रश्न इतर रिजनल भाषांनाही लागू होतो.

जर्मन/फ्रेंच्/जपानी या भाषांचे देश विकसित आहेत. आम्ही जपानी/जर्मनमधूनच कराराचे कागदपत्र तयार करु, आम्ही आमची पेटंट्स आमच्याच भाषेत लिहू ( तुम्हाल गरज असेल तर तुम्ही भाषांतरीत करुन घ्या) असा स्टँड ते घेऊ शकतात. आपण अशी भूमिका मराठीसाठी घेऊ शकू तेव्हा मराठी भाषांतरकारांची गरज नक्कीच वाढेल.

>>मराठी भाषांतराची कामे मिळतील अशा कुठल्या संस्था आहेत?

मला साहित्याच्या भाषांतराचा काहीही अनुभव नाही. त्यामुळे यासंदर्भातील प्रकाशक वगैर माहित नाहीत.

बाकी तंत्रज्ञान्/बिझनेस क्षेत्रातील भाषांतरे करुन देणार्‍या सर्व कंपन्या/एजन्सी यांची माहिती/संपर्क
१) गुगल सर्च मधून मिळेल.
२) भाषांतरकारांचे मंच (प्रोज्/ट्रा.कॅफे/ट्रान्सलेटर्सबेस्/डिरेक्टरी) अशा ठिकाणी या कंपन्याचा ओपन डेटाबेस आहे. भारतातल्या सर्व कंपन्यांचे डिटेल्स तिथे मिळतात. (भारताबाहेरच्या तर आहेच)

या व्यतिरिक्त आपण स्वतःला एक भाषांतरकार म्हणून ऑनलाइन जितके चांगल्या प्रकारे प्रेझेंट करु त्यावरुन तुमच्या सेवांची गरज असणारे ग्राहक तुम्हाला स्वतःच शोधत येतात.

वर्षा, रेव्यु मनापासून धन्यवाद.
हा धागा सर्व भाषांतरकारांसाठी अमूल्य माहितीचा महत्वपूर्ण स्त्रोत व्हावा हीच इच्छा

आपण परिस्थिती बदलण्यासाठी सगळे एकत्र येऊन काय काय करू शकतो?

या प्रश्नात बरेच अंतर्गत प्रश्न दडलेले आहेत.
म्हणजे आपण नक्कीच कंपन्या व सरकारी व्यवस्थाना मराठीत कामकाज चालविण्यास भाग पाडू शकत नाही, पण कार्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी
१. नवीन खाजगी कोर्सेसची निर्मिती करण्यास हातभार लावणे
२. सरकारच्या भाषा विभागाकडे व इतर सरकारी संस्था व संघटनांकडे सर्टिफिकेशन साठी एकत्रित अर्ज करणे
३. मराठी भाषांतरकारांच्या संघटना, मंच आणि संस्था निर्माण करण्यास हातभार लावणे
४. इतर परकीय भाषांचे अवलोकन करून त्या शिकण्यास मराठी भाषांतरकारांस प्रवृत्त करणे

अशा गोष्टी करू शकू का?

>> १. नवीन खाजगी कोर्सेसची निर्मिती करण्यास हातभार लावणे
२. सरकारच्या भाषा विभागाकडे व इतर सरकारी संस्था व संघटनांकडे सर्टिफिकेशन साठी एकत्रित अर्ज करणे>>

बहुतेक संस्था सर्टिफिकेश्न विचारत नाहीत कारण त्यांच्या स्वतःच्या क्रायटेरिया आहेत व त्यांचा अप्रूव्हल स्टाफ आहे

रेव्यु आणि वर्षा

मनापासून धन्यवाद ही माहिती शेअर केल्याबद्द्ल. मी ही वेळ मिळेल तेव्हा नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये जेवढे जमेल तेवढे तपशीलवार लिहीण्याचा प्रयत्न करतो.
सध्या होम फ्रंटवर दवाखान्याच्या ट्रिप्स सुरू आहेत नवीन परीच्या आगमनाची तारीख आहे ह्या आठवड्यात, म्हणून वेळ मिळत नाहीये, क्षमस्व

एक महत्त्वाची बाब म्हणजे भाषांतर करतांना अगदी शब्द ते शब्द असे भाषांतर करून चालत नाही तर मुळ उतार्‍यात काय आहे त्याचा मराठी भावार्थ काय होतो ते नीटपणे पोहोचणे आवश्यक आहे

दुसरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही भाषांतर करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर वापरले जातात, त्या सोबत फॅमीलीअर असणे गरजेचे आहे.

SDL Trados
WordFast
MemoQ
Déjà Vu X2

मला तर मराठी, हिंदी, इंग्लिश सोडून काही फिरंगी भाषा ही आपल्याला चांगली अवगत असायला हवी असे फार वाटते पण त्यात ही खुप प्रश्न पडतात
आता (म्हणजे या वयात, शाळेपासून न शिकता) शिकले तर ती व्यावसायिक क्षमता गाठता येईल का? किती वेळ जाईल या प्रोसेस मध्ये, कारण आपण आपल्या मातृभाषा, हिंदी, राष्ट्रभाषा व इंग्लिश सरकारी-दरबारी भाषा म्हणून शिकलो लहानपणापासून!
कुठली भाषा शिकावी जी आपल्याला अवगत होईलच पण मार्केटमध्ये जास्त कामे असतील व छोटी छोटी का होईना आपल्याला मिळतील.

या क्षणाला डॉक्टरकी सोडून काहीतरी इतर धंदा शोधावा इतक्या उद्विग्नतेला पोहोचलो आहे.
२-४ भाषा येतात. इतर शिकू शकतोच असा आत्मविश्वास आहे.
तेव्हा म्हातारपणाच्या मेडिक्लेमचा हप्ता निघेल इतपत उत्पन्न येईल असा हा धंदा नोंदवून ठेवतो मनात..

या क्षणाला डॉक्टरकी सोडून काहीतरी इतर धंदा शोधावा इतक्या उद्विग्नतेला पोहोचलो आहे. >>
अरे बापरे , डॉ तुम्ही सुद्धा !! Sad मला वाटले होते , डॉ लोकांचे कीती बरेय त्यांच्या व्यवसायाला कधीच मरण नाही.
रीसेशन वगैरेचा काहीही परीणाम नाही. नोकरी जायची , काम कमी व्ह्यायची भीती नाही.

विषयांतरा बद्द्ल क्षमस्व. अगदीच राहवले नाही म्हणुन लिहीले.

Grass is greener on the other side of the fence?
त्यापेक्षा ही शुद्ध मराठी म्हण घ्या : (पंगतीत) शेजार्‍याच्या पोळीवरचे तूप नेहेमी जास्त दिसते! Wink

*

@ डेलिया,
येतात खरे असे क्षण अधून मधून..

इब्लीस महेश याला शेजार्‍याच्या बायको देखणी अशी चपखल मराठी म्हण आहे. त्याकरता माशी टु माशी भाषांतराची गरज नाही. Happy धन्यवाद कृपया

इब्लिस, वैद्यकीय भाषांतर हे एक विशेष क्षेत्र आहे, मेडिकोलिगल (MLC) : तुम्ही नक्की हे काबीज करू शकाल. शिवाय विनोदी भाषांतरे करण्यात ही तज्ञ होऊ शकाल. फारशी पोटाची गरज नसेल तर छानसे पुस्तक भाषांतरीत करा. खासच होईल वाचकाना ते!

>>शिवाय विनोदी भाषांतरे करण्यात ही तज्ञ होऊ शकाल Lol
कापो, अरे ती म्हण माहिती आहेच, पण मुद्दाम म्हणालो नाही, कारण कदाचित माझ्या बायकोने प्रतिसाद वाचला येऊन तर ? Wink

तेच ते @ कापो.
मुद्दाम साजुक तुपातली सपे म्हण लिवली होती. गावरान ऐवजी गावराणी Wink

चला लोखो, आवरू या आता! लै अवांतर मारलं गेलंय धाग्यावर आल्रेडी.

SDL Trados ची महिती कोणी देवू शकाल का?
गेल्या ४ ते ५ महिन्यात माझे खूप क्लायंट्स तेच वापरण्याचा हेका धरत आहेत.

रेव्यु....

SDL Trados हे सद्य परिस्थितीतील भाषांतरासाठी वापरण्याचे आघाडीचे सॉफ्टवेअर आहे.
नुकतेच त्यांनी SDL Trados २०१५ एडीशन ही लाँच केलेले आहे. मुळात SDL Trados, Deja Vu, MemoQ ही सगळी सॉफ्टवेअर्स भाषांतर करीत नाहीत, हे नक्की लक्षात ठेवले पाहीजे. ही सगळी सॉफ्टवेअर्स memory builder tools म्हणुन काम करतात, अर्थात काही काही वेळेला ही सॉफ्टवेअर्स भाषांतर ही करतात, पण त्या साठी reference म्हणुन ज्या files चा उपयोग करुन घेतला जातो, त्या files किंवा तो source बिनचुक हवा. बाकी हे SDL Trados कसे कार्य करते हे तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावरुन कळु शकेल. पहा www.sdl.com

वेगवेगळ्या प्रकाशन संस्था ( उदा. मेहता, अमेय, साकेत इ.) . यात अमेय व मेहता यांच्याकडे फॉर्मल पात्रता चाचणी पध्दत आहे.>>> या कंपन्याकडून कामे कशी मिळतात. त्यांची काय प्रोसेस आहे हे सांगाल का

Pages