फक्त प्राणायामाने वजन कमी होते का?

Submitted by सख्या on 26 February, 2014 - 02:44

फक्त प्राणायामाने वजन कमी होते का? बाकी कुठले फिजिकल व्यायाम करण्यास डॉक्टरने मनाई केली आहे. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> नक्की खायचं तरी काय व किती ? <<<< सोप्पय, घरात केलेल्या प्रत्येक जिनसातला फक्त एकेक बारका चमचाभर खायच! अन जेवणावरुन उठायच!

रोज दहा मिनिटे कपालभाती केली तर वजन १ आठवड्यात १ किलोने कमी होऊ शकते असे माझ्या ट्रेनरने सांगितलेले.>>> खाण्यावर काही नियंत्रण नाही का?
दिशाभूल करणारी वाक्यरचना आहे ही. कपालभातीला आहार नियंत्रणाची जोड असल्याशिवाय वजन कमी होणे शक्य नाही.

यानिमित्त माझ्या मनात आलेले प्रश्न
प्राणायाम म्हणजे नेमके काय?
तो कसा करावा?
तो कोणी करावा?
तो कधी करावा?
तो कोठे करावा?
प्राणायामाचे प्रकार किती?
प्राणायामाचे फायदे काय?
प्राणायामाचे तोटे काय?
तो कोणास वर्ज आहे?
तो कोणास धार्जिणा आहे?
..
.
.
इच्छुकांनी अजून भर घालावी. अभ्यासू/ तज्ञांनी उत्तरे द्यावीत.
धागाकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची माझी योग्यता नाही. पण माझे मत असे आहे कि फक्त प्राणायमाने वजन कमी होणार नाही.

मी गेले सहा महिने नियमित प्राणायाम करते आहे. (रामदेव बाबांची सीडी बघून नाही, तज्ञ प्रशिक्षकांकडून शिकून.) प्राणायामासोबत कपालभातीही करते, तसेच गेल्या एक - दोन महिन्यांपासून मुद्राही. प्राणायामामुळे उत्साह, एनर्जी नक्की वाढलेली जाणवते, पण वजनावर काहीही परिणाम झालेला नाही.

ही मुद्रा फक्त डाव्या हातने करून उज्व्या हाताने ओफिसचे काम करत ४५ ब्सेअस्बसेन की , होइल क मझे वजन क्मी ?

Pages