मायबोलिवर स्मार्टफोन्/आयफोनवरुन देवनागरीमधे कसे लिहायचे?

Submitted by हर्ट on 27 February, 2014 - 00:31

मी हल्ली आयफोनवरुन मायबोलि वर येत असतो पण मला आयफोनवरुन देवनागरीमधे कसे लिहायचे माहिती नाही. ह्यावर कुणाला तांत्रिक मदत करता येईल का? धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्याय १.
Setting --> General --> Keyboard -->> Add new keyboard -- Select हिंदी
हे केल्यावर कीबोर्ड वर ग्लोब असलेले बटन दिसेल. ते वापरुन भाषा बदलु शकता. वापरायला सोपे आहे आणि 'ळ' वगैरे पण लिहिता येते.

पर्याय २.
मराठी Editor for iPhone असे अ‍ॅप आहे. त्यात मायबोलीवर करतो तसे मराठी टाईप करा आणि कॉपी-पेस्ट करुन पाहिजे तिथे वापरा.

यासंबंधी काही चर्चा खालील धाग्यावर झाली आहे
http://www.maayboli.com/node/39214
http://www.maayboli.com/node/13483

महागुरु,

पर्याय दुसरा जास्त बरा वाटतो पण आत्ताच शोधून पाहिले तुम्ही म्हणत आहात ते अप्स. पण मिळले नाही. जसेच्या तसे नाव द्याल का लिहूण? एक दुसरेच अप्स आले आहे Marathi Pride Marathi Editor ह्या नावाचे.

महागुरु,
मी मराठी Editor" असे शोधून पाहिले पण नाही मिळाले.
मी "Marathi Editor" असेही शोधून पाहिले पण नाही मिळाले.